आत्महत्या ? छे , अजिबात नाही !
हल्ली आत्महत्येच्या बातम्या वारंवार पेपरात येत असतात, नैराश्याच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणीही हि कृती करून बसतो. विशेषतः एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली कि बरेच वेळेला लोकांना आत्महत्येबद्दल शंका येते. अशा बऱ्याच Cases येत असतात, त्यापैकीच एक Case इथे देत आहे.
इथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो कि कुठलीही पत्रिका हातात आल्यानंतर Astrologer नी भविष्य सांगण्याच्या आधी प्रत्येक पत्रिकेचा Nature Analysis केला पाहिजे, माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याशी सांगड घालणं सोप जातं, याचा अर्थ माणसाचा स्वभाव त्याच भविष्य ठरवतो असा अजिबात नाही तर भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करतात येतात. ह्या Case मध्ये त्या माणसाचे तुळ लग्न व मीन रास होती, त्यामुळे ह्या व्यक्तीत धडाडीचा अभाव होता. मी म्हंटल कि हि व्यक्ती परत नक्की येईल पण थोडा Late होण्याच्या Indications आहेत, पत्रिकेनुसार ती व्यक्ती घरी परत येण्याचा जो काही काळ होता तो मी सांगितला आणि म्हंटल कि Late झाला तरी घरी परत येईल हे नक्की ! तुम्ही शोध घेतला तरी आत्ता त्याचा काही उपयोग होणार नाही !
तुळ लग्न व मीन रास आणि पत्रिकेतल्या इतर काही गोष्टींमुळे ती व्यक्ती खूप Emotional वाटत होती, म्हणून मी त्यांना म्हंटल कि हि व्यक्ती घरी परत आल्यावर पुन्हा अस काही करू नये यासाठी ह्यांना Emotions मध्ये अडकवा म्हणजे ह्यांना Emotional Blackmailing करा ! जेव्हा हे घरी नव्हते तेंव्हा इतर Family Members ना किती आणि कसा त्रास झाला हे त्यांना सांगा किंवा अस काहीही करा ज्यामुळे ते Emotionally घराला बांधलेले राहतील. हि Trick भविष्यात नक्की उपयोगी पडेल !
त्यानंतर नातेवाईकांचा शोध तर सुरूच होता. असाच काही महिन्यांचा काळ गेला आणि ती व्यक्ती आपणहून घराकडे आली. आर्थिक Problem आल्यामुळे आणि Emotional असल्यामुळे Depression / Frustration लवकर आलं होतं आणि त्यात ती व्यक्ती घर सोडून गेली होती.
पत्रिका कुठलीही असो, माणसाचा स्वभाव आणि त्याच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी यांची सांगड घातली कि मग भविष्यात अचूकता येते !
इथे एक मुद्दा परत सांगावासा वाटतो ,
व्यक्तीचा स्वभाव ओळखणं म्हणजे त्याच भविष्य ओळखणं नव्हे ! माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याची सांगड घालणं सोप जातं, भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करता येतात.
व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य/नशीब ह्यात खूप तफावत असू शकते. Scientist होण्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीत असून सुद्धा नशिबात नसेल तर ती व्यक्ती आयुष्यभर Clerk राहू शकते. अमिताभ बच्चन पेक्षा जास्ती Acting Skills असलेली माणसं भारतात असतील पण अमिताभ बच्चन बनणे एखाद्याच्याच नशिबात असतं !