लग्न ! आयुष्यातील एक महत्वाची घटना ! आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे} त्याला अपवाद होता. माझ्याकडे येऊन लग्नासंबंधी विचारणारया अनुपला लग्न करायचंच नव्हतं हे विशेष. मी त्याच्या पत्रिकेनुसार लग्नासंबंधीच्या गोष्टी सांगून झाल्यावर अनुप म्हणाला "म्हणजे माझं लग्न होणार आहे? पण मला तर लग्नच करायचं नाहीये". मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. लोकं इथे लग्न कधी होईल, बायको/नवरा कसा मिळेल हे विचारण्यासाठी येतात आणि हा प्राणी, लग्न होणार नाहीये ना, हे विचारण्यासाठी आला होता, असो ! मी म्हंटलं "हो, लग्न तर १००% होणार आहे". अनुप म्हणाला "हे तर शक्यच नाही, मला लग्नच करायचं नसेल तर मग होईलच कसं?". मी म्हंटलं कि आता ह्याला ह्याच्याच भाषेत उत्तर देयला हवं. अनुपनी थोडयाच महिन्यांपूर्वी जॉब चेंज घेतला होता. मी म्हंटलं "ठीक आहे, मग मला सांगा ६ महिन्यांपूर्वी तुम्ही जॉब चेंज घेतलाय, ह्याचा अर्थ आजपासून ३ वर्ष आधी तुम्हाला माहित होतं कि तुम्ही जॉब चेंज घेणार आहात" अनुप म्हणाला "नाही, हे सगळं अचानकच या वर्षी झालं". आया उंट पहाड के नीचे. मी म्हंटलं "अहो मग ३ वर्षांनी काय होणार होतं हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर मग आयुष्यभर लग्न होणार नाही हे तुम्ही कुठल्या आत्मविश्वासावर सांगू शकता?". अनुप विचार करू लागला, मी म्हंटलं "तुम्हाला लग्न करायचं नाहीये पण तुमची पत्रिका लग्न दाखवतेय, ह्याचा अर्थ असा कि जरी आत्ता काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला नाही म्हणत असलात तरी जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा काहीना काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला हो म्हणणार आणि लग्न होणारच. जेव्हा एखादी घटना घडणारच असते तेंव्हा त्यासाठी लागणारे प्रयत्न हे देखील होणारच".
ह्या गोष्टीला ४ वर्ष उलटून गेली आणि एके दिवशी हाच अनुप माझ्याकडे "मूल कधी होईल" हे विचारण्यासाठी आला, तेंव्हा मी म्हंटलं "काय? झालं ना लग्न?". अनुप होकारार्थी मान हलवत हसून "हो" म्हणाला !
हा फक्त अनुपचा नाही तर अनेक लोकांचा गैरसमज असतो कि मी प्रयत्न केलेच नाहीत तर घटना घडणारच नाही. जेव्हा घटना घडणार असेल तेंव्हा प्रयत्न हे आपसूक होणारच. परीक्षेत चांगले मार्क मिळणार असतील तर अभ्यास चांगला होणारच. लग्नाच्या बाबतीत काही मुली/मुलं असही विचारतात कि आम्हाला कोणाचाच होकार येत नाही, पण जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा कोणी ना कोणीतरी हो म्हणणार आणि लग्न होणारच ! लग्नाच्या बाबतीत आणखी एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे "वय". वय वाढलं तर लग्न होणार नाही हा असाच एक गैरसमज. एक उदाहण घेऊ, २८ वर्षाच्या एका मुलीला १०० स्थळं आली पण तेंव्हा जर लग्नाचा काळ सुरु नसेल तर एकाही मुलाशी लग्न ठरणार नाही. आता समजा त्या मुलीचं वय ३५ झालं आणि तेंव्हा जर लग्नाचा स्ट्रॉंग काळ सुरु असेल तर २ स्थळं जरी आली तरी त्यातल्या एकाशी लग्न ठरेल, शेवटी एका वेळेला एकच लग्न करायचंय ना ! १०० स्थळं आली कि २ आली ह्याला तेंव्हा काहीच अर्थ उरत नाही.
"अमुक मुलीशी लग्न केलं तर मला भरपूर पैसा मिळेल का?" हा असाच एक गैरसमजातून आलेला प्रश्न. मुळात एखादा मुलगा किती पैसे मिळवेल हे इतर कोणाच्याही पत्रिकेवर अवलंबून नसून केवळ त्याच्या स्वतःच्या पत्रिकेवर अवलंबून असतं. बिल गेट्सनी मेलिंडा गेट्सशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, अमिताभने जयाशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, ते त्यांच्याच पत्रिकेत असावं लागतं.
Arranged Marriage कि Love marriage हा असाच एक गमतीशीर विषय आहे. बरेच मुलं मुली आपल्या सोयीनुसार marriage हे arranged आहे कि love ते ठरवतं असतात. म्हणून मी दोन्ही प्रकारच्या लग्नांच्या वाख्या केल्या आहेत ज्याद्वारे हा घोळ संपुष्टात येईल, त्या खालील प्रमाणे,
When the First meeting of a boy & a girl happens WITH the intention of marriage, it's called as Arranged Marriage.
When the First meeting of a boy & a girl happens WITHOUT the intention of marriage, it's called as Love Marriage.
Arranged Marriage मधे अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे ह्याची धास्ती काही जणांना (विशेषतः मुलींना) वाटते. दोघांच्या पत्रिकेत Married life आणि Match Making चांगलं असेल तर घाबरण्याच कारण नाही. Love marriage मधे दोघं एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असून सुद्धा घटस्फोट होतातच कि, उलट तिकडे हे प्रमाण जास्त आहे.
ह्या सगळ्या समज गैरसमजातून पार होऊन एकदा शुभमंगल सावधान झालं कि अनेक मुलामुलींचा जीव भांडयात पडतो.
अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com