Saturday 9 November 2013

'मंगळ'यान आणि ज्योतिष..



मंगळयान आणि ज्योतिष 

त्यादिवशी मंगळयानाच्या उड्डाणाची तयारी जोरदार सुरु होती. सगळे TV Channels तीच बातमी दाखवत होते. एका news channel वर एक anchor बोलत होती "पत्रिकेतल्या ज्या मंगळामुळे इतके problems होतात त्याच मंगळावर आता आपण यान पाठवत आहोत, त्यामुळे आता आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेऊन चालणार नाही.." वगैरे वगैरे..  त्याच वेळी दुसरया एका Channel वर आणखी एक बातमी "ISRO Chief के. राधाकृष्णन यांनी उड्डाणाच्या आधी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली.." दोन्ही गोष्टीतला विरोधाभास स्पष्ट दिसत होता.. एक साधी news anchor जी कदाचित Science मधल्या "S" पर्यंत देखील पोचली नसेल ती सांगत होती कि पत्रीकेमधल्या मंगळावर विश्वास ठेऊ नका आणि ISRO Chief, एक मोठा Scientist ज्यांनी मंगळावर यान पाठवण्याची एवढी मोठी कामगिरी करण्याचा घाट घातला होता, ते स्वतः अत्यंत विनयाने, आपण केलेल्या एवढ्या मोठ्या कार्यासाठी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले  होते. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणारया लोकांची संख्या कमी नाही ! मुळात आधी, मंगळावर यान पाठवणे आणि पत्रिकेतला मंगळ यांचा काही संबंधच नाही. जन्माच्या वेळचे पत्रिकेतले ग्रह हे काही गोष्टी 'Indicate' करतात, ग्रहामुळे काही होत नाही. हे म्हणजे परीक्षेत fail झालेल्या मुलाने स्वत:ची Mark Sheet फाडून टाकली तर तो काही परीक्षेत पास झाला अस होत नाही ! मार्क sheet फाडली तरी परीक्षेतले मार्क्स बदलत नाहीत ! असो !

मंगळ यानाचे उड्डाण १४:३८ ला झाल्यानंतर मी सहज त्यावेळेची पत्रिका मांडून बघितली.. 
५ नोव्हेंबर २०१३, १४:३८, श्रीहरीकोटा १३ ४३ N, ८०  १२ E , सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'मंगळ' यानाच उड्डाण हे 'मंगळ'वारीच झालं होत ! दुसरं म्हणजे त्या दिवशी वृश्चिक रासच होती, म्हणजे राशी स्वामी हा देखील 'मंगळ'च होता. त्या दिवशी मंगळाच किती प्राबल्य होतं हे उघडं दिसत होतं ! आणखी पुढे जाऊन बघितलं तर वृश्चिक रास हि देखील त्या वेळी दशम स्थानातच होती. दशम स्थान हे पत्रिकेच "कर्म" स्थान आहे. यान पाठवण्याच इतक मोठं कर्म/काम त्यावेळेला होत होतं ! लग्नरास सुद्धा 'कुंभ' होती, कुंभ हि वायू राशी आहे. यान पाठवण्याच कर्म हे "वायू" ची साथ असल्याशिवाय शक्यच नव्हतं. लग्नेश (लग्नराशीचा स्वामी) शनी हा देखील "तुळेत" होता, तूळ हि देखील पुन्हा वायू राशीच, तुळेत शनि उच्चीचा होतो हा additionally favorable factor ! महादशा स्वामी देखील शनीच होता व तो देखील १२ व्या स्थानाचा Strong कार्येश होता व स्वतः व्ययेश (१२ व्या स्थानाचा अधिपती) होता, पत्रिकेतील बारावं स्थान हे परदेश गमनासाठी मानलं जातं, म्हणजेच लांबचे (देशाबाहेरचे प्रवास, इथे तर पृथ्वी बाहेरचा प्रवास). यान पाठवण्यासाठी इतकी अनुकूल ग्रहस्थिती निर्माण झाली असतानाच यान पाठवलं गेलं !

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यानी स्वतः आधी ज्योतिषशास्त्राचा आणि त्यात सुद्धा कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करावा आणि मग आपली So called "Scientific" मतं मांडावीत. Bat हातात नीट पकडता न येणाऱ्यानी उगाच सचिन तेंडूलकरच्या फलंदाजी विषयी सल्ले देऊ नयेत! मुळात लोकांची एक धारणा असते कि Science आणि ज्योतिष, या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. Actually, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नसून, एकमेकांना पूरक आहेत ! एखादा माणूस गणितात हुशार असेल तर त्याने इतिहासात हुशार असू नये असा काही नियम आहे का? दोन्ही विषयामुळे लोकांचा वेगवेगळा फायदा होतो.  सगळ्याच गोष्टींची उत्तरं Science कडे आहेत का? तुमचा जन्म अमिताभ बच्चन किंवा बिल गेट्स यांच्या घराण्यात का नाही झाला? किंवा तुमचा जन्म झोपडपट्टीत का नाही झाला? झाला असता तर तुमच आयुष्य आता सारखं राहिलं असत का? किंवा काही नवरा बायको दोघेही Medically Fit असून सुद्धा त्यांना मुल का होत नाही? आहेत का या प्रश्नांची उत्तर Science कडे? 'ज्योतिष मानणं' म्हणजे 'Science न मानणं' असं थोडंच आहे. Science कोणीच अमान्य करू शकत नाही! ते तर आहेच पण त्याबरोबर ज्योतिष देखील आहेच! ते देखील तुम्ही अमान्य करूच शकत नाही!


अभय गोडसे



Friday 25 October 2013

Diagnosis चुकतो तेंव्हा..

Diagnosis चुकतो तेंव्हा.. 

Health Problems आले कि माणूस डॉक्टरकडे जातो पण दहा डॉक्टर फिरून सुद्धा जर diagnosis झाला नाही तर काय कराव? तर मात्र ज्योतिषशास्त्राची मदत नक्कीच घेऊन बघावी.. अशीच एक Case काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती.. काही डॉक्टर त्या मुलीला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते तर काही डॉक्टर कुठल्याच conclusion वर पोचत नव्हते, त्या  मुलीला आपल्याला नक्की काय झालं आहे हाच प्रश्न होता. त्या मुलीची कुंडली खाली देत आहे ( privacy जपण्यासाठी नाव देत नाहीये). 


एखाद्या health problems साठी जेव्हा माणूस येतो तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा Current time period कुठला सुरु आहे हे बघणं महत्वाच असतं. ज्यावेळेला ती माझ्याकडे आली तेंव्हा तिची गुरु अंतर्दशा सुरु होती. कुंडलीत गुरु तुळेत व्ययस्थानात आहे. गुरु स्वाती ह्या राहूच्या नक्षत्रात आहे व राहू अष्टमात आहे. ८ व १२  स्थानं activate झाल्यामुळे Health problems आले हे उघड आहे. तूळ रास हि शरीराच्या ओटीपोटावर (Lower Abdomen) येते म्हणून मी तिला विचारलं कि पोटासंबंधी काही प्रोब्लेम आहे का? ती म्हणाली "हो, पोटातच दुखतंय". त्यात गोचरीच्या गुरुचं भ्रमण देखील मिथुनेतुन म्हणजे ह्या पत्रिकेच्या अष्टमातूनच होत आहे. म्हणजे health problems नक्की येणार. त्यात माझं लक्ष Birth Chart मधील गुरूच्या Degrees कडे गेलं, गुरु १८ अंशावर होता व गोचरीचा गुरु देखील त्या वेळेला मिथुनेत म्हणजे अष्टमात १८ अंशावरच आला होता त्यामुळे बरोबर तेंव्हांच Health Problem आला होता. ती म्हणाली "पोटात दुखतंय पण त्याच कारणच कळत नाहीये आणि दुसर म्हणजे माझं Blood Presuure सुद्धा खूप high होतंय त्यामुळे डॉक्टरांचा पहिला होरा आहे कि तुम्हाला Blood pressure आहे. " मी म्हंटल "नाही, तुमच्या पोटाच्याच problem मुळे ते high होत असणार, त्यात सुद्धा ओटीपोट indicate होत असल्यामुळे Urinary infection किंवा Stone असण्याचे chances जास्त आहेत त्यामुळे ओटीपोटा संबंधितच Test करून घ्याव्यात". अंतर्दश स्वामी गुरु असल्यामुळे मी तिला विचारल कि "ह्या आजारपणात गुरुवारचा काही संबंध आला आहे का? म्हणजे गुरुवारी त्रास सुरु झाला किंवा कमी झाला अस काही?" त्यावर ती म्हणाली "मी observe केलेलं नाहीये", मी म्हंटल "ह्या पुढे observe कर आणि सांग"

चला, आता प्रोब्लेम तर identify झाला मग लगेच पुढचा प्रश्न कि प्रोब्लेम ची Severity कितपत असू शकेल किंवा आयुष्याला काही धोका नाही ना? मी लगेच पत्रिकेची महादशा बघितली, महादशा बुध आहे, बुध लाभत असून चंद्राच्या हस्त नक्षत्रात आहे व चंद्र पंचमात आहे म्हणजे महादशा स्वामी ११,५,८,९ ह्या भावांचा कार्येश होतो, ११ व ५ चा strong कार्येश होतो आणि अष्टम भावाचा Weak कार्येश होतो कारण अष्टमात ग्रह आहे ,त्यामुळे आयुष्याला अजिबात धोका नाही.. म्हणजे व्यक्ती बरी होणार हे नक्की ! 

मघाशीच म्हटल्याप्रमाणे, अंतर्दशा स्वामी गुरु आहे, गुरु हा ग्रह एखाद्या माणसाच खूप वाईट करत नाही, Last Moment help करतोच, त्यामुळे व्ययस्थानात असला तरी medical हेल्प नक्कीच चांगली मिळवून देईल पण तो राहूच्या नक्षत्रात व राहू अष्टमात आहे, राहूचा संबंध आला कि बऱ्याच गोष्टी ह्या अनाकलनीय घडतात, एखाद्या गोष्टी मागील कारणच कळत नाही, ह्या मुलीच्या बाबतीत नेमकं तेच घडत होत पण शेवटी अंतर्दशा स्वामी गुरु होता, राहू नाही, so initially जरी घोळ झाला असला तरी ultimately medical हेल्प चांगली मिळणारच ! आता प्रश्न होता कि नेमक्या कुठल्या डॉक्टरकडून? गुरु हा मेद वाढवणारा ग्रह आहे तसेच गुरु हा पारंपरिक वृत्ती जपणारा ग्रह आहे, थिल्लर वृत्ती असणारा ग्रह नाही म्हणजेच Matured Planet आहे त्यामुळे हे सर्व गुण ज्या डॉक्टरमध्ये आहेत असा डॉक्टर Correct diagnosis करू शकेल. म्हणजेच असा डॉक्टर कि जो थोडा स्थूल/जाड आहे व matured आहे. हे सगळं मी त्या मुलीला सांगितल्यावर ती म्हणाली कि असे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं एक medicine मी आता घेणार आहेत. मी म्हंटल कि Correct, ह्या डॉक्टर ला सोडू नको, हा जे सांगेल ते कर कारण ह्याचीच मदत होऊ शकेल. गुरु हा पुरुष ग्रह आहे, तूळ रास हि देखील पुरुष राशीच आहे, गुरु तुळेचा आहे म्हणजे Male डॉक्टरच बरोबर आहे ! त्याही पुढे जाऊन मी तिला सांगितलं कि ह्या डॉक्टरच नाव (First name or Last name) जर "ग" ह्या अक्षराने सुरु होत असेल, तर आणखी उत्तम, त्यावर ती म्हणाली "हो, ह्या डॉक्टरच first name "ग" नी सुरु होत", मी म्हंटल "yes, हाच तो डॉक्टर". 

आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अंतर्दशास्वामी गुरु व्ययस्थानात आहे, व्ययस्थान हे लांबच ठिकाण किंवा प्रवास दाखवतं. ह्या आजारपणात हि मुलगी मुंबईहून तिच्या माहेरी पुण्यात येउन राहिली होती व डॉक्टर देखील पुण्याचाच होता. म्हणजे हा health problems चा प्रश्न जर मला तिने मुंबईत विचारला असता तर मी तिला "तुझ्यापासून लांब राहत असलेला किंवा बाहेरगावचा डॉक्टर बघ" अस सांगितलं असत. म्हणजेच अंतर्दशास्वामी डॉक्टर लांब आहे असे दर्शवत होता. 

त्यानंतर असेच काही दिवस उलटले आणि एके दिवशी त्या मुलीचा फोन "मी त्या मागे सांगितलेल्या डॉक्टरांचं medicine घेतलं आणि त्याचा चांगला उपयोग झाला, urinary stone wash out झाला आणि महत्वाच म्हणजे हे गुरुवारीच झालं", गुरुने आपला चमत्कार दाखवला होता !


अभय गोडसे


Tuesday 8 October 2013

Astro Facts.. everybody should know..

It's better to know the FACTS than FANTASIES..


Astro Fact about "Planned delivery of a child":

"Planned Delivery of a child" is an "Intelligent effort" to have a good horoscope, but, the child has to be destined to have a good horoscope, then only, it happens as planned.. 


Astro Fact about "Remedies":

Remedies work like Grace marks in exams, if one gets 30 out of 100 then 5 or 10 can be given as Grace marks but, if one gets 5 or 10 out of 100 then 30 can't be given as Grace marks..

Astro Fact about Name of a Person:

Many people think that along with the birth details, “Name of a person” is also equally important & it plays a major role while giving astrological predictions. It is a total misunderstanding. Horoscope is prepared as per the Birth date, Birth time, birth place & Not on the basis of name of a person. In fact, in India, the birth happens before the person gets his/her name..Birth details are important & not the name.. 
Name should be given just to identify the horoscope & doesn't play any major role in the predictions..

Astro Fact about Science & Astrology:

Generally, Astrology is considered opposite to Science & vice versa, When actually it's not ! It's assumed or considered that an Astrologer will be always unscientific & a student of science will never believe in Astrology ! When actually it's not true at all. Astrologers can have scientific approach & a student of science can believe in Astrology. Many Astrologers have dozens of clients from Engineering or other scientific backgrounds. A person can believe in both, Astrology & Science, rather Astrological science.

Astro Fact :

Astrology is a Profession, Not a Business.

Astro Fact about Buying Gemstones :

Along with Astrology consultation, Some astrologers also have a practice to sell the gemstones. People should be careful while buying gemstones from Astrologers, as there are chances of fraud or gemstones may get suggested to a client when it’s not required.

Astrologer’s job/profession is to ADVICE the gemstones (if required) & not to SELL the gemstones.

Gemstones should be purchased from well known jewelry shops because chances of fraud are very less there as they earn a handsome amount of profit by selling Authentic gemstones. Fraud is more likely to happen in Small retailers/shops or the individuals who sell the gemstones. 

It doesn't mean that All the Astrologers who sell gemstones do fraud but, chances of fraud are more.. so people should be alert about this..

Astro Fact about Business :

Success of a Business depend's upon the horoscope of a person who RUNS it. it doesn't depends upon the Person's horoscope who OWNS it.. 

Astro Fact about Muhurta :

“Muhurta” can’t overpower the Basic married life in a horoscope.
Suppose, married life indicated in B’s horoscope is not good & married life indicated in A’s horoscope is good. Now, B gets married on a very good Muhurta & A gets married on any average Muhurta, still, B’s married life will remain as bad & A’s married life will remain as good only.

Astro Fact about Married Life :

Married life depends upon following 3 factors,
1) Married life indicated in Husband's individual horoscope
2) Married life indicated in Wife's individual horoscope
3) Match making of both those horoscopes.
Married life never depends upon just one horoscope. Marriage happens of two people, so, it depends upon both the horoscopes.

Astro Fact about Having a Child :

Astrologically, for a couple to have a child, more importance should be given to the Individual horoscopes of Husband & wife to check whether either horoscope is "Adverse" for having a child than the Nadi factor.. 
"Same Nadi" works as an "Additional Negative factor" for having a child.

The Astro formulas for "having a child" are as follows,
1) Either horoscope is adverse + Same nadi = More problems
2) Both the horoscopes are adverse + Same Nadi = Worst
3) No problems in either horoscope + Same Nadi = Can be some problems
4) No problems in both the horoscopes + Different Nadi = No problems

One more important point, Between husband & wife, more weightage should be given to the Wife's horoscope because she is the one who will be "actually" having a child..


Astro Fact :

Astrologer’s interest in client’s horoscope is Directly Proportional to the Client’s faith in the Astrologer.


Astro Fact :

Appropriate work "Field" as per the horoscope" and "Growth" are two Independent points.

Some clients might think that if they are into Appropriate "field" as per their horoscope then their "growth" will be 100%, which is not true.

Level of Growth of two people will happen as per their individual horoscopes even though they both might be doing Appropriate field as per their horoscope.

Appropriate "Field" only indicates that a person will earn money through it.

अभय गोडसे

For Consultation, Visit  www.Kpjyotish.com   www.AbhayGodse.com

Tuesday 24 September 2013

Love Marriage & Arranged Marriage..

Love Marriage & Arranged Marriage..

Some times, people try to confuse the astrologer about love marriage & Arranged marriage or they themselves are confused about this..

Some people call an "Arranged marriage" as a "Love marriage" by saying "We met each other through matrimonial website but, during 1st meeting itself, we got attracted with each other & fall in love on the very 1st day of meeting.." On the other hand, Some people call a "Love marriage" as a "Love-cum-arranged marriage" by saying "We were in relationship for last 3 years but, when we got approval from each others Parents then only, we got married so it's kind of love-cum-arranged marriage"

Now, how to solve this?.. which one to call as Love marriage & which one to call as an Arranged Marriage? To solve this, i have created my own definition of love marriage & Arranged marriage, which i practise during Astrology consultation..

Definition of Arranged Marriage :

Where a Boy & Girl meet each other 1st time "WITH the INTENTION OF MARRIAGE", it's called as an Arranged Marriage. 

  • Whether they fall in love with each other or not, is immaterial. Most of the couples agree to marry each other only when they "like" each other or "feel attracted" towards each other, so this way, 8 out of 10 marriages should be called as "Love marriages" only, which is illogical.
  • Matrimonial website is a platform/effort to "Arrange" a marriage. Members put their profile there "With the Intention of marriage". All the marriages which happen through Matrimonial websites are "Arranged" marriages only. 

Definition of Love Marriage:

When a Boy & Girl meet each other 1st time "WITHOUT the INTENTION OF MARRIAGE", & then after some time period, the  love happens. It's called as Love Marriage. 
  • Now here, whether they get married with the approval of their parents or not, is totally immaterial. Love marriage doesn't always means that the couple should run away from home for marriage without the approval of parents. 
There is nothing like "Love-cum-arranged" or "Arranged-cum-love" marriage, either it is a Love marriage or an Arranged Marriage.

Another Misunderstanding is "Now a days, maximum people do love marriages", If maximum people do Love marriages then, how those thousands of matrimonial websites & marriage bureaus all over India survive? The number of Arranged Marriages is always high & number of love marriages is always low, at least in India.


अभय गोडसे


Why 2 Astrologers give different opinions about the same horoscope?

Why 2 Astrologers give different opinions about the same horoscope?


Why 2 doctors give different diagnosis about the Same patient when Medical is a Science or When Law is the same, then, how one lawyer losses the case & another lawyer Wins the Same case. It happens because the result depends upon the Skills, knowledge, Intelligence, Experience of that individual Doctor or Lawyer.. it doesn't depends just upon the subject or Science.. 

Only Mathematics is an Absolute Science.. where the answer of 2+2 will be always 4 irrespective whether a school student is doing it or whether Einstein is doing it.  

Even in Mathematics, sometimes there are 2 different ways to solve the same mathematical equation.. 

Astrologer’s job is like a combination of Doctor & Lawyer..
First, like a Doctor’s diagnosis, he needs to analyse the horoscope/case correctly.. and then, Like a Lawyer he needs put the points infront of the client with a proof attached to it..
 


अभय गोडसे

 

Monday 16 September 2013

Practical Way-Outs ( व्यावहारिक उपाय )

Practical Way-Outs ( व्यावहारिक उपाय )

ज्योतिष म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर उपाय देखील दिसू लागतात. रत्न, शांती, जप असे अनेक उपाय ज्योतिषी सांगत असतात. बऱ्याच लोकांना अस वाटत कि प्रत्येक Problem साठी उपाय हा असतोच आणि एकदा तो उपाय केला कि माझे सगळे Problems Solve होतील, पण अस नसतं. मी नेहमी म्हणतो कि उपाय हे Grace Marks सारखे Work out होतात. समजा Exam मधे Passing ४० ला असेल आणि एखाद्याला ३५ मिळाले तर ५ grace marks मिळू शकतात पण १०० पैकी १० मिळाले तर ३० grace marks मिळू शकत नाहीत. मिळालेल्या मार्कांच्या तिप्पट grace marks कुठल्याही Exam मधे मिळत नाहीत.  थोडक्यात काय तर काही Problems साठी उपाय असतात पण सगळ्याच problems साठी उपाय नसतात. 

काही काही problems साठी Astrological उपाय नसतात पण Practical way-outs किंवा व्यावहारिक उपाय असतात. आता तुम्ही म्हणाल कि हे कसं असतं?.. हे सगळं उदाहरणं आणि अनुभवातून सांगणं फार सोप जाईल म्हणून काही उदाहरणं तुमच्यासाठी देत आहे. (उदाहरणातील नावं हि बदललेली नावं आहेत, खरी नावं दिलेली नाहीत )

१) सुदीपची पत्रिका बघितल्यावर मी त्याला सांगितल कि अमुक अमुक काळात Job मधे तुझ्यावर False Allegations / खोटे आरोप होण्याची शक्यता आहे म्हणजेच तू एखाद काम केलेलं असताना सुद्धा तू ते केल नाहीस असा आरोप होऊ शकतो किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा तुला मिळू शकते. "आता ह्याच्यावर उपाय काय?" सुदीपने विचारल, मी म्हंटल "Astrologically काहीही उपाय नाही पण Practical way-out आहे. तो म्हणजे तू त्या काळात जे जे काही काम करशील त्याच always Proof ठेवायचं, Proof हे एखादं Document/Email किंवा साधा SMS देखील असू शकतो, म्हणजे त्या काळात तुझ्यावर खोटे आरोप झाले तरी तुझ्याकडे तुझ्या कामाचं proof आधीपासूनच असल्यामुळे ते "खोटे" आरोप "खरे" ठरणार नाहीत. म्हणजेच Proof ठेवल्यामुळे तू ह्या Problems मधून मार्ग काढू शकशील. दुसरं महत्वाच म्हणजे ह्या काळात एखाद्या colleague वर जास्त विश्वास ठेऊ नकोस कारण तो देखील आयत्या वेळेला त्याच मत बदलू शकतो."

२) निकिता एक स्वतः एक आयुर्वेदिक Doctor होती आणि तरीही माझ्याकडे येउन स्वतःच्या Health Problem विषयी प्रश्न विचारात होती. मी तिची पत्रिका बघितली आणि म्हंटल "तू स्वतः जरी आयुर्वेदिक डॉक्टर असलीस तरी तुझ्या पत्रिकेत Homeopathy तुला लागू होण्याच्या Indications जास्त आहेत so तू तुझ्या कुठल्याही health problems साठी आयुर्वेदापेक्षा Homeopathy try कर, त्यांनी तुला जास्त उपयोग होईल." त्यावर ती म्हणाली कि मी जरी आयुर्वेदिक Doctor असले तरी मी already Homeopathy Medicine घेतेय. मी म्हंटल "Yes, this is correct, तेच continue कर"

३) "माझा मुलगा अभ्यासात अजिबात Interest घेत नाही हो, दहावीचं वर्ष असून सुद्धा हा जास्ती तास अभ्यास करत नाही. ह्यासाठी काही उपाय आहे का?" Mrs जोशी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाविषयी विचारात होत्या. मी पत्रिका बघितली, सिंह लग्न सिंह रास, पत्रीकेतली गोम माझ्या लक्षात आली. मी म्हंटल "तुमचा मुलाची Intelligence Level वगैरे चांगली आहे पण तो Hyper Active आहे म्हणजे अशा लोकांना सतत काहीतरी physical activity लागते, तुम्ही म्हणाल कि एका  जागी बसून ४ तास अभ्यास कर, तर तो करणार नाही. त्याला एका दिवसात अनेक Physical Activity द्या आणि मग अभ्यास करायला सांगा आणि त्याच Grasping चांगलं असल्यामुळे थोडा वेळ अभ्यास केली तरी तो पुरेल, १० तास अभ्यास करायची गरज नाही." त्यावर Mrs जोशी "हो, हे आहे, तो Sports मधे खूप interested आहे पण आता दहावीच वर्ष म्हणून आम्ही जरा त्याला Sports कमी कर अस सांगतोय" मी म्हंटल "हे त्याला सांगू नका, अशा लोकांना त्यांच्यातल्या Energy च Application पाहिजे असत आणि तस नाही झालं तर मग आदळआपट करतात. Actually दोन्ही गोष्टी करून त्याचा Balance करायला सांगा, तो पुस्तकातला किडा होणार नाही"

४) "आम्हाला मुल कधी होईल? आणि त्यासाठी काही उपाय आहे का?" माझ्यासमोर बसलेलं एक couple विचारत होतं. दोघांच्याही पत्रिकेत मुल होण्यासाठीच्या Indications होत्या म्हणून मी त्यांना म्हंटल कि तुम्हाला मुल १००% होईल पण late indications आहेत आणि जो काही कालावधी होता तो सांगितला. त्यावर त्यांनी विचारल "तरी पण काही उपाय असता तर बरं झाल असत" मी म्हंटल "उपाय नाही पण काही Practical way-outs आहेत ते सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट कि तुम्हाला मुल होण्यासाठी "More than one medication" चा जास्ती उपयोग होईल, म्हणजे एकाच वेळेला Allopathy & Homeopathy  किंवा एकाच वेळेला Allopathy & आयुर्वेदिक treatment घेयच्या, ह्याचा मुल होण्यासाठी जास्त उपयोग होण्याच्या indications आहेत. दुसरं म्हणजे तुमच्या पत्रिकेत Young Doctor च्या Treatment चा उपयोग होण्याच्या indications जास्त आहेत so शक्यतो तसाच Doctor बघा, Male Female कोणीही चालेल", त्यावर ते म्हणाले कि आम्ही या दोन्ही पैकी काहीच केलेल नाही. मी म्हंटल "हे दोन्हीहि करा, त्याचा जास्त उपयोग होईल"

५) Married Life मधल्या Problems विषयी विचारण्यासाठी एक मुलगी आली होती. दोघांच्या पत्रिका मी बघितल्या आणि म्हंटल "दोघांच्या पत्रिकेत Divorce चे chances अजिबात वाटत नाही, so Divorce होणार नाही, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी जास्त adjust करावं लागेल, तो फार adjust करणार नाही" त्यावर ती म्हणाली "हो, ते मी Already करतेच आहे पण ह्यावर काही उपाय आहे का?" मी म्हंटल "उपाय नाही पण Practical way-out आहे त्यांनी adjustment करण थोडं सुसह्य होऊ शकेल, तो असा कि तुमच्या नवरयाला भरपूर Ego आहे, तेंव्हा त्याचा Ego hurt न करता आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करून घ्या. म्हणजे त्याच्याशी Diplomatically वागा, एखादी गोष्ट Directly सांगू नका, नाहीतर तो अजिबात करणार नाही. एखाद्या पेहलवानाला मी जर Order दिली किंवा हुकुम सोडला कि अमुक अमुक काम कर तर तो अजिबात कारण नाही पण त्याच्या शरीरयष्टीची तारीफ करून नंतर हवं ते काम त्याच्या कडून करून घेणं सोपं असतं, हे देखील तसच आहे" 

अशी हि Practical way-outs ची काही उदाहरणं.. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यातली काही इथे दिलेली आहेत. जिथे एखाद्या गोष्टीवर काही Astrological उपाय नसतो तिथे हे Practical way-outs ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या माणसाच्या खूप उपयोगाला येऊ शकतात हे मात्र नक्की !  

अभय गोडसे



Thursday 18 July 2013

घरातूनच पैसे हरवतात तेंव्हा.. 

 

ज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो? किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं? प्रश्न जरी दोन असले तरी उत्तर मात्र एकच.. अडचण आल्यावर ! असेच एक जण माझ्याकडे आले, एरवी बाहेर ज्योतिषशास्त्राविषयी शंका घेणे आणि गरज पडली कि मात्र ज्योतिषाचा सल्ला घेणे अशी दुटप्पी वागणूक असणारे काही लोक असतात, हे देखील त्यापैकीच एक होते.. अशा लोकांचा मला थोडासा(?) रागच येतो.. पण हि व्यक्ती Client नसून चांगल्या ओळखीचीच असल्यामुळे त्यांना मी काही जास्त बोललो नाही.. असो !

ती व्यक्ती "अरे काही दिवसांपूर्वी मला एकाकडून मिळालेली एक रक्कम मी घरातल्याच एका
कपाटात नेहमीच्या कप्प्यात ठेवली होती आणि आता बघतो तर ती कुठेच मिळत नाही, ह्या बाबतीत पत्रिकेवरून आपल्याला काही कळू शकतं का?" मी म्हंटल "हो बघुया ना, पण मला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाणच लागेल" इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि ९५% Astrologers हे असे प्रश्न, प्रश्नकुंडली वरूनच बघतात पण Somehow ह्या प्रश्नाची उतरं जन्मकुंडलीच देऊ शकेल अस मला खूप Strongly वाटत म्हणून मी असे प्रश्न नेहमी जन्मकुंडलीवरूनच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली.. वाचकांच्या माहितीसाठी आणि विशेषत: ज्योतिष अभ्यासकांसाठी, त्यांची जन्मकुंडली खाली देत आहे..



हा प्रश्न जुन २०१३ ला विचारला होता, त्या वेळेला ह्या पत्रिकेला शुक्र महादशा, राहू अंतर्दशा आणि शनी विदशा सुरु होती, जानेवारी २०१३ ते जुलै २०१३, प्रश्न विचारला तेंव्हा शनी वक्री होता, पण जन्मकुंडलीत शनि मार्गीच आहे आणि तो देखील लाभात, Cusp Chart मधे देखील मागे 10th house मधे जात नाही.. तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात आहे, Cusp Chart मध्ये बुध 9th house मधे जात आहे So विदशा स्वामी शनी १,५,६,९,१०,११  या स्थानाचा कार्येश होतो, ११ चा बलवान कार्येश होतो, १२th house लागतच नाही म्हणजे पैसे मिळणार हे निश्चित, म्हणून मी त्यांना सांगितल कि नुकसान होणार नाही, पैसे मिळतील ! प्रश्न विचारला तेंव्हा शनि वक्री होता आणि शनी साधारण फेब्रुवारी २०१३ ला वक्री झाला होता आणि त्यांच्या पत्रिकेत शनीचा एवढा Strong संबंध होता म्हणून मी त्यांना विचारल कि पैसे Feb. २०१३ च्या आधी मिळाले होते कि नंतर? आणि पैसे मिळाले तेंव्हा शनिवार होता का? त्यावर ते म्हणाले कि साधारण फेब्रुवारी २०१३ च्या आसपास पैसे एकाला उधार दिले होते आणि त्यांनी ते परत आणून दिले आणि आणून दिले तो वार शनिवारच होता ! दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीची तूळ रास आहे म्हणजे साडेसाती देखील सुरु आहे, म्हणजे शनीचा सबंध परत परत येत होता, ह्या पत्रिकेत शनी विदशा ६ आणि ११ ची कार्येश होते, 6th house हे समोरच्या माणसाचे व्यय स्थान आणि 11th house हे लाभ स्थान, उसने दिलेले पैसे परत मिळाले होते आणि ते देखील शनी वक्री असताना म्हणजे शनी नुकसान नक्की करणार नाही, म्हणजे पैसे मिळणारच ह्या बाबतीत माझी खात्री झाली आणि आता शनी वक्री असल्यामुळे हा घोळ झाला आहे हे देखील कळलं म्हणून मी त्यांना म्हंटल कि पैसे नक्की मिळतील, नुकसान होणार नाही ! आणखी एक गोष्ट, शनीचा संबंध वयस्कर व्यक्तीशी आहे, त्यांच्या घरात स्वतः हि व्यक्ती सोडून दुसरी कोणी वयस्कर व्यक्ती नाही, So, पैसे शोधण्यासाठी ह्या व्यक्तीने स्वतःच पुढाकार घ्यावा, हे देखील आलंच !

शनी ८ जुलै ला मार्गी होत होता म्हणून त्याच्यानंतर पैसे मिळतील अस वाटतंय अस मी त्यांना सांगितल.. हा प्रश्न साधारण जून च्या दुसरया आठवडयात विचारला होता शनीचा संबंध असल्यामुळे उशीर होणार हे देखील ओघाने आलंच, इथे सुद्धा अंकशास्त्रानुसार ८ आकड्याचा संबंध शनीशी आहेच ! 

हे सगळ बोलणं झाल्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि ९ जुलै ला त्यांचा मला सकाळी सकाळी फोन "अभय, Good Morning आणि Good News, पैसे मिळाले rather सापडले, ज्या कपाटात मी ठेवले होते त्याच कपाटात शोधता शोधता मिळाले" त्यावर मी "आता कळल ना ज्योतिषशास्त्र खरं असतं ते !" अस म्हणण्याचा मोह आवरत फक्त "अरे वा, बरं झालं, गुड" एवढच म्हंटल !

ता.क. : मी हा लेख लिहित असताना हीच व्यक्ती काही वेगळ्या कामासाठी माझ्याकडे येउन गेली, हा हि एक योगायोग !

अभय गोडसे

My Websites  www.Kpjyotish.com   www.AbhayGodse.com


My Facebook Profile  


 

Monday 8 July 2013

काही विचित्र Cases

काही विचित्र Cases

Astrology Consultation करत असताना काही विचित्र Cases देखील समोर येतात, काही काही Cases तर इतक्या विचित्र असतात कि आपण कधी ऐकलेल्या देखील नसतात. अशाच काही Cases बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. 


पहिली Case :

हि Case खरोखरच खूप विचित्र आणि दुर्मिळ आहे. माझे एक परदेशस्थ Client. आई वडील आणि दोन मुलं, एक मुलगा एक मुलगी, सगळं अगदी व्यवस्थित सुरळीत सुरु होतं. दोघे मोठे झाल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.… आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही भावंडांची लग्न एकदम ठरली आणि एकाच वर्षी दोन्ही भावंडांची लग्न झाली. सगळे अगदी आनंदात होते.  लग्न झाल्यापासून दोन वर्षातच दोघांच्याहि Married Life मधे Problems सुरु झाले… पुढे खूपच प्रोब्लेम्स झाले आणि दोघांनीही (भावाने त्याच्या बायकोपासून आणि बहिणीने तिच्या नवऱ्यापासून ) घटस्फोट घ्यायचं ठरवलं आणि परत आश्चर्य असं कि दोघांचाही घटस्फोट एकाच वर्षी झाला ! आता तुम्हाला वाटेल कि हेच विचित्र आणि दुर्मिळ आहे ! हे तर आहेच पण खरी विचित्र आणि दुर्मिळ गोष्ट पुढे आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर थोड्याच कालावधीत दोघांच्या Life Partners नी एकमेकांशी लग्न केल, म्हणजे भावाच्या बायकोने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं !


दुसरी Case :

एक Love Affair झालं आणि पुढे ते Break झालं अशी ढिगानी उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो, पण काही काही Couples चं लग्न होण्याचे योग नसले कि गोष्टी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याचं हे एक उदाहरण. माझा एक उत्तर भारतीय Client. तो २१-२२ वर्षांचा असताना एका मुलीशी त्याचं Affair झालं. पुढे आई वडिलांच्या Objection मुळे दोघांच लग्न होऊ शकलं नाही, affair break झालं आणि पुढे दोघांच लग्न वेगवेगळ्या व्यक्तींशी झालं,  त्यानंतर १० वर्षांचा काळ लोटला आणि अचानक त्या दोघांची पुन्हा एकदा योगायोगाने एका शहरात भेट झाली, परत दोघांचा Contact वाढला, बोलाचाली आणि भेटागाठी सुरु झाल्या.. परत दोघांना असं वाटू लागलं कि अजूनही आपल्याला एकमेकांबद्दल ओढ वाटते आहे, लहान असताना आई वडिलांच्या पुढे आपल काही चाललं नाही पण आता आपण अजूनही एकमेकांशी लग्न करू शकतो. ठरलं ! दोघांनीही आपापल्या जोडीदाराला घटस्फोट घेऊन एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं.. दोघांनीही आपापला divoce file केला आणि काही काळानंतर दोघांचाही divorce झाला. त्यानंतर Divorce मिळाल्यापासून ते Remarriage हा जो काळ होता त्या काळात त्या मुलीचं त्या मुलाविषयी काहीतरी Misunderstanding झालं आणि त्या मुलीने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला आणि आता ती मुलगी दुसरयाच एका मुलाशी लग्न करतेय आणि हा मुलगा तर आपल्या बायकोपासून घटस्फोट घेऊन बसलाय.. एकमेकांशी लग्न होण्याचे योग नसले तर गोष्टी कुठल्या थरापर्यंत जातात ह्याचंच हे एक दुर्मिळ उदाहरण .. 

अभय गोडसे

www.Kpjyotish.com

www.AbhayGodse.com


Monday 24 June 2013

आत्महत्या ? छे , अजिबात नाही !


आत्महत्या ? छे , अजिबात नाही !

हल्ली आत्महत्येच्या बातम्या वारंवार पेपरात येत असतात, नैराश्याच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणीही हि कृती करून बसतो. विशेषतः एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली कि बरेच वेळेला लोकांना आत्महत्येबद्दल शंका येते.  अशा बऱ्याच Cases येत असतात, त्यापैकीच एक Case इथे देत आहे.  


साधारण ५०-५५ वर्षांचे एक जण एके दिवशी अचानक घर सोडून निघून गेले, त्यांचा एक नातेवाईक माझ्याकडे त्यांची पत्रिका दाखवण्यासाठी आला. ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि बरेचसे  Astrologers असे प्रश्न प्रश्नकुंडली वरून जास्त बघतात पण मी हे प्रश्न किंवा कुठेलेही प्रश्न बहुतेक वेळेला जन्मकुंडलीवरूनच बघतो, Somehow जन्मकुंडलीच ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते असं मला वाटतं म्हणून मी जन्मकुंडलीच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली. त्या नातेवाईकांची पहिली भीती आत्महत्येविषयीचीच होती पण पत्रिका Threat to Life अजिबात दाखवत नव्हती त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला धोका नव्हता. त्यामुळे मी म्हंटल कि हि वक्ती जरी घर सोडून गेली असली तरी आता सुखरूप आहे. हे ऐकून त्यांच्या नातेवाईकाला जरा Relief मिळाला. त्यापुढे मी म्हंटल कि हा माणूस आत्महत्या करणार नाही कारण आत्महत्या करण्यासाठी जी हिम्मत लागते ती ह्या माणसामध्ये नाही. आत्महत्या करणं म्हणजे चणे दाणे खाण्याइतकं सोप नाही त्यासाठी एक प्रकारची हिम्मत, धडाडी लागते आणि ती ह्या माणसाजवळ नाही. 

इथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो कि कुठलीही पत्रिका हातात आल्यानंतर Astrologer नी भविष्य सांगण्याच्या आधी प्रत्येक पत्रिकेचा Nature Analysis केला पाहिजे, माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याशी सांगड घालणं सोप जातं, याचा अर्थ माणसाचा स्वभाव त्याच भविष्य ठरवतो असा अजिबात नाही तर भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करतात येतात. ह्या Case मध्ये त्या माणसाचे तुळ लग्न व मीन रास होती, त्यामुळे ह्या व्यक्तीत धडाडीचा अभाव होता. मी म्हंटल कि हि व्यक्ती परत नक्की येईल पण थोडा Late होण्याच्या Indications आहेत, पत्रिकेनुसार ती व्यक्ती घरी परत येण्याचा जो काही काळ होता तो मी सांगितला आणि म्हंटल कि Late झाला तरी घरी परत येईल हे नक्की ! तुम्ही शोध घेतला तरी आत्ता त्याचा काही उपयोग होणार नाही ! 


तुळ लग्न व मीन रास आणि पत्रिकेतल्या इतर काही गोष्टींमुळे ती व्यक्ती खूप Emotional वाटत होती, म्हणून मी त्यांना म्हंटल कि हि व्यक्ती घरी परत आल्यावर पुन्हा अस काही करू नये यासाठी ह्यांना Emotions मध्ये अडकवा म्हणजे ह्यांना Emotional Blackmailing करा ! जेव्हा हे घरी नव्हते तेंव्हा इतर Family Members ना किती आणि कसा त्रास झाला हे त्यांना सांगा किंवा अस काहीही करा ज्यामुळे ते Emotionally घराला बांधलेले राहतील. हि Trick भविष्यात नक्की उपयोगी पडेल !

त्यानंतर नातेवाईकांचा शोध तर सुरूच होता. असाच काही महिन्यांचा काळ गेला आणि ती व्यक्ती आपणहून घराकडे आली. आर्थिक Problem आल्यामुळे आणि Emotional असल्यामुळे Depression / Frustration लवकर आलं होतं आणि त्यात ती व्यक्ती घर सोडून गेली होती. 

पत्रिका कुठलीही असो, माणसाचा स्वभाव आणि त्याच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी यांची सांगड घातली कि मग भविष्यात अचूकता येते !

इथे एक मुद्दा परत सांगावासा वाटतो ,
व्यक्तीचा स्वभाव ओळखणं म्हणजे त्याच भविष्य ओळखणं नव्हे ! माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याची सांगड घालणं सोप जातं, भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करता येतात.

व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य/नशीब ह्यात खूप तफावत असू शकते. Scientist होण्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीत असून सुद्धा नशिबात नसेल तर ती व्यक्ती आयुष्यभर Clerk राहू शकते. अमिताभ बच्चन पेक्षा जास्ती Acting Skills असलेली माणसं भारतात असतील पण अमिताभ बच्चन बनणे एखाद्याच्याच नशिबात असतं !


अभय गोडसे

 www.Kpjyotish.com

www.AbhayGodse.com

 

आपण आपले अभिप्राय/मतं देऊ शकता.

 

Thursday 30 May 2013

एक Missing Case

एक Missing Case


बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेंव्हा मी नुकतंच Professional Astrology Consultation सुरु केलं  होतं.  माझे एक Client दिल्लीला राहत होते, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, चौकोनी कुटुंब ! एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता ! अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय?………  म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का?, Office मधे किंवा आणखी कुठे? पण तसं काहीच नाही अस ते म्हणाले, म्हणजे अपहरणाची शक्यता कमी होती. त्याच वेळेला त्याच्या पत्रिकेत मंगळाचा देखील Strong संबंध होता. ज्या दिवशी मी हे बघत होतो त्या दिवशी सोमवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, म्हणून मी त्यांना म्हंटल कि उद्या तुम्हाला या मुलाचा ठावठिकाणा कळेल किंवा मुलगा परत येईल पण उद्यापर्यंत काही माहित होईल असं वाटत नाही. 

सोमवारी काही माहित होऊ शकणार नाही हे कळल्यावर ते थोडे निराश झाले पण शोधाशोध सुरु ठेवली. सोमवारची सगळी रात्र नातेवाईक आणि इतर सगळ्यांनी शोधाशोध करण्यात घालवली.  सोमवारची रात्र संपून मंगळवारची पहाट झाली.. त्यांचा एक नातेवाईक अशीच शोधशोध करत करत पहाटे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर पोचला आणि अचानक बाकावर बसलेला तो मुलगा त्यांना समोर दिसला. त्यांनी लगेच घरी कळवलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं…. पण आता प्रश्न होता कि हा मुलगा एकटा तिकडे काय करत होता, मुळात घरापासून इतका लांब गेलाच कशासाठी? कारण काय?…………. तो घरी येउन वातावरण शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं कि तो ज्या क्लासला जात होता तिकडे थोडेच दिवसापूर्वी परीक्षा झाली होती आणि त्याच दिवशी त्याचा Result लागला होता पण Marks कमी पडले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना हे समजलं तर ते ओरडतील , मारतील, ह्या भीतीने ते टाळण्यासाठी तो संध्याकाळीच घर सोडून गेला होता………… अशा प्रकारे ह्या घटनेशी वडिलांचा नेमका काय संबंध होता हे आता सगळ्यांनाच कळलं होतं !

अभय गोडसे

Monday 27 May 2013

Made for each other..

 Made for each other...

आपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येक जण कधीनाकधी कुठेनाकुठे कुणाच्यातरी प्रेमात पडला असेलच. पण त्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालं  का? बहुतेक लोक "नाही" असंच उत्तर देतील ! आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रेमप्रकरण बघतो, त्यातल्या किती लोकांची एकमेकांशी लग्न होतात? खूप थोडी ! पण काही लोकांच्या बाबतीत एकमेकांशीच लग्न होणं हे लिहिलेलं असतं, अशाच एका केसबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.. 

नेहमी माझ्याकडे स्वतःसाठी येणारे माझे एक Client एके दिवशी त्यांच्या एका Relative ची पत्रिका दाखवायला आले. मुलगी Doctor होती, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण तिचं एक love Affair होतं आणि त्यात काही अडचणी आहेत असे ते म्हणाले, त्या संबंधी त्यांना काही गोष्टी विचारायच्या होत्या. मी म्हंटल कि मुलाचे accurate birth details लागतील. त्यांनी मुलाचे birth details दिले, मी दोघांच्या पत्रिका बघितल्या. दोघांच्याही पत्रिकेत married life व इतर वैवाहिक सुखाच्या दृष्टीने लागणाऱ्या गोष्टी अगदी चांगल्या होत्या. मी म्हंटल कि दोघांच्याही पत्रिकेत Married Life उत्तम आहे. दोघांनी लग्न केलं तर Married Life मधे काहीच Problem वाटत नाही. त्यावर ते म्हणाले कि ते दोघेही खूप चांगले आहेत, पण त्यांच लग्न होण्यातच problem आहे. मुलीच्या आई वडिलांचा या लग्नाला खूपच विरोध आहे. 

मी परत पत्रिका बघितल्या आणि त्यांना सांगितल कि या दोघांचा एक commom time period मागच्या महिन्यापासून सुरु झाला आहे जो लग्नासाठी खूपच strong आहे, तसंच ह्या दोघांच्या पत्रिकेत अशी एक link/धागा आहे कि ह्याचं लग्न एकमेकांशीच होईल. म्हणजेच हे Made for each other आहेत. 

ते म्हणाले कि नाही हो हिचे आई वडील हे लग्न होऊन देणार नाहीत. मी म्हंटल हे बघा कि जेंव्हा दोघांच लग्न एकमेकांशीच होण्याच्या Indications इतक्या Strong आहेत तेंव्हा हिचे आई वडीलच काय पण जगातलं कोणीही आडव आलं, तरी ह्यांचच लग्न एकमेकांशी होईल ! ते म्हणाले कि तुम्ही हे सगळ जे आत्ता मला सांगितलत ते मुलीच्या आई वडिलांना सांगाल का? कदाचित त्याचा काही उपयोग होईल. त्यांनी मुलीच्या आईला फोन लावला, मी मुलीच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, त्यावर त्या बाईंनी मला विचारल कि हे लग्न होऊ नये ह्यासाठी काही उपाय आहे का? (इथे लोकं लग्न होण्यासाठी उपाय विचारतात तर हि बाई लग्न होऊ नये यासाठी उपाय विचारत होती, लोकं आपल्या हट्टासाठी कुठल्या थराला जातात याच हे एक उदाहरण, असो ! ) मी म्हंटल कि एखाद लग्न होऊ नये यासाठी उपाय नसतो आणि असला तरी मला माहित नाहीये ( आणि मनात म्हंटल कि माहित असला तरी तो मी तुम्हाला सांगणार नाही ). शेवटी त्यांना म्हंटल कि हे बघा तुम्ही ह्या लग्नाला Objection घेऊ नका कारण तुम्ही या लग्नाला कितीही Objection घेतलंत तरी जेव्ह्ना ह्या दोघांच लग्न होण्याच्या Indications Strong आहेत तेंव्हा हे लग्न होणारच ! हे ऐकल्यावर त्या थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या आणि मला म्हणाल्या कि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते पण तुमच्या समोर बसलेल्या आमच्या नातेवाईकाला Please सांगू नका, त्या म्हणाल्या कि आमच Objection असून सुद्धा ह्या दोघांनी मागच्या महिन्यात already Court Marriage केलयं ! हे ऐकून मी फोनवर त्यांना फक्त एवढच म्हंटल कि आता कळलं ना कि मी "काय" आणि "का" सांगत होतो ते !

अभय गोडसे

महत्वाचं 
१ ) वरील उलेख केलेल् Made for each other हे काहीच पत्रिकांमध्ये आढळत. सगळ्याच पत्रिकांमध्ये आढळत नाही.  
२  ) Made for each other हे फक्त लग्न  "होण्यासंबंधित" आहे, याचा वैवाहिक सौख्याशी संबंध नाही. 


ज्योतिष अभ्यासकांसाठी :

Made for each other साठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत,
१ ) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमात असलेली रास हि दुसऱ्याची (
मुलगा किंवा मुलगी ) लग्नरास किंवा चंद्ररास असणे


२ ) एकाचा (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी ज्या राशीत आहे ती दुसऱ्याच्या (मुलगा किंवा मुलगी ) पत्रिकेची लग्नरास किंवा चंद्ररास असणे. 

३) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी and/or महादशा, ज्या प्रकारचा जोडीदार दाखवत असेल त्या वर्णनाशी जुळणारी दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी ) असणे.

४ )  वरील एक, दोन्ही  किंवा तिन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर दोघांचे Common good time period for Marriage असणे खूप महत्वाचे आहे. एकाचा लग्नाचा period २० १ ३ आणि दुसऱ्याचा २ ० १ ८ असे असेल तर दोघांचे एकमेकांशी लग्न होणार नाही !





माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...