ज्योतिष मार्गदर्शन हे दैवी मदतीशिवाय अपूर्ण असतं. ज्योतिष हा काही फक्त आकड्यांचा किंवा नुसत्या राशींचा खेळ नव्हे. अचूक मार्गदर्शन हे दैवी मदतीनेच शक्य होतं. हे दैवी संकेत कसेही मिळू शकतात. एखादा विचार त्याच वेळेस प्रकर्षाने जाणवणे, एखादी action काहीतरी सांगून जाते. असेच दैवी मदतीचे मला आलेले काही अनुभव इथे सांगतोय, जरूर वाचा.
#1
दोन वेळा घटस्फोट झालेल्यांच्या पत्रिका मला एका ग्रुपवर टाकायच्या होत्या. अशा एका क्लायंटच नाव त्याचे birth details सॉफ्टवेअरमधे शोधण्यासाठी हवं होतं पण काही केल्या ते नाव मला आठवत नव्हतं. एक तास झाला.. दीड तास झाला.. तरी नाव आठवेना.. विचार करून त्रास व्हायला लागला आणि तेव्हढ्यात माझ्या मोबाईलवर एक कॉल आला, एक रिंग वाजली आणि कट झाला. फोन उचलून बघितलं तर truecaller ने एक नाव दाखवलं आणि आश्चर्य म्हणजे हे तेच नाव होतं जे मी मघाच पासून आठवण्याचा प्रयत्न करत होतो. विशेष म्हणजे त्या नंबर वरून मला परत फोन आला नाही आणि आडनाव जरी सारखं असलं तरी तो त्या क्लायंट चा नंबर नव्हता.
#2
एका आयुर्वेदिक डॉक्टरची पत्रिका बघत होतो. मुलं होण्याविषयी प्रश्न होता. त्या संबंधात उत्तरं देऊन झाली आणि ज्योतिष नियमानुसार असं लक्षात आलं कि ह्या बाईचा अन्नाविषयी (चुकीच्या खाण्याविषयी) काहीतरी प्रॉब्लेम आहे. तशी कल्पनाही मी त्यांना दिली पण तरीही exactly काय प्रॉब्लेम्स आहे हे कळत नव्हतं. दोन मिनिटं गेल्यावर अचानक माझ्या डोक्यात हजार वॅटचे ब्लब लागले आणि असं प्रकर्षाने जाणवलं कि गोड पदार्थांविषयी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या स्वतः डॉक्टर असून सुद्धा मी त्यांना 'गोड जास्ती खाऊ नका त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार आहेत' असं सांगितलं, त्यावर त्या लगेच म्हणाल्या "हो, मी गोड खूप खाते पण आता कमी करेन"
#3
लग्नाचं स्थळ..
आता हा किस्सा ज्योतिष मार्गदर्शनाच्या वेळचा नसून माझ्या स्वतःच्या लग्नासाठी मुली बघतानाचा आहे. एक स्थळ आलं, मुलीचं दिसणं, शिक्षण, नोकरी ह्या सगळया गोष्टीत नावं ठेवायला जागा नव्हती, सगळं व्यवस्थित. मुलीला पहिल्यांदा भेटलो, नेहमीप्रमाणे चहा पोह्याचा कार्यक्रम सुरु होता, सगळं ठीक वाटतं होतं. चहा पिऊन झाल्यावर त्या मुलीने कपबशी टीपॉयवर ठेवली आणि तिची ती action बघून मला एकदम प्रकर्षाने Negativity जाणवली आणि असं वाटलं कि हि मुलगी Liability होणार ! तिच्या actions मधे practically बघता काहीच दोष नव्हता तरीही काहीतरी प्रकर्षाने निगेटिव्ह जाणवलं पण काय ते माहित नव्हतं. आईबाबांची पुढे जायची तयारी होती पण शेवटी मी नकार दिला. हि घटना घडून साधारण एक दीड वर्ष झालं असेल, एके दिवशी त्या मुलीचा फोटो आम्हाला वर्तमानपत्रातल्या 'निधन वार्ता' सदरात दिसला आणि आम्ही उडालो.. blood cancer मुळे त्या मुलीचं निधन झालं होतं. समजा लग्न केलं असतं तर?
#4
'ग' अक्षराचा डॉक्टर..
क्लायंटच्या health problem संदर्भात पत्रिका बघत होतो. पत्रिका बघताना असं लक्षात आलं कि ह्याला 'ग' ह्या अक्षराने नावं सुरु होण्याऱ्या डॉक्टरचा उपयोग जास्त होणार आहे. मी त्यांना तसं सांगितलं आणि नावांच उदाहरणं देताना 'गणेश' हे नावं त्या वेळेला माझ्या डोक्यात प्रकर्षाने आलं म्हणून ते सांगितलं. त्यावर त्याला आश्चर्य वाटलं कारण 'गणेश' नावाच्याच डॉक्टरची ट्रीटमेंट तो पूर्वी घेत होता पण काही कारणाने ती थांबवावी लागली होती, ती लगेच पुन्हा सुरु करा असं मी सांगितलं.
#5
इस्टेट..
"मला वडिलोपार्जित इस्टेट मिळेल का?" असा एका क्लायंटचा प्रश्न बघत होतो. त्याच्या पत्रिकेत वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत होते पण पूर्ण हक्क मिळेल असं दिसत नव्हतं म्हणून मी म्हंटल कि हि संपत्ती मिळण्यात काही अडचण आहे का? असं विचारल्यावर त्याने भावाची पत्रिका समोर ठेवली. त्या पत्रिकेविषयी बोलत असताना एकदम मी म्हंटल कि तुमच्या भावाला तुमचा हिस्सा द्येयचा नाहीये कारण तो म्हणतोय मी आईवडिलांच सगळं केलंय आणि बाहेरगावी बसलेल्या तुम्हाला काय म्हणून हिस्सा द्येयचा. हे माझं वाक्य ऐकून तो क्लायंट म्हणाला "अहो तो खरंच अगदी असंच म्हणतोय." हे वाक्य त्या वेळेला मला सुचलं किंवा प्रकर्षाने जाणवलं असं म्हणता येईल.
#6
एक मुलगी पहिल्यांदाच माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन आली आणि मी पत्रिका बघण्याच्या आधीच तिने तिची रिलेशनशिप कशी ब्रेक झाली ते सांगायला सुरुवात केली. ते ऐकून झाल्यावर मी म्हंटल "पण, हि तुमची पहिली रिलेशनशिप नाही आणि शेवटची पण नाही, त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुमची परत एकदा रिलेशनशिप होणार आहे". हे ऐकून ती म्हणाली "हे सगळं खरं आहे पण तुम्हाला हे पत्रिका न बघताच कसं कळलं?" त्या मुलीला बघून तिचा शुक्र बिघडलेला आहे अशी जाणीव झाली आणि म्हणून मी ते बोललो होतो.
अभय गोडसे,
For Appointment, Visit
KPJyotish.com
AbhayGodse.com