Thursday 23 November 2017

लग्न - समज गैरसमज !


लग्न ! आयुष्यातील एक महत्वाची घटना ! आपलं लग्न यॊग्य वयात व्हावं, चांगला जोडीदार मिळावा, हे प्रत्येकालाच वाटतं पण अनुप {नाव बदललं आहे} त्याला अपवाद होता. माझ्याकडे येऊन लग्नासंबंधी विचारणारया अनुपला लग्न करायचंच नव्हतं हे विशेष. मी त्याच्या पत्रिकेनुसार लग्नासंबंधीच्या गोष्टी सांगून झाल्यावर अनुप म्हणाला "म्हणजे माझं लग्न होणार आहे? पण मला तर लग्नच करायचं नाहीये". मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. लोकं इथे लग्न कधी होईल, बायको/नवरा कसा मिळेल हे विचारण्यासाठी येतात आणि हा प्राणी, लग्न होणार नाहीये ना, हे विचारण्यासाठी आला होता, असो ! मी म्हंटलं "हो, लग्न तर १००% होणार आहे". अनुप म्हणाला "हे तर शक्यच नाही, मला लग्नच करायचं नसेल तर मग होईलच कसं?". मी म्हंटलं कि आता ह्याला ह्याच्याच भाषेत उत्तर देयला हवं. अनुपनी थोडयाच महिन्यांपूर्वी जॉब चेंज घेतला होता. मी म्हंटलं "ठीक आहे, मग मला सांगा ६ महिन्यांपूर्वी तुम्ही जॉब चेंज घेतलाय, ह्याचा अर्थ आजपासून ३ वर्ष आधी तुम्हाला माहित होतं कि तुम्ही जॉब चेंज घेणार आहात" अनुप म्हणाला "नाही, हे सगळं अचानकच या वर्षी झालं". आया उंट पहाड के नीचे. मी म्हंटलं "अहो मग ३ वर्षांनी काय होणार होतं हे जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं तर मग आयुष्यभर लग्न होणार नाही हे तुम्ही कुठल्या आत्मविश्वासावर सांगू शकता?". अनुप विचार करू लागला, मी म्हंटलं "तुम्हाला लग्न करायचं नाहीये पण तुमची पत्रिका लग्न दाखवतेय, ह्याचा अर्थ असा कि जरी आत्ता काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला नाही म्हणत असलात तरी जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा काहीना काही कारणांमुळे तुम्ही लग्नाला हो म्हणणार आणि लग्न होणारच. जेव्हा एखादी घटना घडणारच असते तेंव्हा त्यासाठी लागणारे प्रयत्न हे देखील होणारच". 

ह्या गोष्टीला ४ वर्ष उलटून गेली आणि एके दिवशी हाच अनुप माझ्याकडे "मूल कधी होईल" हे विचारण्यासाठी आला, तेंव्हा मी म्हंटलं "काय? झालं ना लग्न?". अनुप होकारार्थी मान हलवत हसून "हो" म्हणाला !

हा फक्त अनुपचा नाही तर अनेक लोकांचा गैरसमज असतो कि मी प्रयत्न केलेच नाहीत तर घटना घडणारच नाही. जेव्हा घटना घडणार असेल तेंव्हा प्रयत्न हे आपसूक होणारच. परीक्षेत चांगले मार्क मिळणार असतील तर अभ्यास चांगला होणारच. लग्नाच्या बाबतीत काही मुली/मुलं असही विचारतात कि आम्हाला कोणाचाच होकार येत नाही, पण जेव्हा लग्नाचा स्ट्रॉंग काळ येईल तेंव्हा कोणी ना कोणीतरी हो म्हणणार आणि लग्न होणारच ! लग्नाच्या बाबतीत आणखी एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे "वय". वय वाढलं तर लग्न होणार नाही हा असाच एक गैरसमज. एक उदाहण घेऊ, २८ वर्षाच्या एका मुलीला १०० स्थळं आली पण तेंव्हा जर लग्नाचा काळ सुरु नसेल तर एकाही मुलाशी लग्न ठरणार नाही. आता समजा त्या मुलीचं वय ३५ झालं आणि तेंव्हा जर लग्नाचा स्ट्रॉंग काळ सुरु असेल तर २ स्थळं जरी आली तरी त्यातल्या एकाशी लग्न ठरेल, शेवटी एका वेळेला एकच लग्न करायचंय ना ! १०० स्थळं आली कि २ आली ह्याला तेंव्हा काहीच अर्थ उरत नाही.

"अमुक मुलीशी लग्न केलं तर मला भरपूर पैसा मिळेल का?" हा असाच एक गैरसमजातून आलेला प्रश्न. मुळात एखादा मुलगा किती पैसे मिळवेल हे इतर कोणाच्याही पत्रिकेवर अवलंबून नसून केवळ त्याच्या स्वतःच्या पत्रिकेवर अवलंबून असतं. बिल गेट्सनी मेलिंडा गेट्सशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, अमिताभने जयाशी लग्न केलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, ते त्यांच्याच पत्रिकेत असावं लागतं. 

Arranged Marriage कि Love marriage हा असाच एक गमतीशीर विषय आहे. बरेच मुलं मुली आपल्या सोयीनुसार marriage हे arranged आहे कि love ते ठरवतं असतात. म्हणून मी दोन्ही प्रकारच्या लग्नांच्या वाख्या केल्या आहेत ज्याद्वारे हा घोळ संपुष्टात येईल, त्या खालील प्रमाणे,

When the First meeting of a boy & a girl happens WITH the intention of marriage, it's called as Arranged Marriage.

When the First meeting of a boy & a girl happens WITHOUT the intention of marriage, it's called as Love Marriage.  

Arranged Marriage मधे अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे ह्याची धास्ती काही जणांना (विशेषतः मुलींना) वाटते. दोघांच्या पत्रिकेत Married life आणि Match Making चांगलं असेल तर घाबरण्याच कारण नाही. Love marriage मधे दोघं एकमेकांना अनेक वर्ष ओळखत असून सुद्धा घटस्फोट होतातच कि, उलट तिकडे हे प्रमाण जास्त आहे. 

ह्या सगळ्या समज गैरसमजातून पार होऊन एकदा शुभमंगल सावधान झालं कि अनेक मुलामुलींचा जीव भांडयात पडतो. 


अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
 

Tuesday 14 November 2017

शिक्षण बिक्षण





प्रविण (नाव बदललं आहे) माझ्यासमोर बसला होता. अठरा वर्षांखालील मुले असतील तर मी त्यांच्या आईवडिलाना देखील येण्याची परवानगी देतो त्यामुळे त्याचे आईवडील देखील त्याच्याबरोबर आले होते. "अहो सर, आमचा मुलगा बिलकुल अभ्यास करत नाही हो" इती प्रवीणचे आईवडील. हा साधारण प्रत्येक आईवडिलांचा डायलॉग असला तरी इथे केस सिरीयस होती कारण यावर्षी तो फेल होता होता वाचला होता. मी पत्रिकेत डोकं खुपसलं. पत्रिका तर चांगल्या हुशार मुलाची वाटतं होती, म्हणजे "बुद्धी" हा प्रॉब्लेम नक्कीच नव्हता. चतुर्थ स्थान हे शिक्षणासाठी बघितलं जातं आणि ४, ९, ११ ही स्थाने शिक्षणासाठी चांगली मानली जातात पण इथे चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी आणि महादशा नेमकी विरोधी स्थानं दर्शवीत होती. त्यामुळे हि महादशा असेपर्यंत तरी शिक्षणात चांगली प्रगती दिसत नव्हती. तसेच पत्रिकेत शुक्राचा प्रभाव खूप जास्ती दिसत होता. शुक्र हा बर्यापैकी उच्शुंखल ग्रह आहे त्यामुळे थिअरॉटिकल किंवा अकॅडेमिक एजुकेशन ह्यात काहीच रस असण्याची चिन्हे नव्हती. पत्रिकेतल्या आणखी एका गोष्टीने माझं लक्षं वेधलं आणि ती गोष्ट म्हणजे "हायपर ऍक्टिव्हिटी". मी म्हंटलं "मुलाला मैदानी खेळाची खूप आवड आहे का? आणि प्रॅक्टिकल परीक्षेत नीट मार्कस मिळवतो ना !" आईवडिलांनी त्याला दुजोरा दिला आणि फुटबॉलची खूप आवड असल्याच सांगतलं. मी त्यांना समजवणाच्या सुरात म्हंटलं "प्रॉब्लेम हा बुद्धीचा नसून इंटरेस्ट चा आहे, ह्याला थेअरी चा कंटाळा आहे आणि म्हणून तो अभ्यास करत नाही आणि दुर्दैवाने भारतातील शिक्षण पद्धती ही जास्त अकॅडेमिक आहे, प्रॅक्टिकल नाही.  त्यामुळे खूप चांगल्या मार्कस ची अपेक्षा ह्याच्याकडून ठेऊ नका नाहीतर अपेक्षाभंगच होईल. दहावी नंतर ह्याला एखाद्या प्रॅक्टिकल कोर्से ला घाला जिथे थेअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्त आहे. तसेच ह्याच्या स्पोर्ट्स खेळण्याला प्रोत्साहन द्या, त्यात हा चांगली प्रगती करेल. पत्रिकेत टेक्निकल शिक्षण दर्शवित आहे पण थेअरी चा प्रॉब्लेम आहे म्हणून डिप्लोमा इन इंजिनीरिंग चालेल, डिग्री नको ". हे ऐकून मुलाचे आईवडील थोडे निराश झाल्यासारखे वाटले कारण त्यांना मुलाला CA किंवा डॉक्टर करायचा होता. 

प्रत्येक आईवडील त्यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलासाठी एक स्वप्न बघतात, बहुतेक वेळा स्वतः ची  अपूर्ण राहिलेली स्वप्न मुलाच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात गैर काहीच नाही पण ते हे विसरतात कि प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. सगळीच मुलं जर CA आणि डॉक्टर व्ह्यायला लागली तर मग अमिताभ बच्चन, आशा भोसले किंवा सचिन तेंडुलकर कोण होणार? सगळेच धोपट मार्गाने जात नाहीत. 

आपला मुलाने जर चांगले मार्क्स मिळवले नाहीत तर त्याच करियर बरबाद होणार, हा असाच एक गैरसमज ! बिल गेट्सच ऍकेडेमिक एजुकेशन अर्धवट राहिलंय तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत झालाच ना ! आणि कितीतरी पीचडी केलेले सर्वसाधारण आर्थिक स्थितीत असतात, माशा मारणारे डॉक्टर्स देखील आहेतच ना ! शिक्षण आणि करियर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जो पर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत मुलांना मार्क्ससाठी त्रास देणारे पालक असणारच. ह्याचा अर्थ शिक्षणाला महत्व देऊ नये असा अजिबात नाही पण मार्क्सचा अट्टाहास देखील नको, मुलाचा कल ओळखून मगच पुढे जावं. आज असे अनेक प्रविण असतील जे शिक्षण बिक्षण ह्यापेक्षा इतर गोष्टीत प्राविण्य मिळवत असतील, त्यांना देखील प्रोत्साहनाची गरज आहेच !   

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
 

Friday 3 February 2017

Employee निवडताना

Employee निवडताना..

अशोक (माझे एक जुने client) यांचा मला फोन आला "गोडसे सर, एका गोष्टीसाठी तुमची Appointment पाहिजे." अशोक यांचा इंजिनीरिंग क्षेत्रात business होता, त्यामुळे मला वाटलं कि नेहमी प्रमाणे धंद्यातल्या काही नवीन इन्व्हेस्टमेंट वगैरे संदर्भात विचारायचं असेल. पण यावेळी काही वेगळंच विचारायचं होतं, ते म्हणाले "मला एका माणसाला माझ्या कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून नेमायचं आहे". मी "बरं मग?", अशोक "हया माणसाला सेल्स फील्ड मधला दांडगा अनुभव आहे, हा माणूस मला माझ्या कंपनीत हवा आहे, पण, जर हा माणूस माझ्या कंपनीत सलग ३-४ वर्ष राहणार असेल तर आणि तरच मी ह्याला घेणार आहे. मला सलग ३-४ वर्ष कंपनीसाठी काम करेल असा माणूस हवा आहे, हे तुम्ही सांगू शकता का?". मी "हो नक्कीच, पण, त्यांचे Birth Details Available आहेत ना !". अशोक "हो, मी आधीच घेऊन ठेवलेत".  अशोक त्या माणसाची पत्रिका घेऊन आले. पत्रिका बघताना अस लक्षात आलं कि, पुढच्या २ वर्षात ह्या माणसाला एका खूप मोठया कंपनीतून (large scale & well known company) ऑफर मिळण्याच्या indications आहेत तसेच हा माणूस आजिबात प्रामाणिक नाही, त्यामुळे अशोक यांच्या अपेक्षा हा माणूस पूर्ण करू शकणार नाही. अशोक यांना हे सगळं मी सांगितलं आणि ते आभार मानून निघून गेले. पुढे काही दिवसांनी अशोक यांनी सांगितलं कि तो माणूस आता Abroad नोकरी करतो, त्याला आधीपासून Abroad च जायचं होतं पण नोकरी मिळत नव्हती म्हणून तो माझी job ऑफर घेयला तयार झाला होता, त्यामुळे तो माझ्याकडे जास्ती काळ नक्कीच राहिला नसता, ३-४ वर्ष तर लांबचीच गोष्ट झाली. 

हा झाला फक्त एक अनुभव पण पुष्कळ वेळा मला अस आढळलंय कि चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं काम करत असतात. Man Management अजिबात येत नसताना माणुस management पोस्ट वर फक्त seniority च्या basis वर नेमला जातो, तसच marketing ability शून्य असताना फक्त MBA केलंय म्हणून घेतला जातो आणि मग तो काम करताना inefficient ठरतो. कंपनीच भवितव्य हे कंपनीत काम करणारया लोकांवर अवलंबून असतं. चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं नेमली गेली तर कामकाज बिघडणारच !

पत्रिकेच्या आधारे हे नक्की कळू शकतं कि एखाद्या माणसात नक्की कुठली skills आहेत आणि तो कशा प्रकारे कंपनीला फायदेशीर ठरू शकतो. Interview घेतानाच्या थोड्याशा वेळात प्रत्येक व्यक्तीची पारख नीट होऊ शकत नाही पण त्या आधी पत्रिकेच्या माध्यमातून जर काही inputs घेऊन ठेवलेली असतील तर मांणसांची निवड करताना खूप सोपं जाऊ शकतं हे मात्र नक्की !  पत्रिकेच्या माध्यमातून मिळालेल्या पॉईंट्स नुसार interview मधे त्याला प्रश्न विचारून खात्री करून घेतली जाऊ शकते. त्याचे weak points कुठले आणि strong points कुठले, हे देखील कळू शकतं, फक्त ते जाणून घेण्याची इच्छा मात्र मालकाला पाहिजे. काही काही कामं अशी असतात जिथे secrecy maintain करण्याची गरज असते, तिथे तो माणूस प्रामाणिक आहे ना याची खात्री करावी लागते, प्रामाणिकपणाच कुठलीही लायसेन्स नसतं. ह्या सगळया गोष्टी तपासून घेतल्या जाऊ शकतात.  काही वेळेला एखादं डिपार्टमेंट सांभाळताना दोन माणसांचा समन्वय चांगला असणे गरजेचं असतं, त्या दोन माणसांचच जर एकमेकांशी पटत नसेल तर कामकाजाचा बट्याबोळ होवू शकतो. त्या ठिकाणी कुठली दोन माणसे नेमावीत हे देखील पत्रिकेच्या माध्यमातून तपासून घेतलं जाऊ शकतं. इथे जागा अपुरी पडेल इतक्या गोष्टी सांगता येतील पण शेवटी योग्य पोस्टवर योग्य माणूस असणं हे अतिशय महत्वाचं ठरतं, म्हणून आधीच काळजी घ्यावी employee निवडताना..  

अभय गोडसे 
For consultation,  Visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...