Thursday 30 May 2013

एक Missing Case

एक Missing Case


बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेंव्हा मी नुकतंच Professional Astrology Consultation सुरु केलं  होतं.  माझे एक Client दिल्लीला राहत होते, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, चौकोनी कुटुंब ! एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता ! अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय?………  म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का?, Office मधे किंवा आणखी कुठे? पण तसं काहीच नाही अस ते म्हणाले, म्हणजे अपहरणाची शक्यता कमी होती. त्याच वेळेला त्याच्या पत्रिकेत मंगळाचा देखील Strong संबंध होता. ज्या दिवशी मी हे बघत होतो त्या दिवशी सोमवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, म्हणून मी त्यांना म्हंटल कि उद्या तुम्हाला या मुलाचा ठावठिकाणा कळेल किंवा मुलगा परत येईल पण उद्यापर्यंत काही माहित होईल असं वाटत नाही. 

सोमवारी काही माहित होऊ शकणार नाही हे कळल्यावर ते थोडे निराश झाले पण शोधाशोध सुरु ठेवली. सोमवारची सगळी रात्र नातेवाईक आणि इतर सगळ्यांनी शोधाशोध करण्यात घालवली.  सोमवारची रात्र संपून मंगळवारची पहाट झाली.. त्यांचा एक नातेवाईक अशीच शोधशोध करत करत पहाटे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर पोचला आणि अचानक बाकावर बसलेला तो मुलगा त्यांना समोर दिसला. त्यांनी लगेच घरी कळवलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं…. पण आता प्रश्न होता कि हा मुलगा एकटा तिकडे काय करत होता, मुळात घरापासून इतका लांब गेलाच कशासाठी? कारण काय?…………. तो घरी येउन वातावरण शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं कि तो ज्या क्लासला जात होता तिकडे थोडेच दिवसापूर्वी परीक्षा झाली होती आणि त्याच दिवशी त्याचा Result लागला होता पण Marks कमी पडले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना हे समजलं तर ते ओरडतील , मारतील, ह्या भीतीने ते टाळण्यासाठी तो संध्याकाळीच घर सोडून गेला होता………… अशा प्रकारे ह्या घटनेशी वडिलांचा नेमका काय संबंध होता हे आता सगळ्यांनाच कळलं होतं !

अभय गोडसे

Monday 27 May 2013

Made for each other..

 Made for each other...

आपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येक जण कधीनाकधी कुठेनाकुठे कुणाच्यातरी प्रेमात पडला असेलच. पण त्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालं  का? बहुतेक लोक "नाही" असंच उत्तर देतील ! आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रेमप्रकरण बघतो, त्यातल्या किती लोकांची एकमेकांशी लग्न होतात? खूप थोडी ! पण काही लोकांच्या बाबतीत एकमेकांशीच लग्न होणं हे लिहिलेलं असतं, अशाच एका केसबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.. 

नेहमी माझ्याकडे स्वतःसाठी येणारे माझे एक Client एके दिवशी त्यांच्या एका Relative ची पत्रिका दाखवायला आले. मुलगी Doctor होती, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण तिचं एक love Affair होतं आणि त्यात काही अडचणी आहेत असे ते म्हणाले, त्या संबंधी त्यांना काही गोष्टी विचारायच्या होत्या. मी म्हंटल कि मुलाचे accurate birth details लागतील. त्यांनी मुलाचे birth details दिले, मी दोघांच्या पत्रिका बघितल्या. दोघांच्याही पत्रिकेत married life व इतर वैवाहिक सुखाच्या दृष्टीने लागणाऱ्या गोष्टी अगदी चांगल्या होत्या. मी म्हंटल कि दोघांच्याही पत्रिकेत Married Life उत्तम आहे. दोघांनी लग्न केलं तर Married Life मधे काहीच Problem वाटत नाही. त्यावर ते म्हणाले कि ते दोघेही खूप चांगले आहेत, पण त्यांच लग्न होण्यातच problem आहे. मुलीच्या आई वडिलांचा या लग्नाला खूपच विरोध आहे. 

मी परत पत्रिका बघितल्या आणि त्यांना सांगितल कि या दोघांचा एक commom time period मागच्या महिन्यापासून सुरु झाला आहे जो लग्नासाठी खूपच strong आहे, तसंच ह्या दोघांच्या पत्रिकेत अशी एक link/धागा आहे कि ह्याचं लग्न एकमेकांशीच होईल. म्हणजेच हे Made for each other आहेत. 

ते म्हणाले कि नाही हो हिचे आई वडील हे लग्न होऊन देणार नाहीत. मी म्हंटल हे बघा कि जेंव्हा दोघांच लग्न एकमेकांशीच होण्याच्या Indications इतक्या Strong आहेत तेंव्हा हिचे आई वडीलच काय पण जगातलं कोणीही आडव आलं, तरी ह्यांचच लग्न एकमेकांशी होईल ! ते म्हणाले कि तुम्ही हे सगळ जे आत्ता मला सांगितलत ते मुलीच्या आई वडिलांना सांगाल का? कदाचित त्याचा काही उपयोग होईल. त्यांनी मुलीच्या आईला फोन लावला, मी मुलीच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, त्यावर त्या बाईंनी मला विचारल कि हे लग्न होऊ नये ह्यासाठी काही उपाय आहे का? (इथे लोकं लग्न होण्यासाठी उपाय विचारतात तर हि बाई लग्न होऊ नये यासाठी उपाय विचारत होती, लोकं आपल्या हट्टासाठी कुठल्या थराला जातात याच हे एक उदाहरण, असो ! ) मी म्हंटल कि एखाद लग्न होऊ नये यासाठी उपाय नसतो आणि असला तरी मला माहित नाहीये ( आणि मनात म्हंटल कि माहित असला तरी तो मी तुम्हाला सांगणार नाही ). शेवटी त्यांना म्हंटल कि हे बघा तुम्ही ह्या लग्नाला Objection घेऊ नका कारण तुम्ही या लग्नाला कितीही Objection घेतलंत तरी जेव्ह्ना ह्या दोघांच लग्न होण्याच्या Indications Strong आहेत तेंव्हा हे लग्न होणारच ! हे ऐकल्यावर त्या थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या आणि मला म्हणाल्या कि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते पण तुमच्या समोर बसलेल्या आमच्या नातेवाईकाला Please सांगू नका, त्या म्हणाल्या कि आमच Objection असून सुद्धा ह्या दोघांनी मागच्या महिन्यात already Court Marriage केलयं ! हे ऐकून मी फोनवर त्यांना फक्त एवढच म्हंटल कि आता कळलं ना कि मी "काय" आणि "का" सांगत होतो ते !

अभय गोडसे

महत्वाचं 
१ ) वरील उलेख केलेल् Made for each other हे काहीच पत्रिकांमध्ये आढळत. सगळ्याच पत्रिकांमध्ये आढळत नाही.  
२  ) Made for each other हे फक्त लग्न  "होण्यासंबंधित" आहे, याचा वैवाहिक सौख्याशी संबंध नाही. 


ज्योतिष अभ्यासकांसाठी :

Made for each other साठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत,
१ ) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमात असलेली रास हि दुसऱ्याची (
मुलगा किंवा मुलगी ) लग्नरास किंवा चंद्ररास असणे


२ ) एकाचा (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी ज्या राशीत आहे ती दुसऱ्याच्या (मुलगा किंवा मुलगी ) पत्रिकेची लग्नरास किंवा चंद्ररास असणे. 

३) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी and/or महादशा, ज्या प्रकारचा जोडीदार दाखवत असेल त्या वर्णनाशी जुळणारी दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी ) असणे.

४ )  वरील एक, दोन्ही  किंवा तिन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर दोघांचे Common good time period for Marriage असणे खूप महत्वाचे आहे. एकाचा लग्नाचा period २० १ ३ आणि दुसऱ्याचा २ ० १ ८ असे असेल तर दोघांचे एकमेकांशी लग्न होणार नाही !





Thursday 23 May 2013

कलेचा आठवा रंग

कलेचा आठवा रंग …… 


सैफ अली खानचा करीनाशी पुनर्विवाह झाला, किशोर कुमार यांची संपूर्ण आयुष्यात ४ लग्न झाली, लता मंगेशकर याचं लग्नच झालेल नाही.. 


आता तुम्ही म्हणालं कि ह्या सगळ्याचा संबंध काय?………….  आहे, संबंध आहे ! तुम्ही जर ज्योतिषाविषयी थोडं फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल कि कलेचा संबंध हा ज्योतीष शास्त्रात शुक्राशी आहे. थोडक्यात, शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे, त्याचप्रमाणे तो स्त्री आणि वैवाहिक सौख्याचा देखील कारक ग्रह आहे. तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखं याचा देखील कारक आहे. जेंव्हा एखादा माणूस कला क्षेत्रात पुढे येतो तेंव्हा त्याच्या पत्रिकेवर शुक्राचा अंमल जास्त असतो, जो त्याला उपजत कलागुण देतो, त्यात नैपुण्य मिळवून देतो. पण त्याच वेळेला शुक्राच्या अमलाखाली येणाऱ्या इतर बाबतीत म्हणजे लग्न आणि विवाह सौख्य, या बाबतीत एक प्रचंड "उणीव" निर्माण करतो, विवाह सौख्य मिळू देत नाही.  आता तुम्ही म्हणाल कि हे अस कसं?…  सांगतो ! 

निसर्गाचा सगळ्यात मोठा नियम आहे तो म्हणजे "समतोल साधणे" ! जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया देखील असतेच, ऐके ठिकाणी मातीचा डोंगर झाल्यास नक्की समजावं कि कुठेतरी खड्डा झालेला आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांना परत पावसाळ्यात पालवी फुटते, उन्हाळा पावसाळा हि दोन्हीही निसर्गाचीच रूपं ! एका हाताने निसर्ग जेव्ह्ना देतो तेंव्हा दुसरया हाताने काहीतरी काढून देखील घेतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है" हा देखील निसर्ग नियमच, मग त्याला ग्रह तारे तरी अपवाद कसे असणार?

पत्रिका  बघत असताना काही वेळेला अस देखील पाह्यला मिळतं कि एखाद्या मुलीला नोकरीत भरपूर यश देणारा ग्रहच तिला सासूकडून त्रास दाखवत असतो. एखादा ग्रह जेंव्हा एखाद्या बाबतीत चांगली फळ देतो तेंव्हा त्याच्याच अमलाखाली येणाऱ्या इतर काही बाबतीत काही उणीव निर्माण करतो, शुक्रच्याही बाबतीत असच आहे. तुम्ही जर कलेच्या प्रांतात कार्यरत असलेल्या लोकांच्या आयुष्यावर नजर टाकलीत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि त्यांच्या वैवाहिक सुखात प्रचंड कमतरता आढळते, घटस्फोट, नवरा बायकोच अजिबात न पटण, विवाह बाह्य संबंध, Live in Relationship मध्ये राहणे, एखाद्या स्त्रीने विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणे, असे असंख्य प्रकार कलावंताच्या आयुष्यात थैमान घालत असतात. हेमामालिनीने धर्मेंद्रशी केलेलं लग्न, श्रीदेवीने बोनी कपूरशी केलेलं लग्न, अनेक वर्षांनी झालेला अमीर खानचा घटस्फोट ! अशी असंख्य उदाहरणं आहेत, नुसती नावं घ्यायची म्हंटल तरी अखं पान भरेल. 

आता तुम्ही म्हणाल कि फक्त सिनेमा-नाट्य कलाकारांच्याच बाबतीतच असं आढळत का ? मुळीच नाही, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलेच्या क्षेत्रातील दिगज्जांची नावं आठवून बघा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नजर टाका, तिथेही हाच प्रकार आढळेल ! हे देखील फक्त नावाजलेल्या कलाकारांच्याच बाबतीत आढळत असंही नाही, फारशा प्रसिद्धीस न आलेल्या कलाकारांच्या बाबतीत देखील हे होतच असतं, फक्त ते कलाकार प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती होत नाही एवढंच ! माझ्या घटस्फोट घेणाऱ्या कलावंत मित्राला मी एकदा गमतीने म्हंटल कि तुझे जितके जास्ति घटस्फोट होतील तितका तू जास्ती मोठा कलावंत होशील ! 

शुक्र हा सौंदर्याची आवड, मुक्त विचारसरणी, छान छौकी, ऐश करणे इत्यादी गोष्टीही दर्शवतो. त्यामुळे कलाकार हा कधी साचेबंध आयुष्य जगताना किंवा धोपट मार्गाने जाताना आढळत नाही. चित्रविचित्र Fashion करणे, त्यात सतत बदल करणे, त्याचप्रमाणे अत्यंत बेताल वागणे, वेळ काळाचे भान सोडून वागणे, ह्या सगळ्या गोष्टी जणू काही त्यांच्या अंगी बाणलेल्याच असतात. शुक्र तारा हा ज्या प्रमाणे संध्याकाळी उगवतो तसा ह्या कलाकारांच्या दिनक्रम हा संध्याकाळी सुरु होऊन दुसरया दिवशी पहाटे संपतो असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. ह्या सगळ्यामुळेच कि काय बरेचसे कलाकार हे विक्षिप्त ह्या विभागात मोडले जातात. 

शुक्र हा मादक पेयांचा देखील कारक असल्यामुळे व्यसनं नसलेला कलाकार विरळाच! अति मद्य सेवनामुळे नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळी ढिगांनी आढळतील. आता स्पर्धेचं युग असल्यामुळे यात बराच फरक पडलाय. शुक्र हा दिखाऊपणाचा कारक त्यामुळे हिरोचं काम करणारा कलाकार हा खऱ्या आयुष्यात व्हिलन असू शकतो आणि सिनेमात व्हिलनचं काम करणारा कलाकार हा प्रत्यक्षात चांगला असू शकतो. दिखाऊपणा करण्यामध्ये खोटी स्तुती करणे वगैरे ह्या गोष्टी आल्याच. शुक्र हा पैसा व श्रीमंतीचा देखील कारक, त्यामुळे, चित्रपटसृष्टी हा झटपट पैसे मिळविण्याचा एक महत्वाचा स्रोत आहे ! इथे रोडपती चे करोडपती झाल्याची उदाहरणं देखील बरीच आढळतात. शुक्र हा मोहात पडणारा ग्रह आहे त्यामुळे चित्रपट नाट्यसृष्टी विषयी लोकांना प्रचंड आकर्षण असत. हे सगळ फार सोपं आहे, अशी एक धारणा असते पण प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे, असा असतं. कारण यासाठी वेळी अवेळी जेवण, आड निडे दौरे, राजकारण, Performence , Retakes , यासारख्या गोष्टीतून जावे लागते !

शुक्र हा तसा उच्श्रुंखल ग्रह त्यामुळे बहुतौंशी कलाकार हे अंत्यत बेफिकीर, परिणामांची पर्व न करणारे , प्रचंड मनस्वी , तितकेच हळवे , उडावू वृत्तीचे , उथळ असतात. अर्थातच बुद्धीजीवी कलावंत, निर्व्यसनी कलावंत , असे काही अपवाद आहेतच, पण फारच थोडे !

ज्याप्रमाणे शुक्राच्या बाबतीतला आयुष्यातला हा समतोल आहे त्याचप्रमाणे तो इतर ग्रहांच्या बाबतीतही असतो पण तो फारसा जाणवण्याइतपत नसतो म्हणून तो लगेच नजरेत भरत नाही एवढंच ! कलाकारांच्या बाबतीतल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याआधीहि माहित असतील पण ते तसं का असत हे कदाचित माहित नसेल. 

कलेचा सप्तरंगी अविष्कार हा प्रत्येकालाच माहित असतो पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून उलगडलेला हा असा कलेचा आठवा रंग !


Astrologer अभय गोडसे 
Book Appointment online,

ज्योतिषशास्त्राविषयी थोडसं ..

ज्योतिष Consultation करत असताना बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, अनेक लोकं अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, अशाच प्रश्नांपैकी एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे "ज्योतिष हे जर शास्त्र आहे तर मग दोन ज्योतिषी एकाच पत्रीकेविषयी वेगवेगळी मतं कशी काय देतात?" अशा प्रश्न मला विचारला कि मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो " जर Medical हे Science आहे तर मग दोन डॉक्टर एकाच Patient विषयी वेगवेगळी मतं का देतात?, पहिला डॉक्टर सांगतो कि Operation करावाच लागेल, तर दुसरा डॉक्टर सांगतो कि नुसत्या औषाधानीच बरे वाटू शकेल..  तसेच जर law/कायदा same आहे तर मग एक वकील case हरतो आणि तीच case दुसरा वकील जिंकतो, हे कसे काय?"................................ ह्याचाच अर्थ कि Medical हे जरी Science असले तरी त्याची accuracy हि त्या त्या डॉक्टर वर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ज्योतिष हे जरी शास्त्र असलं तरी त्याची Accuracy हि त्या त्या ज्योतिषावर अवलंबून असते. ज्योतिषातील Accuracy हि  ज्योतिषी व्यक्तीच्या खालील गोष्टीवर अवलंबून असते,
1) Logic
2) Intelligence level
3) knowledge of Astrology & other subjects as well
4) Experience
5) Intuition

 वरील गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट जरी Missing असेल तरी Accuracy जाऊ शकते.. 

ह्याचावर एक पुढचा प्रश्न असा विचारला जातो कि "मग आम्ही चांगला ज्योतिषी शोधायचा कसा?" परत माझा प्रतीप्रश्न "तुम्ही चांगला डॉक्टर कसा शोधता?" एक तर त्या डॉक्टर विषयी सगळी माहिती घेऊन नाहीतर मग आपल्या ओळखींच्यापैकी कोणीतरी Reference दिल्यामुळे आणि तिसरा मार्ग म्हणजे स्वतः अनुभव घेऊन ! मग चांगला ज्योतिषी देखील तसाच शोधावा !!

असाच एक दुसरा प्रश्न ज्योतिषाला विचारला जातो तो म्हणजे "ग्रह तारे तर पृथ्वीपासून इतके लांब आहेत मग त्यांचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा काय होतो?"  ह्या बाबतीत दोन विचारधारा आहेत, पहिली विचारधारा अस मानते कि ग्रह directly परिणाम करतात जशी सूर्यापासून उष्णता मिळते वगैरे .. दुसरी विचारधारा अस मानते ग्रह हे फक्त गोष्टी Indicate करतात .. हि जास्त संयुक्तिक विचारधारा आहे. जन्माच्या वेळेस वर आकाशात ग्रहांची जी काही स्थिती असते ती काहीतरी दर्शवत असते.. म्हणजे कसं ? आपण वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याला सगळ्या बातम्या कळतात, वास्तविक वर्तमानपत्रामुळे घटना घडत नाहीत पण वर्तमानपत्रामुळे घटना माहिती होतात, अगदी तसच पत्रिकेच्या बाबतीत असत. पत्रिका किंवा ग्रह घटना घडवत नाहीत पण पत्रिका किंवा ग्रहांमुळे घडणाऱ्या घटना माहित होतात.. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला ग्रहांची जी स्थिती असते ती स्थिती म्हणजे पत्रिका आणि ती स्थिती काय दर्शवते हे ओळखण्याच साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र !

म्हणजेच पत्रिका हे जर आयुष्याचं एक वर्तमानपत्र मानलं तर त्याची भाषा किंवा लिपी म्हणजे ज्योतिष शास्त्र ! हे वर्तमानपत्र घडलेल्या घटनांबद्दल तर माहिती देतंच पण घटना घडायच्याआधी देखील बातम्या देतं बरं का !!


अभय गोडसे


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...