Monday 7 September 2015

Cerebral Palsy (मेंदुचा आजार)

Cerebral Palsy (मेंदुचा आजार)


तीन ते चार वर्षांच्या मुलांच्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारण्यारया Clients ची संख्या तशी कमी असते, पण असते. अशीच एक पत्रिका आली होती, आजार होता Cerebral Palsy (सेरेब्रल पालसि), हा मेंदूचा आजार असून प्रसूती होतेवेळी किंवा प्रसुतीच्या अगोदर मेंदूला इजा झाल्यास हा आजार होऊ शकतो ( अधिक माहितीसाठी वाचकांनी कृपया Google करावं ). 


ह्या आजारामुळे muscle coordination नीट होत नाही. माझ्यासमोर आलेल्या पत्रिकेत माझं पहिल लक्ष गेलं ते बुधाकडे ! बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे, तोच नीच होता आणि लग्नेश देखील होता. ह्यां मुलाला बोलता येत नव्हत. KP method नुसार प्रथम भावाचा उप नक्षत्र स्वामी हा देखील बघतात, तो १,६,१२ ह्या आजारासाठी ओळखल्या जाणारया स्थानांचा कार्येश होता. त्यामुळे आजाराची तीव्रता जास्ती होती.  २०१८ पर्यंत असणारी शुक्र हादशा (काळ) ही देखील भावचलित कुंडली मधे अष्टम भावाची कार्येश होती, ह्याचा अर्थ कि सुधारणा २०१८ पर्यंत तरी वाटतं नव्हती. 



बुध हा ग्रह मीन राशीत निचीचा म्हणून ओळखला जातो, मीन हि रास शरीराच्या "पाय" ह्या अवयवावर येते. ह्या मुलाला चालता देखील येत नव्हत. पण ह्याच मीन राशीत गुरु ग्रह होता जो मीनेत स्वगृही असतो त्यामुळे कदाचित चालण्याबाबतीत भविष्यात थोडीफार प्रगती/सुधारणा होण्याची शक्यता आहे पण वाणीचा कारक बुधच नीच असल्यामुळे बोलण्याच्या बाबतीत प्रगती कठीण वाटत होती.

ह्या पत्रिकेत आणखी एका गोष्टीने माझं लक्ष वेधल, ह्याची रास धनु असल्यामुळे ह्याची साडेसाती नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झालेली होती त्यामुळे आता प्रोब्लेम आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यात अजून ह्याची रास ही सप्तम स्थानात येत असल्यामुळे साडेसाती मध्ये शनिचं भ्रमण हे ६,७,८ ह्या स्थानांमधून होणार होत जी स्थान आजाराची स्थान म्हणून ओळखली जातात. म्हणजेच पुढचा काळ खूपच खडतर जाणार होता. ह्यात आणखी भर घालण्यासाठी ह्या मुलाच्या आईची रास वृश्चिक होती म्हणजे तिला देखील साडेसाती सुरु होतीच, त्यात पुन्हा वडिलांची रास मकर होती, त्यांची साडेसाती जून २०१७ पासून सुरु होणार म्हणजे जुन २०१७ ते डिसेंबर २०१९ ह्या काळात घरातील तिघांनाही साडेसाती असणार होती.   

आता हे एवढं सगळं असताना उपाय उपयोगी पडतील अस वाटत नव्हतं तरी देखील काही उपाय सांगितले, प्रयत्न करण्याने यश मिळेल का नाही हे माहित नसत पण "आपण सगळे प्रयत्न केले " हे मानसिक समाधान तर नक्कीच मिळत. 

सांगितलेले उपाय खालील प्रमाणे,
१) घरातील दोघांना आत्ता साडेसाती आणि पुढे तिघांना साडेसाती असणार होती. मारुती उपासना सांगितली. जेंव्हा ती व्यक्ती स्वतः करू शकत नाही (जसं इथे मुलगा लहान असल्यामुळे) त्यावेळी शक्यतो घरातील ज्याच्या पत्रिकेत शनि strong असेल त्यांनी ती करावी. 

२) ह्या मुलाचे मिथुन लग्न आहे जी "द्विस्वभाव" राशी म्हणून ओळखली जाते तसेच ह्याची चंद्ररास धनु, जी देखील "द्विस्वभाव" रास, मीन राशीत देखील जास्ती ग्रह आणि ती देखील "द्विस्वभाव" राशी, म्हणून त्यांना एकापेक्षा जास्तं (कमीत कमी दोन, "द्वि") उपचार पद्धती (pathy) घ्याव्यात अस सुचवलं जसं allopathy + homeopathy. हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं कि हे असच सुरु आहे. 

3) साडेसाती सुरु होती. शनिवारी शक्यतो कुठ्ल्या Tests किंवा उपचार नकोत. तसच शनी हा अंधाराचा कारक म्हणून कुठल्याही दिवशीच्या रात्रीच्या वेळी जास्त काळजी घ्यावी. 

साहजिकच हे सगळं वाचुन कुणाच्याही मनात प्रश्न येईल कि हे सगळं ह्याच मुलाच्या वाटयाला का आलं? ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं?  पुनर्जन्म न मानणाऱ्या लोकांना ह्याच उत्तर कधीच सापडणार नाही.  

अभय गोडसे

My websites  
www.Kpjyotish.com   www.AbhayGodse.com

Sunday 30 August 2015

॥कालाय तस्मै नम:॥

॥कालाय तस्मै नम:॥

बरेच वेळेला आपण एखादया गोष्टीसाठी प्रचंड मेहनत करतो, अगदी जीव तोडून मेहनत करतो, अहोरात्र् मेहनत करतो. पण तरीही ती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि आपण जेव्हा कंटाळून प्रयत्न सोडून देतो तेव्हा अचानक ती गोष्ट आपल्याला मिळते. या सगळयातून काय प्रतीत होत की ''नसिब' से ज्यादा और वक्त से पहले कुछ नही मिलता'. ज्यांनी जुना वक्त चित्रपट पाहिला असेल त्यांना हे कळेल की 'होत्याचं' 'नव्हतं' व्हायला आणि 'नव्हत्याचं' 'होतं' व्हायला वेळ लागत नाही. थोडक्यात काय तर 'काळ' हा माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा घटक आहे. एखादया गरीब कुंटुंबात जन्मलेला मुलगा हा पुढे जाउन मुख्यमंत्री होतो आणि एखादया गर्भजात श्रीमंतांच्या मुलांना पुढे आर्थिक चणचण भासते. एखादा दहावीपर्यंत अभ्यासात सर्वसाधारण असलेला मुलगा पुढे उच्च-शिक्षण घेतो आणि एखादा दहावीपर्यंत अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मुलगा पुढे शिक्षणात गटांगळया खाताना दिसतो. काळानुसार लोकांची कामाची क्षेत्रं बदलतात. नातेवाईकांशी, मित्रांशी अगदी चांगले असलेले संबंध तुटतात. नवीन लोकांशी घनिष्ट मैत्री होते, वगैरे वगैरे...
एखाद्या व्यक्तिच्या जन्मपत्रिकेत 'काळ' हा घटक मुख्यत्वेकरून 'महादशा अंतर्दशा' या गोष्टीनुसार बघितला जातो. 'महादशा' म्हणजे मोठा काळ आणि 'अंतर्दशा' म्हणजे छोटा काळ. इथे कृपया 'दशा' या शब्दाचा अर्थ वाईट अवस्था असा न घेता फक्त 'काळ' एवढाच घ्यावा. सहाजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा काळ कशावरून ठरतो? त्यातला वाईट काळ कुठला आणि चांगला काळ कुठला? हे सांगायचं झाल्यास असं सांगता येईल, की प्रत्येक ग्रहानुसार फक्त हर्षल, नेपच्यून आणि प्ल्यूटो सोडून त्या त्या ग्रहाचा विशिष्ट असा कालावधी ठरलेला आहे. इथे आधी एक मुद्दा सांगितला पाहिजे तो असा की, महादशांचे अनेक प्रकार ज्योतिषशास्त्रात आहेत. पण सांप्रत विशोत्तरी महादशा साधारण सगळे ज्योतिषी वापरतात. तर मघाशी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक ग्रहाला काही ठराविक कालावधी हा वाटून देण्यात आला आहे. म्हणजे शुक्र 20 वर्षे, रवि 6 वर्षे, चंद्र 10 वर्षे वगैरे वगैरे. अशा या सर्व महादशा मिळून 120 वर्षांच्या असतात. पण कुठली महादशा आधी येईल, आणि कुठली नंतर येईल हे ठरविण्यासाठी एक नियम आहे. तो असा की, व्यक्तीच्या जन्माच्या वेळेस चंद्र ज्या नक्षत्रात असेल, त्या नक्षत्राचा स्वामी आणि चंद्राचा उपनक्षत्र स्वामी हे जे दोन ग्रह असतील तिथपासून महादशा अंतर्दशेला सुरवात होते. तुम्ही म्हणाल की हे जरा अवघड वाटतंय. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास असं म्हणू की, समजा, तुम्ही भारत भ्रमंतीला निघाला आहात, आणि समजा तुम्ही तुमच्या प्रवासाची 'सुरवात' ही उत्तर भारतातून केलीत तर सहाजिकच 'तामिळनाडू' या दक्षिण भारतातील राज्यात तुम्ही उशीरा याल पण समजा, तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरवातच दक्षिण भारतातून केलीत तर 'तामिळनाडू'त तुम्ही लवकर पोहोचाल. महादशा अंतर्दशेच्या बाबतीतही अगदी असंच आहे. तुमची सुरवात कुठून होते, यावर पुढील महादशा, अंतर्दशा अवलंबून असतात.
काही व्यक्तींना काही ग्रहांच्या महादशा लवकर येतील तर दुस-या एखाद्या व्यक्तिला त्याच ग्रहांच्या महादशा उशीरा येतील, किंवा कदाचित येणारच नाहीत. विशोत्तरी महादशा या सगळया मिळून 120 वर्षांच्या असतात. सर्वसाधारण माणसाचं आयुष्यं हे 120 वर्षांचं नसतं. त्यामुळे काही महादशा ह्या एखाद्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात येतच नाहीत. काही वेळेला आपण असं बघतो की एखाद्या व्यक्तीचा एखादा ग्रह हा खूप चांगला आहे, पण नेमकी त्या व्यक्तीला त्या ग्रहाची महादशा ही येतच नाही, किंवा खूप उशीरा येते... ह्यालाच म्हणायचं, त्या त्या व्यक्तीचं नशीब. वेळच्या वेळी सर्व महादशा येणं हे ही अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक गमतीशीर उदाहरण द्यायचं झाल्यास असं म्हणता येईल की, समजा एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक सुखास उत्तम असणा-या एखाद्या ग्रहाची महादशा ही वयाच्या 80 व्या वर्षानंतर किंवा वयाच्या पहिल्या वर्षी येऊन उपयोग नाही, तर ती योग्य वयातच आली पाहिजे. तसंच व्यक्तिच्या करियरसाठी उत्तम असणा-या ग्रहांची महादशा ही वयाच्या 20 ते 60 या वर्षांपर्यंतच आली पाहिजे. वयाच्या, 80 नंतर येऊन उपयोगाची नाही. किंवा वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत असून उपयोगाची नाही. ज्या व्यक्तीची पत्रिका उत्तम असते आणि सगळया महादशा ह्या योग्य वेळी येतात, तेच खरे 'नशीबवान' असतात.
काही काही वेळेला आपल्याला काही गंमतशीर उदाहरणं बघायला मिळतात, म्हणजे एखादी पन्नाशीला किंवा साठीला आलेली व्यक्ती एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन एम्.ए. करत असते. तर काही वयस्कर जोडपी ही आयुष्यभर एकत्र राहून वयाच्या उत्तरार्धात घटस्फोट घ्यायच्या विचारात असतात. मी ऐकलेलं एक उदाहरण फार गंमतशीर आहे. एका व्यक्तीचं लग्न झालं. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला आणि पुढे काही काळानंतर त्या व्यक्तीचं घटस्फोट घेतलेल्या त्याच्या पत्नीशीच पुन्हा लग्नं झालं. या सगळयाचा अर्थ काय तर, योग्य वेळी न आलेल्या महादशा-अंतर्दशा.
एखादी गोष्ट कधी होईल? हे सांगण्यासाठी अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. पण जन्मपत्रिका ही मुळात चांगली हवीच. जन्मपत्रिकेनुसार  घडणा-या वाईट किंवा चांगल्या घटनांचा काळ सांगण्यासाठी आधी मूळात जन्मपत्रिका ती घटना दर्शवीत असायला हवी. ज्या गोष्टी जन्मपत्रिकेत दिसत नाहीत त्या 'कधी होतील', हे बघण्याला अर्थच नाही. मुळात आडात नाही, तर पोह-यात कुठून येणार? या म्हणीसारखं आहे. काही वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत एखाद्या क्षेत्रात नाव मिळण्याचं दिसतं पण, प्रत्यक्षात मात्र बघितलं तर ती व्यक्ती त्या वेळेस वेगळया क्षेत्रात काम करत असते. हे का होतं? तर त्या व्यक्तीची त्या क्षेत्रासाठी असलेली महादशा आलेलीच नसते. ती महादशा पुढे जेव्हा येते तेंव्हा ती व्यक्ती त्या क्षेत्रात पुढे येते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असे किती नट माहीत असतील की जे पूर्वी कोणीतरी पोस्टात कारकून किंवा बस कंडक्टर होते, त्यावेळेस ते 'नट' नव्हते पण, आत्ता आहेत. तसंच कितीतरी उद्योगपती असे आहेत जे पूर्वायुष्यात अक्षरश: कोणीही नव्हते आणि नंतर ते एक यशस्वी उद्योजक झाले आणि त्याचं नाव सगळीकडे झालं.
एखादी घटना कधी घडेल हे सांगणं आणि त्या बाबतीत किती कालावधी चांगला अथवा वाईट आहे, हे सांगणं, हे दोन्हीही महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नट होईल पण, किती काळ गाजवेल हे ही महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं जन्मपत्रिकेतील यश आणि पुढे येणा-या महादशा अंतर्दशा यावर अवलंबून असतं. उदाहरण द्यायचं झालं तर, अमिताभ बच्चन हेही नट झाले. आणि कुमार गौरव हाही नट झाला. पण अमिताभ बच्चन हे आत्ताही काळ गाजवत आहेत, आणि कुमार गौरवचा पत्ताच नाही. एक चित्रपट गाजवणा-या भाग्यश्री पटवर्धनचं नाव सध्या कुठेच नाही. 'किती वर्ष सातत्य राहील' हे देखील महत्त्वाचं ठरतं. आणि हे अवलंबून असतं, पुढे अनुक्रमे येणा-या महादशा अंतर्दशांच्यावर!
तर अशा या महादशा अंतर्दशा व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या असतात हे आपण पाहिलंच. शेवटी काळ हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक ठरतोच, म्हणूनच !! कालाय तस्मै नम:!!

Astrologer अभय गोडसे 
Book Appointment online,

Tuesday 23 June 2015

कौन बनेगा दिग्गज?



कौन बनेगा दिग्गज?

अमित आणि अभिजीत नावाचे दोन मित्र होते. दोघेही एकाच शहरात, एकाच कॉलेजात, एकाच वर्गात होते. दोघेही अभ्यासात तसे बरे होते पण अभिजीतला शिक्षणापेक्षा गाण्यामधे जास्त रस होता. त्याचा आवाज देखील चांगला होता. तर, याउलट, अमितला गाण्यासारख्या वायफळ गोष्टीत अजिबात रस नव्हता. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर, अभिजीतने 'झालं तेवढ शिक्षण पुरे' असं म्हणून शिक्षणाला राम राम ठोकला आणि गाण्यात करिअर करायचं ठरवलं तर अमितने एका बँकेत नोकरी मिळवली आणि कर्ज ठेवीच्या हिशोबात हरवून गेला. आज, काही वर्षांचा काळ उलटल्यानंतर देखील दोघांची मैत्री अजुनही कायम आहे पण अभिजीत यशाच्या पाय-या चढत चढत आज एक आघाडीचा सर्वोत्तम पार्श्वगायक आहे तर अमित आजही त्याच बँकेत ठेवीदारांचे हिशेब ठेवण्यात गर्क आहे. अमितने जर आज कोणाला सांगितले की अभिजीत हा त्याचा चांगला मित्र आहे तर लोक चटकन विश्वास ठेवत नाहीत. थोडक्यात काय, तर अभिजीत आज 'दिग्गज' आहे तर अमित "कोणीही नाही"
दिग्गज म्हणजे एखाद्या क्षेत्रात अत्युच्च पदाला पोहचलेली व्यक्ती. दिग्गज हे फक्त कलेच्या क्षेत्रात किंवा राजकारणातच असतात. असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो तात्काळ दुर करा. दिग्गज हे कुठल्याही क्षेत्रात असु शकतात. ह्रदयरोगतज्ञ नीतु मांडके हे दिग्गज होते. मेधा पाटकर, जयंत नारळीकर, जयंत साळगावकर, बिल गेट्स हे सगळे दिग्गज आहेत. अशी वेगवेगळया क्षेत्रातील नावे सांगता येतील.
दिग्गज होण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्रिकेत काही गोष्टींची नितांत आवश्यकता असते. दिग्गज होण्यासाठी जी एक गोष्ट पत्रिकेत सगळयात महत्वाची असते ती म्हणजे त्या व्यक्तीचं करिअर.
त्या व्यक्तीचं करिअर फक्त चांगलं नाही, तर, खूप चांगलं असावं लागतं तरच ती व्यक्ती 'दिग्गज' होऊ शकते, अन्यथा नाही आणि हे करिअर खूप चांगलं होण्यासाठी सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या आयुष्यात वय वर्ष २० ते ६० यामधे येणारे काळ, या काळांनाच महादशा अंतर्दशा म्हणतात. दिग्गज होण्यासाठी वय वर्ष २० ते ६० यामधले काळ हे चांगलेच असावे लागतात, कारण माणसाचं कार्य करण्याच आयुष्य हे साधारण २० ते ६० मधेच असतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रिकेतील स्थान, पण यासाठी आपल्याला थोडं पत्रिकेच्या तांत्रिक बाबीत खोलात जावं लागेल. दिग्गच होण्यासाठी पत्रिकेतील ३ स्थानं फार महत्वाची असतात. ती म्हणजे दशम स्थान, धन स्थान व लाभ स्थान. दशम स्थान हे कर्म स्थान आहे. व्यक्तीच करिअर ह्या स्थानावरून बघतात, म्हणजे नोकरी, धंदा वगैरे. त्यामुळे ह्या स्थानाच महत्व आहे. धन स्थान म्हणजे नावाप्रमाणेच धन, संपत्तीदर्शक स्थान आहे. दिग्गज होणारी व्यक्ती ही सहसा काही अपवाद वगळता गरीब किंवा मध्यमवर्गीय नसते तर श्रीमंतच असते. त्यामुळे ह्या स्थानाचं देखील महत्व आहे. तर लाभ स्थान हे एक अत्यंत शुभ स्थान तसचं इच्छापूर्तीच स्थान मानलेलं आहे. कुठल्याही घटनेचा संबंध हा जर लाभ स्थानाशी असेल तर अधिक चांगलं, जसं A+, हा जो + आहे, तो म्हणजे लाभ स्थान. तर ही झाली स्थानं, आता दिग्गज होण्यासाठी, २० ते ६० मधल्या महादशा ह्या धन, दशम व लाभ स्थान यांच्याशी अगदी उत्तमरित्या संबंधीत असाव्या लागतात, तरचं ती व्यक्ती दिग्गज होऊ शकते. प्रयत्न आणि कष्ट सगळेच जणं करतात पण सगळेच दिग्गज होत नाहीत, कारण केलेल्या कर्मांच अत्यंत शुभ फल मिळाल्याशिवाय कोणी दिग्गज होऊच शकत नाही आणि हे महान कार्य किंवा महान कर्म आणि त्याचं पुरेपुर फल हे तेव्हाच मिळु शकतं जेव्हा महादशा ह्या दशम व लाभ स्थान उद्दीपीत करतात.
दिग्गज होण्यासाठी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रात असे त्या क्षेत्रासंबंधीत ग्रहाचा पत्रिकेवर खूप अंमल असावा लागतो, हे अशासाठी की एखादी व्यक्ती १० गोष्टीत तरबेज असली तरी एक व्यक्ती एका जन्मात 'एकाच' क्षेत्रात दिग्गज होऊ शकते. काही वेळेला असही होते की एखादी व्यक्ती दिग्गज होण्यापूर्वी एखाद्या वेगळयाच क्षेत्रात कार्यरत असते पण पुढे त्या व्यक्तीचं क्षेत्रं बदलतं आणि त्या क्षेत्रात ती व्यक्ती पुढे दिग्गज होते. डॉ. श्रीराम लागू हे वैद्यकीय शिक्षण घेतलेले पण पुढे कलाक्षेत्रात दिग्गज झाले. माननीय बाळासाहेब ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार होते पण राजकारणात दिग्गज झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. याचा अर्थ एवढाचं की, एखादी व्यक्ती ज्या क्षेत्रात दिग्गज होणार असते त्या क्षेत्राकडे ती आपोआप खेचली जाते.
दिग्गज होण्यासाठी चवथी महत्वाची गोष्ट म्हणजे महादशांचं सातत्य. हे सातत्य. अशासाठी की, एखादी व्यक्ति जेव्हा एखाद्या क्षेत्रात दिग्गज होते, ती काही एका दिवसात होत नाही., तर दिग्गज होण्याच्या कितीतरी वर्ष आधीपासून ती त्या क्षेत्रात कार्यरत असते आणि बराच काळ एखाद्या क्षेत्रात कार्यरत रहाण्यासाठी आवश्यकता असते ती सातत्याची. जर कार्यात खंड पडला तर दिग्गज होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. सातत्यामुळे बडया दिग्गजांची कारकिर्द ही नुसती अखंडीत नसून दिर्घ कारकिर्द देखील आहे. उदा. बाबा आमटे, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन असे अनेक दिग्गज अनेक वर्ष होऊन देखील आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेतच.
काही दिग्गजांच्या पत्रिकेत मात्र आयुष्याच्या उत्तरार्धातल्या महादशा फारशा चांगल्या नसतात त्यामुळे त्या काळात त्यांची पडझड होते, अपयश येतं, आर्थिक स्थिती खालावते वगैरे वगैरे! दिग्गजांचा जो एक तिसरा विभाग आहे., त्यात काही असे दिग्गज आहेत की ज्यांची कारकिर्द आता संपली आहे, ते आता कार्यरत नाहीत पण त्यांची पडझड देखील झालेली नाही, त्यांचे आयुष्य ते मजेत घालवत आहेत, पण, आजही जनंमानसात त्यांच्या पूर्वीच्या कार्याची दखल घेतली जाते. दिग्गज हे कधी (काही अपवाद वगळता) नोकरदार आढळत नाहीत.
यशासारखं फक्त यशच असतं असं कुठेतरी म्हटलेलं आहे. ज्यांच करिअर चांगलं असतं ते जीवनात नक्की यशस्वी होतातंच पण दिग्गज होण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी जुळून येणं वाटते तितके सोपे नाही. पाऊस पडत असताना अथांग सागरात अनेक पावसाचे थेंब पडत असतात पण शिपल्यात पडलेल्या पाण्याच्या थेंबाचाच मोती होतो, बाकीचे थेंब नुसतेच सागराच्या पाण्यात भर घालतात. कुठला थेंब शिंपल्यात पाडायचा आणि कुठला नुसताच सागरात, हे त्या विधात्याच्याच हातात! आपण फक्त पत्रिकेच्या माध्यमातून हे ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो की, कौन बनेगा दिग्गज?

अभय गोडसे


Sunday 29 March 2015

उद्योजकतेच्या जगतात

उद्योजकतेच्या जगतात

अजय आणि धनंजय दोघे एकाच कंपनीत नोकरी करत होते. त्यांचं सगळ सुरळीत चाललं होतं पण दोघांनाही कायम असं वाटायच की, आपण स्वत:चा काहीतरी उद्योगधंदा करावा. त्यासाठी दोघांनीही हळुहळु प्रयत्न सुरु ठेवलेच होते. अशातच, एक दिवशी अजयने नोकरीला रामराम ठोकून स्वत:चा उद्योगधंदा करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अजयनी अगदी छोटया प्रमाणावर आपला उद्योगधंदा सुरु केला, पण पुढे बघता बघता त्याचा उद्योगधंदा वाढत गेला आणि अगदी थोडया कालावधीतच अजयने उद्योगधंद्यात आपलं शिखर गाठलं. धनंजयला देखील अजयचं हे यश बघून चांगलाच हुरुप आला आणि त्याने देखील नोकरी सोडून उद्योगधंद्यात पाऊल ठेवलं उद्योगधंद्यात पाऊल ठेवल्यापासून थोडेच दिवसात धनंजयला अडचणींनी जणू घेरलंचं 'प्रत्येकाला उद्योगधंदा सुरु करतांना सुरुवातीला अडचणी येतातचं' हा विचार करुन धनंजयने आपला संघर्ष सुरुच ठेवला पण अडचणींचा मारा सुरुच राहिला, पुढे तर कर्जाचे हप्ते थकले, बँकांचा तगादा सुरु झाला ह्या सगळया गोष्टींनी धनंजय चांगलाच त्रस्त झाला आणि त्याने उद्योगधंदा बंद करुन पुन्हा नोकरीकडे आपला मोर्चा वळवला. आश्चर्य म्हणजे धनंजयला पुन्हा चांगल्या पगाराची आणि हुद्याची नोकरी देखील लगेच मिळाली आणि पुन्हा सगळं व्यवस्थित सुरु झालं. ही झाली एक लहानशी गोष्ट. हे अजय आणि धनंजय कुठेही कुठल्याही कंपनीत असू शकतील. तसं पाहिलं तर वयाने, ज्ञानाने, शिक्षणाने आणि कामातल्या कौशल्यात देखील ते जवळजवळ एकाच पातळीवर होते, दोघेही मेहनती, महत्वाकांक्षी आणि जिद्दी होते, मग, फरक कुठे होता? फरक होता तो त्यांच्या नशिबात, एकाचं नशीब 'उद्योगात' तर दुस-याचं 'नोकरीत'.
'मला सध्याची नोकरी कधी बदलता येईल? ' 'मला नोकरीत बढती कधी मिळेल?' किंवा 'मला नोकरी कधी मिळेल?' या सारखे प्रश्न ज्योतिषाला नेहमी विचारले जातात पण त्याचबरोबर 'मी माझी सध्याची नोकरी सोडून एखादा व्यवसाय सुरु करावा का? ', 'कोणता करावा?' हेही प्रश्न विचारणा-या व्यक्तींची संख्या खूप आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्रिकेत 'उद्योजकता' आहे का? हे बघावं लागतं, थोडक्यात ती व्यक्ती अजय आहे की धनंजय आहे, हे बघावं लागतं. धंद्याच्या अडचणी विषयी पत्रिका दाखवायला येणा-या लोकांमध्ये, ब-याच लोकांची अडचण असते की, आमचा धंदा 'रोल' होत नाही. धंदा ही काही एकदाच होणारी घटना नाही, तो सातत्याने होणं जरुरीच असतं ह्यालाच धंदा 'चालणं' म्हणतात आणि असा धंदा 'चालण्यासाठी' नशीब लागतच लागतं. त्याशिवाय नुसते प्रयत्न करुन यश मिळत नाही. धंदा 'रोल' होणं किंवा 'चालणं ' हाच धंद्याचा मुळ गाभा आहे हे विसरुन चालणार नाही.
उद्योग/व्यवसाय कधी सुरु होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन गोष्टी बघाव्या लागतात, म्हणजे मुळात त्या व्यक्तिच्या पत्रिकेत उद्योगधंद्याचा योग आहे का? आणि दुसरी म्हणजे महादशा अंतर्दशा उद्योगधंदा कधी दर्शवित आहेत? महादशा अंर्तदशेवर मी मागील एका लेखात माहिती दिली आहेचं. त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती झाली असेलचं. आपण बरेच वेळेला बघतो की, एखादी व्यक्ती बरेच वर्ष नोकरी करत असते आणि नंतर ती उद्योग व्यवसायाला सुरुवात करते आणि यशस्वी होते. हा जो उद्योग व्यवसायाचा काळ आहे, हा या महादशा अंतर्दशेवर अवलंबून असतो तसचं, पुढे किती वर्ष धंदा उत्तम चालेल? कुठली वर्ष उद्योगासाठी विशेष चांगली आहेत? यासाठी देखील महादशा अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो की, काही वेळेला काही व्यक्तिंच्या पत्रिकेत अगदी थोडे दिवसच उद्योग व्यवसाय असतो, तो विशिष्ट काळ उलटून गेला की परत ती व्यक्ती नोकरी करु लागते. उद्योग व्यवसायाच्या बाबतीत काही विचित्र उदाहरणं देखील बघायला मिळतात. एखाद्या व्यक्तीकडे उद्योगासाठी लागणारे सर्व गुण असतात जसं नवीन नवीन कल्पना, मार्केटिंगचे उत्तम कौशल्य वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी असतात. ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करत असते, त्या व्यक्तीला त्या कंपनीची, त्या उद्योगाची, त्या क्षेत्राची उत्तम जाण असते, अगदी त्या कंपनीच्या मालकापेक्षाही अधिक माहिती असते. मालकाच्या अनुपस्थितीत ती व्यक्ति जणु काही 'प्रती मालक' असल्याप्रमाणे कंपनीतल्या सगळया गोष्टी अगदी उत्तम रितीने हाताळत असते. पण एवढ सगळं असुनही त्या व्यक्तिच्या प्रत्रिकेत उद्योग व्यवसायाचा योग नसतो, नोकरीचाच योग असतो त्या व्यक्तिच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग हा ती व्यक्ति काम करत असलेल्या कंपनीला किंवा त्या कंपनीच्या मालकालाच होणार असतो. अशा व्यक्तिला मला 'वजीर' म्हणावसं वाटतं 'वजीर' हा कदाचित राजापेक्षाही हुशार व ज्ञानी असु शकतो पण तो 'राजा' होऊ शकत नाही.
व्यवसायासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे 'कर्ज' कर्जाशिवाय मोठा व्यवसाय करणे हे आजकालच्या जगात केवळ अश्यकच आहे. कर्जाच्या संर्दभात बरेच मुद्दे उपस्थित होतात जसं 'कर्ज सहजगत्या मिळेल की, बरेच प्रयत्न करावे लागतील?' त्याच प्रमाणे कर्जाची परतफेड व्यवस्थित होईल का?' इत्यादी बाबीही अभ्यासाव्या लागतात धंदा भागीदारीत असल्यास 'कुठल्या भागीदाराने प्रयत्न केल्यास कर्ज सहजगत्या मिळेल?' हाही मुद्दा उपस्थित होतो. तसेच 'नोकर कसे मिळतील? तारक की मारक? हाही प्रश्न थोडा महत्वाचा ठरतो.
काही व्यक्तिच्या पत्रिका ह्या उद्योग धंद्यापेक्षा 'प्रोफेशन' ला चांगल्या असतात जसं चाटर्ड अकौटंट, डॉक्टर, वकील, टॅक्स कन्सलटंट, आर्किटेक्ट वगैरे यालाच आपण 'प्रायव्हेट प्रॅक्टीस' म्हणतो. थोडक्यात काय, तर अशा पत्रिका 'कन्सलटन्सी' क्षेत्राला चांगल्या असतात.
ज्या व्यक्तिंच्या नशिबात उद्योग व्यवसाय असतो ती व्यक्ति आपोआपच उद्योग व्यवसायात खेचली जाते. याबाबतीत आपल्याला अशीही उदाहरण बघायला मिळतील की अमुक अमुक व्यक्तीला नोकरी करायची होती त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले पण चांगली किंवा मनासारखी नोकरी मिळाली नाही किंवा नोकरीच मिळाली नाही म्हणून मग एखादा उद्योग सुरु केला आणि त्या व्यवसायात त्या व्यक्तिची खूप भरभराट झाली. काही वेळेला एखाद्या व्यक्तिच्या चांगल्या चालू असलेल्या नोकरीत अचानक अडचणी उत्पन्न होतात, नोकरी जाते आणि मग ती व्यक्ति एखादा उद्योग व्यवसाय सुरु करते आणि पुढे त्यात भरभराट होते.
तर, अशा या उद्योजकतेच्या विविध छटा. उद्योजकतेच्या जगतात शिरण्यापूर्वी नशिबाची साथ तपासून बघणं महत्त्वाचं ठरतं आणि ती जर असेल तर मग चला 'उद्योजकतेच्या जगतात'.


अभय गोडसे


Friday 27 March 2015

गुणवत्ता मोलाची

गुणवत्ता मोलाची

व्यक्तीचे नाव 'अ', शिक्षण - जेमतेम 10 वी पर्यंत कौशल्य - कुठलचं कौशल्य नाही, उलट कामचुकारपणा व बेफिकीरवृत्ती, आळशी स्वभाव- भयानक स्वार्थी, थापाडया, फुशारकी करणे नोकरी- चांगल्या बडया कंपनीत भरपूर पगाराची नोकरी नशीबाची साथ- भरपूर, प्रचंड, खूपच एकंदर आयुष्यातील यश - भरपूर आर्थिक यश, योग्यतेपेक्षा खूपच अधिक.    

व्यक्तीचे नाव - 'ब', शिक्षण - बी.एससी. हुशार विद्यार्थी कौशल्य - अनेक विषयांच सखोल ज्ञान, ज्ञानपिपासू वृत्ती, अनेक गोष्टीत निपुणता स्वभाव- मदतीचा हात कायम पुढे, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, अति प्रामाणिक. नोकरी - लहानश्या कंपनीत जेमतेम पगाराची नोकरीनशीबाची साथ - जवळ जवळ नाहीच, अत्यल्प एकंदर आयुष्यातील यश- आर्थिक अपयश, योग्यतेपेक्षा खूपच कमी
 
तुमच्या आजुबाजुची माणसं एकदा आठवून बघा, तुमच्या कार्यालयातली, तुमची मित्रमंडळी, तुमचे शेजारी, तुम्हाला रोज भेटणारी माणसं, तुमच्या ओळखीचे लोक, तुमचे नातेवाईक, ह्या सगळयांच्याकडे एकदा नीट नजर टाका. ह्यामधल्या काही लोकांच्या बाबतीत तुम्हाला असं वाटेल की अरे, ह्या माणसाची योग्यता #क्षमता ही खरचं खुप आहे, ह्याने आत्तापर्यंत खर तर खूप प्रगती करायला हवी होती, पण, प्रत्यक्षात मात्र त्याची म्हणावी तेवढी प्रगती किंवा म्हणावं तेवढया उंचीवर तो माणूस पोचलेला नसतो. तर काही माणसांच्या बाबतीत तुम्हाला असं आढळेल की, अरे, ह्याला तर ह्याच्या योग्यतेपेक्षा खूपच यश मिळालय, खरं तर ह्याची तेवढी योग्यताही नाही पण, पठ्ठयाला बरच यश मिळालयं. 

एखाद्या माणसाची पत्रिका बघतांना असं लक्षात येतं की या माणसाची हुशारी, ज्ञान तसं काही फार नाही पण याला आयुष्यात खूपच छान यशं मिळणार आहे. तर काही पत्रिकांच्या बाबतीत असं लक्षात येत की, या माणसाची हुशारी, व्यवहार चातुर्य, विषयाचं ज्ञान आणि एकंदरच योग्यता ही खरचं खूप आहे, पण त्या मानाने याला आयुष्यात यश मिळणार नाही. तर काही वेळेला असंही लक्षात येत की, या माणसाची जेवढी योग्यता # क्षमता आहे त्याचप्रमाणात त्याला यश देखिल मिळणार आहे. ह्यावरुन असं लक्षात येतं की, पत्रिकेची गुणवत्ता ही दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे त्या माणसाची योग्यता म्हणजेच, त्या माणसाची बौध्दिक क्षमता, विषयाचं ज्ञान, कौशल्य, व्यवहार चातुर्य, नितिमत्ता, प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती, जिद्द, महत्वाकांक्षा वगैरे वगैरे आणि दुसरी म्हणजे त्याच्या पत्रिकेतील यशाची गुणवत्ता म्हणजेच त्याला नशिबानी दिलेली साथ. ह्यापैकी पहिल्या प्रकारची गुणवत्ता खूप असेल पण दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता जर फारशी नसेल, तर ते बरोबर ठरणार नाही. तसचं जर दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता असेल पण पहिल्या प्रकारची गुणवत्ता नसेल तर काही प्रमाणात का होईना पण जनंमानसात थोडीतरी निंदा नालस्ती होईलचं खरं बघितलं, तर एखाद्या व्यक्तीची जेवढी क्षमता, योग्यता असेल त्याच्या समप्रमाणातच त्याला यश मिळण हे सगळयानांच अपेक्षित असतं पण तसं घडतच असं मात्र नाही. यावरुन आपल्या असं लक्षात येईल की आयुष्यातील यशाचं समिकरण हे खालीलप्रमाणे आहे. 

माणसाची योग्यता + नशिबाची साथ = आयुष्यातील यश
काही माणसं मात्र खरच खूप भाग्यवान असतात. त्यांची पहिल्या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच बुध्दिमत्ता, कौशल्य, व्यवहार चातुर्य, ही तर अफाट असतेच पण त्याचबरोबर दुस-या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच 'नशिबाची साथ' ही देखील प्रचंड प्रमाणात असते, अशा व्यक्तींना आयुष्यात भरघोस यश मिळतं. पण त्या वेळेला त्यांनी 'विद्या विनयेन शोभते' या उक्तीप्रमाणे जमिनीवर राहाणंच शोभून दिसतं. भारतातल्या एका प्रसिध्द गायिकेने एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'आमच्या सारखे चांगल्या आवाजाचे लोक कितीतरी असतील किंवा कदाचित आमच्यापेक्षा चांगले गाणारेही असतील पण आमच्यावर ईश्वराची कृपा आहे म्हणूनच आम्ही या पदाला पोहोचलो' थोडसं विषयांतर होत असलं तरी अल्बर्ट आईनस्टाईनची एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एकदा एके ठिकाणी कसलीतरी वाट पहात उभे होते. थोडयावेळाने, त्यांच्या बाजूला एक तरुण मुलगा येऊन उभा राहिला. त्याच्या हातात भौतिकशास्त्राची जाडजुड पुस्तकं होती, ती पाहून आईनस्टाईननी त्याला सहज विचारलं की, तू भौतिकशास्त्राचा अभ्यास करतोयस का ? त्यावर तो माणूस अत्यंत गर्वाने म्हणाला, 'मी भौतिकशास्त्राचा डॉक्टरेट आहे' आणि एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने आईनस्टाईनला विचारलं की, 'तुम्ही कोण आहात ? ' त्यावर प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले 'मी भौतिकशास्त्राचा एक विद्यार्थी आहे.

काही वेळेला पत्रिका दाखवून झाल्यानंतर काही व्यक्ती विचारतात की, 'आमच्या पत्रिकेचं मुल्यमापन तुम्ही कसं कराल? १० पैकी द्यायचे झाल्यास, किती गुण तुम्ही आमच्या पत्रिकेला द्याल?' ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपण कुठल्या आधारावर मुल्यमापन करणार ह्यावर अवलंबून आहे. साधारणत: व्यक्तीच्या आयुष्यामधे स्वभाव, शिक्षण, नोकरी /धंदा, पैसा, आरोग्य, विवाह सौख्य आणि संतती या सात गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यापैकी एका जरी गोष्टीत दारुण अपयश आलं तरी आयुष्याचा समतोल ढळू शकतो. बाकी सगळं चांगलं आहे पण संतती नाही, संतती असेल तर विवाहसौख्यात कमतरता, विवाहसुख उत्तम असेल तर प्रकृतीची अडचण, अशा अनेक गोष्टी असू शकतात. वरील सातही गोष्टी उत्तम असणा-या व्यक्ती ह्या थोडयाच असतात, ही सातही प्रकारची सुखं खूप उत्तम प्रमाणात मिळाली आहेत, अशा व्यक्ती थोडयाच असतात. पत्रिकेच्या अनुषंगाने मुल्यमापन करतांना ह्या सातही गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं सातपैकी कुठल्यातरी एकाच गोष्टीचा एकांगी विचार करुन मुल्यमापन करता येणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं करियर अतिशय उत्तम आहे, त्या व्यक्तीने भरपूर पैसा, मानमरताब मिळवला आहे पण लग्नचं केलेलं नाही, किंवा त्या व्यक्तीला संसारसुख किंवा विवाहसौख्य शुन्य आहे, तर, अशा पत्रिकेच मुल्यमापन करतांना फक्त करियर उत्तम म्हणून अधिक मुल्यमापन करता येणार नाही कारण त्याच बरोबर संसारसुख शुन्य आहे. तुम्हाला काही अशा व्यक्ती देखील माहीती असतील की ज्यांनी आयुष्यात काहीही प्रचंड करुन दाखवलेलं नाही किंवा त्या प्रचंड कर्तृत्ववान नाहीत पण वरील सात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला तर ती सातही सुख त्यांना ब-याच अंशी चांगल्या प्रमाणात मिळाली आहेत, म्हणजे आयुष्यात त्यांना जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती गोष्ट त्यांना मिळालेली आहे, उदाहरणार्थ लहानपणी आई- वडिलाचं छत्र, नंतर शिक्षण, नंतर नोकरी / धंदा, पैसा, पुढे लग्न, बायको, मुलं-बाळं, पुढे निवृत्त जीवन असं सगळं ब-याच अंशी मिळालेलं आहे, त्यांच्या आयुष्यात तसे फारसे चढ-उतार आलेले नाहीत, त्यांच आयुष्य हे खूपसं 'सरळ' गेलेलं आहे. अर्थातच, अशा व्यक्तींच्या पत्रिकेला १० पैकी बरेच जास्त गुणं मिळतील. थोडक्यात सांगायच, तर इथे 'गुण' हा विषय असल्यामुळे, हे परिक्षेत पास होण्यासारखं आहे. एकाच विषयात 100 पैकी 99 गुणं आणि इतर विषयात 'नापास' असं होऊन चालत नाही, सगळयाच विषयात पास व्हावं लागतं तरचं सपूर्ण परिक्षा उत्तीर्ण होता येतं.

मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, काही व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता, म्हणजेच 'योग्यता' आणि 'नशीबाची साथ', ह्या दोन्ही प्रकारची गुणवंत्ता ही उत्तम असते, त्यामुळे अशा व्यक्ती अर्थातच आयुष्यात खूप यश मिळवतात, अशा व्यक्तींच्या पत्रिका 'अतिउत्कृष्ट पत्रिका' या विभागात येतात. अशा व्यक्तींना फार काळ अपयश येत नाही. ह्या व्यक्ती जे जे करतात त्यात त्यांना यश येत जातं तर, ह्याच्या अगदी उलट, काही पत्रिका ह्या 'निकृष्ट दर्जाची कुंडली' ह्या विभागात येतात. ह्या व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता चांगली नसते. त्यांची योग्यता देखील नसते आणि 'नशीबाची साथ' देखील नसते. स्वभाव, शिक्षण, नोकरी / धंदा, पैसा, आरोग्य, विवाहसौख्य आणि संतती या सात गोष्टीपैकी बहुतांश गोष्टीमधे अशा व्यक्तींना अपयश येतं. 'अतिउत्कृष्ट पत्रिका' आणि निकृष्ट पत्रिका' अशी दोन्हीही प्रकारची माणसं आपल्याला आपल्या आजुबाजुला बघायला मिळतात. 

साधारणत: 'गुणवत्ता' म्हटलं की आपल्याला फक्त त्या 'माणसाची' गुणवत्ताच दिसते पण त्याचबरोबर आयुष्यात यश मिळवण्यासाठी 'पत्रिकेची गुणवत्ता' ही देखील तितकीच महत्त्वाची बाब ठरते, हे हि लक्षात हवं शेवटी, 'गुणवत्तेला पर्याय नाही' हेच खरं, म्हणूनच, 'गुणवत्ता मोलाची'

 
अभय गोडसे

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...