Saturday 9 November 2013

'मंगळ'यान आणि ज्योतिष..



मंगळयान आणि ज्योतिष 

त्यादिवशी मंगळयानाच्या उड्डाणाची तयारी जोरदार सुरु होती. सगळे TV Channels तीच बातमी दाखवत होते. एका news channel वर एक anchor बोलत होती "पत्रिकेतल्या ज्या मंगळामुळे इतके problems होतात त्याच मंगळावर आता आपण यान पाठवत आहोत, त्यामुळे आता आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेऊन चालणार नाही.." वगैरे वगैरे..  त्याच वेळी दुसरया एका Channel वर आणखी एक बातमी "ISRO Chief के. राधाकृष्णन यांनी उड्डाणाच्या आधी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली.." दोन्ही गोष्टीतला विरोधाभास स्पष्ट दिसत होता.. एक साधी news anchor जी कदाचित Science मधल्या "S" पर्यंत देखील पोचली नसेल ती सांगत होती कि पत्रीकेमधल्या मंगळावर विश्वास ठेऊ नका आणि ISRO Chief, एक मोठा Scientist ज्यांनी मंगळावर यान पाठवण्याची एवढी मोठी कामगिरी करण्याचा घाट घातला होता, ते स्वतः अत्यंत विनयाने, आपण केलेल्या एवढ्या मोठ्या कार्यासाठी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले  होते. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणारया लोकांची संख्या कमी नाही ! मुळात आधी, मंगळावर यान पाठवणे आणि पत्रिकेतला मंगळ यांचा काही संबंधच नाही. जन्माच्या वेळचे पत्रिकेतले ग्रह हे काही गोष्टी 'Indicate' करतात, ग्रहामुळे काही होत नाही. हे म्हणजे परीक्षेत fail झालेल्या मुलाने स्वत:ची Mark Sheet फाडून टाकली तर तो काही परीक्षेत पास झाला अस होत नाही ! मार्क sheet फाडली तरी परीक्षेतले मार्क्स बदलत नाहीत ! असो !

मंगळ यानाचे उड्डाण १४:३८ ला झाल्यानंतर मी सहज त्यावेळेची पत्रिका मांडून बघितली.. 
५ नोव्हेंबर २०१३, १४:३८, श्रीहरीकोटा १३ ४३ N, ८०  १२ E , सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'मंगळ' यानाच उड्डाण हे 'मंगळ'वारीच झालं होत ! दुसरं म्हणजे त्या दिवशी वृश्चिक रासच होती, म्हणजे राशी स्वामी हा देखील 'मंगळ'च होता. त्या दिवशी मंगळाच किती प्राबल्य होतं हे उघडं दिसत होतं ! आणखी पुढे जाऊन बघितलं तर वृश्चिक रास हि देखील त्या वेळी दशम स्थानातच होती. दशम स्थान हे पत्रिकेच "कर्म" स्थान आहे. यान पाठवण्याच इतक मोठं कर्म/काम त्यावेळेला होत होतं ! लग्नरास सुद्धा 'कुंभ' होती, कुंभ हि वायू राशी आहे. यान पाठवण्याच कर्म हे "वायू" ची साथ असल्याशिवाय शक्यच नव्हतं. लग्नेश (लग्नराशीचा स्वामी) शनी हा देखील "तुळेत" होता, तूळ हि देखील पुन्हा वायू राशीच, तुळेत शनि उच्चीचा होतो हा additionally favorable factor ! महादशा स्वामी देखील शनीच होता व तो देखील १२ व्या स्थानाचा Strong कार्येश होता व स्वतः व्ययेश (१२ व्या स्थानाचा अधिपती) होता, पत्रिकेतील बारावं स्थान हे परदेश गमनासाठी मानलं जातं, म्हणजेच लांबचे (देशाबाहेरचे प्रवास, इथे तर पृथ्वी बाहेरचा प्रवास). यान पाठवण्यासाठी इतकी अनुकूल ग्रहस्थिती निर्माण झाली असतानाच यान पाठवलं गेलं !

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यानी स्वतः आधी ज्योतिषशास्त्राचा आणि त्यात सुद्धा कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करावा आणि मग आपली So called "Scientific" मतं मांडावीत. Bat हातात नीट पकडता न येणाऱ्यानी उगाच सचिन तेंडूलकरच्या फलंदाजी विषयी सल्ले देऊ नयेत! मुळात लोकांची एक धारणा असते कि Science आणि ज्योतिष, या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. Actually, ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नसून, एकमेकांना पूरक आहेत ! एखादा माणूस गणितात हुशार असेल तर त्याने इतिहासात हुशार असू नये असा काही नियम आहे का? दोन्ही विषयामुळे लोकांचा वेगवेगळा फायदा होतो.  सगळ्याच गोष्टींची उत्तरं Science कडे आहेत का? तुमचा जन्म अमिताभ बच्चन किंवा बिल गेट्स यांच्या घराण्यात का नाही झाला? किंवा तुमचा जन्म झोपडपट्टीत का नाही झाला? झाला असता तर तुमच आयुष्य आता सारखं राहिलं असत का? किंवा काही नवरा बायको दोघेही Medically Fit असून सुद्धा त्यांना मुल का होत नाही? आहेत का या प्रश्नांची उत्तर Science कडे? 'ज्योतिष मानणं' म्हणजे 'Science न मानणं' असं थोडंच आहे. Science कोणीच अमान्य करू शकत नाही! ते तर आहेच पण त्याबरोबर ज्योतिष देखील आहेच! ते देखील तुम्ही अमान्य करूच शकत नाही!


अभय गोडसे



माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...