Diagnosis चुकतो तेंव्हा..
Health Problems आले कि माणूस डॉक्टरकडे जातो पण दहा डॉक्टर फिरून सुद्धा जर diagnosis झाला नाही तर काय कराव? तर मात्र ज्योतिषशास्त्राची मदत नक्कीच घेऊन बघावी.. अशीच एक Case काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती.. काही डॉक्टर त्या मुलीला वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते तर काही डॉक्टर कुठल्याच conclusion वर पोचत नव्हते, त्या मुलीला आपल्याला नक्की काय झालं आहे हाच प्रश्न होता. त्या मुलीची कुंडली खाली देत आहे ( privacy जपण्यासाठी नाव देत नाहीये).
एखाद्या health problems साठी जेव्हा माणूस येतो तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा Current time period कुठला सुरु आहे हे बघणं महत्वाच असतं. ज्यावेळेला ती माझ्याकडे आली तेंव्हा तिची गुरु अंतर्दशा सुरु होती. कुंडलीत गुरु तुळेत व्ययस्थानात आहे. गुरु स्वाती ह्या राहूच्या नक्षत्रात आहे व राहू अष्टमात आहे. ८ व १२ स्थानं activate झाल्यामुळे Health problems आले हे उघड आहे. तूळ रास हि शरीराच्या ओटीपोटावर (Lower Abdomen) येते म्हणून मी तिला विचारलं कि पोटासंबंधी काही प्रोब्लेम आहे का? ती म्हणाली "हो, पोटातच दुखतंय". त्यात गोचरीच्या गुरुचं भ्रमण देखील मिथुनेतुन म्हणजे ह्या पत्रिकेच्या अष्टमातूनच होत आहे. म्हणजे health problems नक्की येणार. त्यात माझं लक्ष Birth Chart मधील गुरूच्या Degrees कडे गेलं, गुरु १८ अंशावर होता व गोचरीचा गुरु देखील त्या वेळेला मिथुनेत म्हणजे अष्टमात १८ अंशावरच आला होता त्यामुळे बरोबर तेंव्हांच Health Problem आला होता. ती म्हणाली "पोटात दुखतंय पण त्याच कारणच कळत नाहीये आणि दुसर म्हणजे माझं Blood Presuure सुद्धा खूप high होतंय त्यामुळे डॉक्टरांचा पहिला होरा आहे कि तुम्हाला Blood pressure आहे. " मी म्हंटल "नाही, तुमच्या पोटाच्याच problem मुळे ते high होत असणार, त्यात सुद्धा ओटीपोट indicate होत असल्यामुळे Urinary infection किंवा Stone असण्याचे chances जास्त आहेत त्यामुळे ओटीपोटा संबंधितच Test करून घ्याव्यात". अंतर्दश स्वामी गुरु असल्यामुळे मी तिला विचारल कि "ह्या आजारपणात गुरुवारचा काही संबंध आला आहे का? म्हणजे गुरुवारी त्रास सुरु झाला किंवा कमी झाला अस काही?" त्यावर ती म्हणाली "मी observe केलेलं नाहीये", मी म्हंटल "ह्या पुढे observe कर आणि सांग"
चला, आता प्रोब्लेम तर identify झाला मग लगेच पुढचा प्रश्न कि प्रोब्लेम ची Severity कितपत असू शकेल किंवा आयुष्याला काही धोका नाही ना? मी लगेच पत्रिकेची महादशा बघितली, महादशा बुध आहे, बुध लाभत असून चंद्राच्या हस्त नक्षत्रात आहे व चंद्र पंचमात आहे म्हणजे महादशा स्वामी ११,५,८,९ ह्या भावांचा कार्येश होतो, ११ व ५ चा strong कार्येश होतो आणि अष्टम भावाचा Weak कार्येश होतो कारण अष्टमात ग्रह आहे ,त्यामुळे आयुष्याला अजिबात धोका नाही.. म्हणजे व्यक्ती बरी होणार हे नक्की !
मघाशीच म्हटल्याप्रमाणे, अंतर्दशा स्वामी गुरु आहे, गुरु हा ग्रह एखाद्या माणसाच खूप वाईट करत नाही, Last Moment help करतोच, त्यामुळे व्ययस्थानात असला तरी medical हेल्प नक्कीच चांगली मिळवून देईल पण तो राहूच्या नक्षत्रात व राहू अष्टमात आहे, राहूचा संबंध आला कि बऱ्याच गोष्टी ह्या अनाकलनीय घडतात, एखाद्या गोष्टी मागील कारणच कळत नाही, ह्या मुलीच्या बाबतीत नेमकं तेच घडत होत पण शेवटी अंतर्दशा स्वामी गुरु होता, राहू नाही, so initially जरी घोळ झाला असला तरी ultimately medical हेल्प चांगली मिळणारच ! आता प्रश्न होता कि नेमक्या कुठल्या डॉक्टरकडून? गुरु हा मेद वाढवणारा ग्रह आहे तसेच गुरु हा पारंपरिक वृत्ती जपणारा ग्रह आहे, थिल्लर वृत्ती असणारा ग्रह नाही म्हणजेच Matured Planet आहे त्यामुळे हे सर्व गुण ज्या डॉक्टरमध्ये आहेत असा डॉक्टर Correct diagnosis करू शकेल. म्हणजेच असा डॉक्टर कि जो थोडा स्थूल/जाड आहे व matured आहे. हे सगळं मी त्या मुलीला सांगितल्यावर ती म्हणाली कि असे एक डॉक्टर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं एक medicine मी आता घेणार आहेत. मी म्हंटल कि Correct, ह्या डॉक्टर ला सोडू नको, हा जे सांगेल ते कर कारण ह्याचीच मदत होऊ शकेल. गुरु हा पुरुष ग्रह आहे, तूळ रास हि देखील पुरुष राशीच आहे, गुरु तुळेचा आहे म्हणजे Male डॉक्टरच बरोबर आहे ! त्याही पुढे जाऊन मी तिला सांगितलं कि ह्या डॉक्टरच नाव (First name or Last name) जर "ग" ह्या अक्षराने सुरु होत असेल, तर आणखी उत्तम, त्यावर ती म्हणाली "हो, ह्या डॉक्टरच first name "ग" नी सुरु होत", मी म्हंटल "yes, हाच तो डॉक्टर".
आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अंतर्दशास्वामी गुरु व्ययस्थानात आहे, व्ययस्थान हे लांबच ठिकाण किंवा प्रवास दाखवतं. ह्या आजारपणात हि मुलगी मुंबईहून तिच्या माहेरी पुण्यात येउन राहिली होती व डॉक्टर देखील पुण्याचाच होता. म्हणजे हा health problems चा प्रश्न जर मला तिने मुंबईत विचारला असता तर मी तिला "तुझ्यापासून लांब राहत असलेला किंवा बाहेरगावचा डॉक्टर बघ" अस सांगितलं असत. म्हणजेच अंतर्दशास्वामी डॉक्टर लांब आहे असे दर्शवत होता.
आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अंतर्दशास्वामी गुरु व्ययस्थानात आहे, व्ययस्थान हे लांबच ठिकाण किंवा प्रवास दाखवतं. ह्या आजारपणात हि मुलगी मुंबईहून तिच्या माहेरी पुण्यात येउन राहिली होती व डॉक्टर देखील पुण्याचाच होता. म्हणजे हा health problems चा प्रश्न जर मला तिने मुंबईत विचारला असता तर मी तिला "तुझ्यापासून लांब राहत असलेला किंवा बाहेरगावचा डॉक्टर बघ" अस सांगितलं असत. म्हणजेच अंतर्दशास्वामी डॉक्टर लांब आहे असे दर्शवत होता.
त्यानंतर असेच काही दिवस उलटले आणि एके दिवशी त्या मुलीचा फोन "मी त्या मागे सांगितलेल्या डॉक्टरांचं medicine घेतलं आणि त्याचा चांगला उपयोग झाला, urinary stone wash out झाला आणि महत्वाच म्हणजे हे गुरुवारीच झालं", गुरुने आपला चमत्कार दाखवला होता !
अभय गोडसे
My Websites www.Kpjyotish.com www.AbhayGodse.com