Cerebral Palsy (मेंदुचा आजार)
तीन ते चार वर्षांच्या मुलांच्या पत्रिकेबाबत प्रश्न विचारण्यारया Clients ची संख्या तशी कमी असते, पण असते. अशीच एक पत्रिका आली होती, आजार होता Cerebral Palsy (सेरेब्रल पालसि), हा मेंदूचा आजार असून प्रसूती होतेवेळी किंवा प्रसुतीच्या अगोदर मेंदूला इजा झाल्यास हा आजार होऊ शकतो ( अधिक माहितीसाठी वाचकांनी कृपया Google करावं ).
ह्या आजारामुळे muscle coordination नीट होत नाही. माझ्यासमोर आलेल्या पत्रिकेत माझं पहिल लक्ष गेलं ते बुधाकडे ! बुध हा वाणीचा कारक ग्रह आहे, तोच नीच होता आणि लग्नेश देखील होता. ह्यां मुलाला बोलता येत नव्हत. KP method नुसार प्रथम भावाचा उप नक्षत्र स्वामी हा देखील बघतात, तो १,६,१२ ह्या आजारासाठी ओळखल्या जाणारया स्थानांचा कार्येश होता. त्यामुळे आजाराची तीव्रता जास्ती होती. २०१८ पर्यंत असणारी शुक्र महादशा (काळ) ही देखील भावचलित कुंडली मधे अष्टम भावाची कार्येश होती, ह्याचा अर्थ कि सुधारणा २०१८ पर्यंत तरी वाटतं नव्हती.
बुध हा ग्रह मीन राशीत निचीचा म्हणून ओळखला जातो, मीन हि रास शरीराच्या "पाय" ह्या अवयवावर येते. ह्या मुलाला चालता देखील येत नव्हत. पण ह्याच मीन राशीत गुरु ग्रह होता जो मीनेत स्वगृही असतो त्यामुळे कदाचित चालण्याबाबतीत भविष्यात थोडीफार प्रगती/सुधारणा होण्याची शक्यता आहे पण वाणीचा कारक बुधच नीच असल्यामुळे बोलण्याच्या बाबतीत प्रगती कठीण वाटत होती.
ह्या पत्रिकेत आणखी एका गोष्टीने माझं लक्ष वेधल, ह्याची रास धनु असल्यामुळे ह्याची साडेसाती नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झालेली होती त्यामुळे आता प्रोब्लेम आणखी वाढण्याची शक्यता होती. त्यात अजून ह्याची रास ही सप्तम स्थानात येत असल्यामुळे साडेसाती मध्ये शनिचं भ्रमण हे ६,७,८ ह्या स्थानांमधून होणार होत जी स्थान आजाराची स्थान म्हणून ओळखली जातात. म्हणजेच पुढचा काळ खूपच खडतर जाणार होता. ह्यात आणखी भर घालण्यासाठी ह्या मुलाच्या आईची रास वृश्चिक होती म्हणजे तिला देखील साडेसाती सुरु होतीच, त्यात पुन्हा वडिलांची रास मकर होती, त्यांची साडेसाती जून २०१७ पासून सुरु होणार म्हणजे जुन २०१७ ते डिसेंबर २०१९ ह्या काळात घरातील तिघांनाही साडेसाती असणार होती.
आता हे एवढं सगळं असताना उपाय उपयोगी पडतील अस वाटत नव्हतं तरी देखील काही उपाय सांगितले, प्रयत्न करण्याने यश मिळेल का नाही हे माहित नसत पण "आपण सगळे प्रयत्न केले " हे मानसिक समाधान तर नक्कीच मिळत.
सांगितलेले उपाय खालील प्रमाणे,
१) घरातील दोघांना आत्ता साडेसाती आणि पुढे तिघांना साडेसाती असणार होती. मारुती उपासना सांगितली. जेंव्हा ती व्यक्ती स्वतः करू शकत नाही (जसं इथे मुलगा लहान असल्यामुळे) त्यावेळी शक्यतो घरातील ज्याच्या पत्रिकेत शनि strong असेल त्यांनी ती करावी.
२) ह्या मुलाचे मिथुन लग्न आहे जी "द्विस्वभाव" राशी म्हणून ओळखली जाते तसेच ह्याची चंद्ररास धनु, जी देखील "द्विस्वभाव" रास, मीन राशीत देखील जास्ती ग्रह आणि ती देखील "द्विस्वभाव" राशी, म्हणून त्यांना एकापेक्षा जास्तं (कमीत कमी दोन, "द्वि") उपचार पद्धती (pathy) घ्याव्यात अस सुचवलं जसं allopathy + homeopathy. हे सांगितल्यावर त्यांनी सांगितलं कि हे असच सुरु आहे.
3) साडेसाती सुरु होती. शनिवारी शक्यतो कुठ्ल्या Tests किंवा उपचार नकोत. तसच शनी हा अंधाराचा कारक म्हणून कुठल्याही दिवशीच्या रात्रीच्या वेळी जास्त काळजी घ्यावी.
साहजिकच हे सगळं वाचुन कुणाच्याही मनात प्रश्न येईल कि हे सगळं ह्याच मुलाच्या वाटयाला का आलं? ह्यानी तर अजून कुठलंच वाईट कर्म केलेल नाही. काही मुलांचा जन्म व्यवस्थित होतो तर काही मुलांना जन्मापासूनच आजारपणाला सामोरे जावे लागते. हे असं का होतं? पुनर्जन्म न मानणाऱ्या लोकांना ह्याच उत्तर कधीच सापडणार नाही.
अभय गोडसे