Monday, 3 October 2016

ज्योतिष, आपण आणि काही महत्त्वाच्या गोष्टी

 

'ज्योतिष' या विषयाचं आकर्षण हे प्रत्येक व्यक्तीला थोडया फार प्रमाणात असतंच. त्यामुळे सहाजिकच बरेच लोक ब-याच ज्योतिषांना त्यांची पत्रिका किंवा हात दाखवितात. ज्योतिषी अनेक लहान मोठे मुद्दे सांगतात. काही वेळेला काही तारखा किंवा महिने सांगितले जातात. तर असे ब-याच ज्योतिषांनी सांगितलेले बरेच मुद्दे होतात. साहजिकच एकाच व्यक्तीच्या ते लक्षात राहणं (अगदी तारीख महिन्यांसकट) हे अवघड असतं. त्यामुळे ह्यातले बरेच मुद्दे आठवणींतून निसटतात. काही वेळेला हवे असलेले मुद्दे लक्षात राहतात. व नको असलेले सोयीस्कर रित्या विसरले जातात. बरेच वेळेला ज्योतिषाकडे पत्रिका दाखवायला जाताना असलेल्या परिस्थितीवरही ते अवलंबून असते. काही वेळेला पत्रिका दाखवायला आलेल्या व्यक्तीचा मूड नसतो. तो त्याच्याच चिंतेत असल्यामुळे काही नेमक्याच गोष्टी लक्षात ठेवतो. किंवा एखाद्या वेळेला घाईघाईत पत्रिका दाखवायला आल्यामळे देखील हा गोंधळ होऊ शकतो.तर अशा वेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

त्यातील सगळयात पहिली महत्त्वाची गोष्ट ही की कुठल्याही ज्योतिषाने ज्या काही गोष्टी किंवा मुद्दे सांगितले असतील ते एका वहीत नीट लिहून ठेवावेत. ब-याच ज्योतिषांना पत्रिका दाखवली असल्यास त्या ज्योतिषाचे नाव लिहून मग त्याखाली त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे नीट लिहून घ्यावेत. काही मुद्दे लहान-सहान असले तरी लिहून घेण्यास विसरू नये. ह्या गोष्टीचे दोन महत्त्वाचे फायदे असे की, कुठल्या ज्योतिषाने काय सांगितले आहे याचा, record आपल्याकडे नीट राहतो आणि त्या प्रमाणे पुढे गोष्टी झाल्या का नाही, हे देखील कळायला मदत होते.

दुसरी महत्त्वाची गोष्टी ही की कुठल्याही ज्योतिषाकडे जाताना कधीही कमी वेळ असताना जाऊ नये. तसेच ज्योतिषाला लवकर भविष्य सांगण्याकरिता घाई करू नये. कारण ह्याच्यात दोघांचाही फायदा नाही. ज्योतिषाकडे जाताना साधारणत: अर्ध्या तासाचा तरी वेळ घेऊन जावे. तसेच आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते नीट लिहून घेऊन जावेत, ह्याच्यामुळे "एखादा प्रश्न विचारायचा होता, पण आयत्या वेळेला आठवला नाही", किंवा "दुसऱ्या एखाद्या मुद्दयांच्या ओघात विचारायचा राहून गेला" असं होणार नाही.

एकोपक्षा जास्त व्यक्तींच्या पत्रिका दाखवायच्या असल्यास त्या त्या व्यक्तीच्या नावाखाली त्या त्या व्यक्तीचे प्रश्न लिहावेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणज, शक्यतो, ज्या व्यक्तीची पत्रिका दाखवायची आहे, त्यानेच जावे. अगदीच गरज वाटल्यास बरोबर आणखी एकच व्यक्ती असावी. पत्रिका एकाचीच दाखवायची आहे, आणि बरोबर लोकांचा घोळका अशी परिस्थिती असू नये. ह्याच्यामुळे कुणालाच शांतता मिळत नाही.
पत्रिका दाखविणाऱ्या व्यक्तीचे प्रश्न बाजूला राहतात व इतर लोकांचेच प्रश्न जास्त होतात. शक्यतोवर one to one interaction असावी. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगितलेल्या मुद्दयांवर विचार करता येतो व काही इतर शंका-कुशंका असल्यास विचारता येतात. तसेच त्या व्यक्तीला देखील सर्व मुद्दे व शंका विचारल्याचं समाधान मिळतं.

ज्योतिषाच्या बाबतीत दोन प्रकारच्या व्यक्ती ह्या खूप धोकादायक असतात. पहिल्या म्हणजे, कायम 'हो' म्हणणाऱ्या व्यक्ती आणि दुसऱ्या म्हणजे, कायम 'नाही' म्हणणाऱ्या व्यक्ती. काही व्यक्ती ह्या ज्योतिषाने काहीही सांगितले तरी, त्याला कायम हो म्हणतात. त्याने कुठलिही गोष्ट विचारली तरी त्याला कायम 'हो' म्हणतात. अशा व्यक्तींनी केवळ हो न म्हणता, नीट विचार करून 'हो' किंवा 'नाही' हे उत्तर द्यावे. ह्याच्या उलट काही व्यक्ती ह्या अशा असतात की, ज्यांना काहीही विचारले असता त्या कायम 'नाही' हेच उत्तर देतात. किंबहुना त्यांची ते मान्य करायची तयारीच नसते. बऱ्याच वेळेला ज्योतिषावर विश्वास नसणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त आढळतं. त्यांनी आपण "नाही" म्हणायचं हे ठरवलेलंच असतं.थोडं विनोदाने सांगायचं झाल्यास, समजा ती व्यक्ती पिवळा शर्ट घालून आली आहे. आणि ज्योतिषाने त्यांना, 'तुम्ही आत्ता पिवळा शर्ट घालून आला आहात' असं जरी सांगितलं तरीसुध्दा ते नाहीच म्हणतील. काही वेळेला ह्या विश्वास नसलेल्या व्यक्तीचं देखील कुतूहल जागृत होतं. माझ्याकडे आलेल्या एका व्यक्तीने मी पत्रिका बघायच्या आधीच 'मी तसा नास्तिकच आहे, आणि मी आजपर्यंत कुणालाही पत्रिका दाखवायला गेलो नाही.' असं सांगितलं. गमतीचा मुद्दा हा की ही 'आजपर्यंत कुणालाही पत्रिका दाखवायला न गेलेली व्यक्ती' माझ्याकडे पत्रिकाच दाखविण्यासाठी आली होती.

 आणखीन एक मुद्दा, ज्योतिषाला पत्रिका दाखवायला गेलेलं असताना, मुद्देसुद बोलावं व नेमके प्रश्न विचारावेत. काही वेळेला मूळ मुद्दा बाजूला ठेवून आलेली व्यक्ती इतर गोष्टींबद्दल माहिती देत बसते. ज्योतिषाला पत्रिका बघण्यासाठी वेळ द्यावा, त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत व त्या अनुषंगाने काही इतर मुद्दे असल्यास सांगावेत.

ज्योतिषाने ज्या गोष्टी सांगितल्या असतील तशा त्या गोष्टी झाल्यास किंवा न झाल्यास ज्योतिषाला feedback द्यावा. बऱ्याच वेळेला ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे गोष्टी झाल्यावर देखील ज्योतिषाला तसे कळवत नाहीत. 'चला, आपले काम झाले आता ज्योतिषाला कशाला सांगायला हवंय?' असं धोरणे ठेवू नये. feedback जरूर द्यावा. ह्याचे महत्त्वाचे कारण हे की, ज्योतिषाने जेंव्हा एखादी गोष्ट सांगितलेली असते ती, पत्रिकेतल्या काही गोष्टी बघून सांगितलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीने जर अमूक अमूक गोष्ट झाली असं सांगितलं तर त्या ज्योतिषाला त्याच्याकडे तशाच प्रकारचा प्रश्न घेऊन येणाऱ्या माणसाच्या बाबतीत ह्या
पूर्वानुभवाचा उपयोग होतो.

ज्या व्यक्तीची पत्रिका दाखवायची आहे, ती व्यक्ती स्वत: येणे हे फायद्याचे असते. काही वेळेला काही व्यक्ती दूरच्या कुठल्यातरी नातेवाईकांची किंवा तत्सम कुणाच्या तरी पत्रिकेविषयी विचारतात. त्यावेळेला ज्योतिषाने काही गोष्टींची खात्री करून घेण्यासाठी भूतकाळातील काही घटनांबद्दल विचारलं तर पत्रिका दाखविणाऱ्या व्यक्तीला त्याची काही फारशी कल्पना नसते, त्यामुळे problem होतो.हे असे सगळे महत्त्वाचे मुददे नीट विचारात घेऊन त्याप्रमाणे जर वागलं तर ज्योतिषी आणि जातक ह्या दोघांच्याही फायद्याचं ठरेल.ज्योतिषात आणि विशेषत: कृष्णमूर्ती ज्योति ष पध्दतीत जन्मवेळेला अनन्यसाधरण महत्त्व आहे. त्यामुळे जर कधी पत्रिका करायची असेल किंवा इतर काही प्रश्न विचारायचे असतील आणि ज्योतिषाला जन्मवेळ सांगायची असेल त्यावेळी नीट खात्री करून घेऊन अचूक जन्मवेळ सांगावी.



अभय गोडसे
 
For consultation,  Visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com

Thursday, 28 July 2016

स्पष्टवक्तेपणा आणि पत्रिका

स्पष्टवक्तेपणा आणि पत्रिका 

विक्रांत माझ्यासमोर बसला होता. Job च्या संबंधात मी consultation देत होतो, " तुमच्या पत्रिकेत job मधे प्रामाणिकपणे काम करण्याच्या Indications आहेत so त्याबद्दल काहीच problem नाही फक्त तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे तुमचं नुकसान होणार आहे, तेंव्हा एकतर गोष्टी Indirectly सांगा किंवा Diplomatically वागा."  विक्रांत एक सेकंद थांबला आणि म्हणाला "हो, तुम्ही सांगताय ते खरं आहे, हे नुकसान झालेलं आहे. ह्या स्पष्टवक्तेपणामुळे मला बऱ्याच नोकऱयामध्ये त्रास झालाय. पण diplomatically वागणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे. यासाठी काय करावं कळतं नाही". मी म्हंटलं "सोपं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जशी आहे तशी सांगून टाकता, याचा अर्थ तुमचा उद्देश प्रामाणिकपणे बोलण्याचाच असतो, दुसऱ्याला फसवण्याचा नसतो पण प्रत्येक वेळेला फक्त उद्देशच बघितला जात नाही तर तुम्ही कशा प्रकारे (way of expression) ती गोष्ट सांगता हे देखील बघितल जातं. माझा उद्देश चांगला आहे ना, मग लोकांनी मला समजून घेयलाच हवं, हा नियम दर वेळेला लागू होत नाही. समोरचा माणूस दर वेळेला तुमच्या आतमधे तुमचा उद्देश बघायला येत नाही, हे लक्षात ठेवा."

"आता Indirectly सांगणं आत्मसाद करण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर, कित्येक गोष्टी ह्या आपल्याला जन्मजात येत नसतात, जसं "वाहन चालविणे" हे जन्मतः कुठे येतं? पण आपण नंतरच शिकतो ना ! तसंच Indirectly कस बोलायचं हेही नंतर शिकता येउच शकत, हे लक्षात घ्या ! Indirectly कसं बोलायचं ह्यासाठी आपण लहानपणी बिरबल आणि अकबराची एक गोष्ट ऐकलेली आहे ती आठवा, ज्यामध्ये अकबराचा पाळीव पोपट एक दिवशी मरतो, अकबराचे नोकर त्याला हि गोष्ट सांगायला धजावत नाहीत शेवटी बिरबल अकबराला directly पोपट मेलेला आहे हे न सांगता इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे कल्पना देण्याचा प्रयन्त करतो, शेवटी अकबराला आपोपापच  कल्पना येते कि पोपट मेलेला आहे". 
विक्रांतला मी सांगितलेलं पटलं असल्याचं  त्याच्या चेहेऱ्यावर "स्पष्ट" दिसत होत. असे बरेच "विक्रांत" आज आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातले काही बदलले आहेत तर काही आहे तसेच अजूनही आहेत. 

आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न येईल कि पत्रिकेत अस काय असतं ज्यामुळे माणूस स्पष्टवक्ता होतो?
सांगतो ! पत्रिकेत जेव्हा मेष, सिंह, वृश्चिक, धनु ह्या Aggressive राशींचा संबंध येतो तेंव्हा माणूस स्पष्टवक्ता किंवा उद्धट होऊ शकतो. आता संबंध म्हणजे नेमका कसा? हे थोडं ज्योतिषशास्त्रीय भाषेत सांगावं लागेल. माणसाचा स्वभाव खालील बाबींवर ठरतो,
  • लग्नरास
  • चंद्ररास 
  • प्रथम भावाचा उपनक्षत्र स्वामी ज्या राशीत असतो ती रास
  • लग्नाराशीतील ग्रह  
ह्या वरील चार बाबींमध्ये जेंव्हा मेष, सिंह, वृश्चिक, धनु ह्या Aggressive राशींचा संबध येतो तेंव्हा माणूस स्पष्टवक्ता किंवा उद्धट असू शकतो. हा संबंध जितका जास्त तितकी स्पष्टवक्तेपणाची तीव्रता जास्त. ह्या चारही राशी जरी "Aggressive" ह्या Category मधे मोडत असल्या तरी त्यात सुद्धा राशीनुसार वेगवेगळे कंगोरे आहेतच. "लाल" रंग म्हंटला तरी त्यात परत अनेक छटा (Shades) असतात, तसच ह्यात देखील आहे. स्पष्टवक्तेपणाची तीव्रता ही वर दिलेल्या ४ गोष्टींच्या Combination नुसार बदलत जाते. 

मेषेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> उद्धट, विचार न करता बोलणारी 
सिंहेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> खूप मानी पण प्रामाणिक, आगाऊ, उपदेश देणारी, सतत स्वाभिमानाला जपणारी, स्वाभिमान दुखावला तर तिथल्या तिथे नोकरीला राम राम ठोकू शकतात. स्वाभिमान आणि अहंकार ह्याच्या सीमारेषेवर असणारी. 
वृश्चिकेचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> सगळ्यात उद्धट, खूप वेळ ऐकून घेऊन नंतर स्पष्ट बोलून एकदाच हिशेब करणारी. दुसऱ्याला लागेल असं बोलणारी
धनुचा अंमल जास्त असेलेली पत्रिका -> , परिणामाचा विचार न करता बोलणारी. बरोबर नको तिकडे नको त्या गोष्टी बोलणारी. दुसऱ्याला लागेल असं बोलणारी


(वर दिलेले मुद्दे हे वर दिलेल्या ४ गोष्टींच्या Combination वर अवलंबून असतात, हे लक्षात घ्यावे. एकाच कुठल्या तरी गोष्टींवरून कृपया स्वभावाचे वर्णन करू नये.)   
   
"खरं बोललेलं फार कुणाला आवडत नाही" अस एक म्हंटलं जातं आणि ते बऱ्याच प्रमाणात खरं देखील आहे. तुम्ही कुठल्या Profession मधे आहात ह्यावर देखील काही गोष्टी अवलंबून आहेत, जसं , तुम्ही जर पोलीस, मिलिटरी, पत्रकारिता अशा Profession मधे असाल तर (काही अपवाद वगळता) तुमचा सपष्टवक्तेपणा हा तुमचा एक चांगला गुण होऊ शकतो पण हेच जर का तुम्ही मार्केटिंग किंवा तत्सम क्षेत्रात असाल तर हा अवगुण ठरू शकतो. ज्योतिषांना (Astrologers) सुद्धा "सपष्टवक्तेपणा" हा एक चांगला गुण ठरू शकतो कारण Indirectly किंवा Diplomatically गोष्टी सांगितल्या तर समोरच्या व्यक्ती त्याच्या बुद्धीनुसार त्याला हवा तो सोयीस्कर अर्थ लावू शकते आणि नंतर त्याचं खापर ज्योतिषावर फोडू शकते, त्यामुळे स्पष्ट राहिलेलंच बरं असतं.

सपष्टवक्तेपणा ही काही बाबतीत चांगली आणि "बऱ्याच बाबतीत" वाईट गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात ह्यावर तुम्ही किती स्पष्ट बोलायचं किंवा नाही, हे ठरवा अन्यथा होत्याच नव्हतं होईल. 

"स्पष्टपणेच" सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहात  हे "स्पष्ट" दिसत असेल तेंव्हा किती "स्पष्टवक्तेपणा" दाखवायचा हे ज्याचं त्यांनी "स्पष्टपणे" ठरवणं महत्वाचं ठरतं :) 



अभय गोडसे

www.KPJyotish.com   

www.AbhayGodse.com


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...