ज्योतिष Consultation करत असताना बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, अनेक लोकं अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, अशाच प्रश्नांपैकी एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे "ज्योतिष हे जर शास्त्र आहे तर मग दोन ज्योतिषी एकाच पत्रीकेविषयी वेगवेगळी मतं कशी काय देतात?" अशा प्रश्न मला विचारला कि मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो " जर Medical हे Science आहे तर मग दोन डॉक्टर एकाच Patient विषयी वेगवेगळी मतं का देतात?, पहिला डॉक्टर सांगतो कि Operation करावाच लागेल, तर दुसरा डॉक्टर सांगतो कि नुसत्या औषाधानीच बरे वाटू शकेल.. तसेच जर law/कायदा same आहे तर मग एक वकील case हरतो आणि तीच case दुसरा वकील जिंकतो, हे कसे काय?"................................ ह्याचाच अर्थ कि Medical हे जरी Science असले तरी त्याची accuracy हि त्या त्या डॉक्टर वर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ज्योतिष हे जरी शास्त्र असलं तरी त्याची Accuracy हि त्या त्या ज्योतिषावर अवलंबून असते. ज्योतिषातील Accuracy हि ज्योतिषी व्यक्तीच्या खालील गोष्टीवर अवलंबून असते,
वरील गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट जरी Missing असेल तरी Accuracy जाऊ शकते..
ह्याचावर एक पुढचा प्रश्न असा विचारला जातो कि "मग आम्ही चांगला ज्योतिषी शोधायचा कसा?" परत माझा प्रतीप्रश्न "तुम्ही चांगला डॉक्टर कसा शोधता?" एक तर त्या डॉक्टर विषयी सगळी माहिती घेऊन नाहीतर मग आपल्या ओळखींच्यापैकी कोणीतरी Reference दिल्यामुळे आणि तिसरा मार्ग म्हणजे स्वतः अनुभव घेऊन ! मग चांगला ज्योतिषी देखील तसाच शोधावा !!
असाच एक दुसरा प्रश्न ज्योतिषाला विचारला जातो तो म्हणजे "ग्रह तारे तर पृथ्वीपासून इतके लांब आहेत मग त्यांचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा काय होतो?" ह्या बाबतीत दोन विचारधारा आहेत, पहिली विचारधारा अस मानते कि ग्रह directly परिणाम करतात जशी सूर्यापासून उष्णता मिळते वगैरे .. दुसरी विचारधारा अस मानते ग्रह हे फक्त गोष्टी Indicate करतात .. हि जास्त संयुक्तिक विचारधारा आहे. जन्माच्या वेळेस वर आकाशात ग्रहांची जी काही स्थिती असते ती काहीतरी दर्शवत असते.. म्हणजे कसं ? आपण वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याला सगळ्या बातम्या कळतात, वास्तविक वर्तमानपत्रामुळे घटना घडत नाहीत पण वर्तमानपत्रामुळे घटना माहिती होतात, अगदी तसच पत्रिकेच्या बाबतीत असत. पत्रिका किंवा ग्रह घटना घडवत नाहीत पण पत्रिका किंवा ग्रहांमुळे घडणाऱ्या घटना माहित होतात.. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला ग्रहांची जी स्थिती असते ती स्थिती म्हणजे पत्रिका आणि ती स्थिती काय दर्शवते हे ओळखण्याच साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र !
No comments:
Post a Comment