Tuesday, 14 November 2017

शिक्षण बिक्षण





प्रविण (नाव बदललं आहे) माझ्यासमोर बसला होता. अठरा वर्षांखालील मुले असतील तर मी त्यांच्या आईवडिलाना देखील येण्याची परवानगी देतो त्यामुळे त्याचे आईवडील देखील त्याच्याबरोबर आले होते. "अहो सर, आमचा मुलगा बिलकुल अभ्यास करत नाही हो" इती प्रवीणचे आईवडील. हा साधारण प्रत्येक आईवडिलांचा डायलॉग असला तरी इथे केस सिरीयस होती कारण यावर्षी तो फेल होता होता वाचला होता. मी पत्रिकेत डोकं खुपसलं. पत्रिका तर चांगल्या हुशार मुलाची वाटतं होती, म्हणजे "बुद्धी" हा प्रॉब्लेम नक्कीच नव्हता. चतुर्थ स्थान हे शिक्षणासाठी बघितलं जातं आणि ४, ९, ११ ही स्थाने शिक्षणासाठी चांगली मानली जातात पण इथे चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी आणि महादशा नेमकी विरोधी स्थानं दर्शवीत होती. त्यामुळे हि महादशा असेपर्यंत तरी शिक्षणात चांगली प्रगती दिसत नव्हती. तसेच पत्रिकेत शुक्राचा प्रभाव खूप जास्ती दिसत होता. शुक्र हा बर्यापैकी उच्शुंखल ग्रह आहे त्यामुळे थिअरॉटिकल किंवा अकॅडेमिक एजुकेशन ह्यात काहीच रस असण्याची चिन्हे नव्हती. पत्रिकेतल्या आणखी एका गोष्टीने माझं लक्षं वेधलं आणि ती गोष्ट म्हणजे "हायपर ऍक्टिव्हिटी". मी म्हंटलं "मुलाला मैदानी खेळाची खूप आवड आहे का? आणि प्रॅक्टिकल परीक्षेत नीट मार्कस मिळवतो ना !" आईवडिलांनी त्याला दुजोरा दिला आणि फुटबॉलची खूप आवड असल्याच सांगतलं. मी त्यांना समजवणाच्या सुरात म्हंटलं "प्रॉब्लेम हा बुद्धीचा नसून इंटरेस्ट चा आहे, ह्याला थेअरी चा कंटाळा आहे आणि म्हणून तो अभ्यास करत नाही आणि दुर्दैवाने भारतातील शिक्षण पद्धती ही जास्त अकॅडेमिक आहे, प्रॅक्टिकल नाही.  त्यामुळे खूप चांगल्या मार्कस ची अपेक्षा ह्याच्याकडून ठेऊ नका नाहीतर अपेक्षाभंगच होईल. दहावी नंतर ह्याला एखाद्या प्रॅक्टिकल कोर्से ला घाला जिथे थेअरी कमी आणि प्रॅक्टिकल जास्त आहे. तसेच ह्याच्या स्पोर्ट्स खेळण्याला प्रोत्साहन द्या, त्यात हा चांगली प्रगती करेल. पत्रिकेत टेक्निकल शिक्षण दर्शवित आहे पण थेअरी चा प्रॉब्लेम आहे म्हणून डिप्लोमा इन इंजिनीरिंग चालेल, डिग्री नको ". हे ऐकून मुलाचे आईवडील थोडे निराश झाल्यासारखे वाटले कारण त्यांना मुलाला CA किंवा डॉक्टर करायचा होता. 

प्रत्येक आईवडील त्यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलासाठी एक स्वप्न बघतात, बहुतेक वेळा स्वतः ची  अपूर्ण राहिलेली स्वप्न मुलाच्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात गैर काहीच नाही पण ते हे विसरतात कि प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात. सगळीच मुलं जर CA आणि डॉक्टर व्ह्यायला लागली तर मग अमिताभ बच्चन, आशा भोसले किंवा सचिन तेंडुलकर कोण होणार? सगळेच धोपट मार्गाने जात नाहीत. 

आपला मुलाने जर चांगले मार्क्स मिळवले नाहीत तर त्याच करियर बरबाद होणार, हा असाच एक गैरसमज ! बिल गेट्सच ऍकेडेमिक एजुकेशन अर्धवट राहिलंय तरी तो जगातला सगळ्यात श्रीमंत झालाच ना ! आणि कितीतरी पीचडी केलेले सर्वसाधारण आर्थिक स्थितीत असतात, माशा मारणारे डॉक्टर्स देखील आहेतच ना ! शिक्षण आणि करियर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जो पर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत मुलांना मार्क्ससाठी त्रास देणारे पालक असणारच. ह्याचा अर्थ शिक्षणाला महत्व देऊ नये असा अजिबात नाही पण मार्क्सचा अट्टाहास देखील नको, मुलाचा कल ओळखून मगच पुढे जावं. आज असे अनेक प्रविण असतील जे शिक्षण बिक्षण ह्यापेक्षा इतर गोष्टीत प्राविण्य मिळवत असतील, त्यांना देखील प्रोत्साहनाची गरज आहेच !   

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
 

No comments:

Post a Comment

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...