आज सकाळी California ला consultation होतं. 11 वर्षाच्या मुलाच्या पालकांचा प्रश्न होता कि आमच्या मुलाला स्पोर्ट्स मधे यश आहे का? मुलाच्या पत्रिकेत 2029 पर्यंतचे आणि त्यानंतरचे काळ देखील स्पोर्ट्स साठी खूप चांगले होते. अवॉर्ड्स, achivements ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेत दिसत होत्या त्यामुळे नक्की त्याला प्रोत्साहन द्याचं असं मी सांगितलं. तसंच, त्याच्या पत्रिकेत तो मैदानी खेळ खेळेल असंही दिसत होतं. (म्हणजे बैठे खेळ जसं chess, कॅरम तो खेळेल असं दिसत नव्हतं). हे सगळं जरी उत्तम दाखवतं होतं तरी हा मुलगा त्याच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे ग्रुपमधे adjust होऊ शकणार नाही असं पत्रिका दाखवतं होती. म्हणजेच ग्रुपमधे खेळले जाणारे खेळ जसं क्रिकेट वगैरे हा खेळू शकणार नाही हे स्पष्ट होतं.
हा मुलगा टेबल टेनिस आणि लॉन टेनिस खेळत होता, जे match होतं होतं पण पत्रिकेनुसार ह्याचा स्वभाव अहंकारी, हट्टी दाखवतं असल्यामुळे हा मुलगा doubles खेळताना सह-खेळाडूला co-operate करणार नाही, हे हि मी सांगितलं. पालकांनी लगेच मान्य करत हा नेहमी Singles च खेळतो, असंही सांगितलं. काही काही पत्रिका किती आणि कुठले कुठले details दाखवू शकतात ह्याचच हे एक उदाहरणं.
No comments:
Post a Comment