अशोक (माझे एक जुने client) यांचा मला फोन आला "गोडसे सर, एका गोष्टीसाठी तुमची Appointment पाहिजे." अशोक यांचा इंजिनीरिंग क्षेत्रात business होता, त्यामुळे मला वाटलं कि नेहमी प्रमाणे धंद्यातल्या काही नवीन इन्व्हेस्टमेंट वगैरे संदर्भात विचारायचं असेल. पण यावेळी काही वेगळंच विचारायचं होतं, ते म्हणाले "मला एका माणसाला माझ्या कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून नेमायचं आहे". मी "बरं मग?", अशोक "हया माणसाला सेल्स फील्ड मधला दांडगा अनुभव आहे, हा माणूस मला माझ्या कंपनीत हवा आहे, पण, जर हा माणूस माझ्या कंपनीत सलग ३-४ वर्ष राहणार असेल तर आणि तरच मी ह्याला घेणार आहे. मला सलग ३-४ वर्ष कंपनीसाठी काम करेल असा माणूस हवा आहे, हे तुम्ही सांगू शकता का?". मी "हो नक्कीच, पण, त्यांचे Birth Details Available आहेत ना !". अशोक "हो, मी आधीच घेऊन ठेवलेत". अशोक त्या माणसाची पत्रिका घेऊन आले. पत्रिका बघताना अस लक्षात आलं कि, पुढच्या २ वर्षात ह्या माणसाला एका खूप मोठया कंपनीतून (large scale & well known company) ऑफर मिळण्याच्या indications आहेत तसेच हा माणूस आजिबात प्रामाणिक नाही, त्यामुळे अशोक यांच्या अपेक्षा हा माणूस पूर्ण करू शकणार नाही. अशोक यांना हे सगळं मी सांगितलं आणि ते आभार मानून निघून गेले. पुढे काही दिवसांनी अशोक यांनी सांगितलं कि तो माणूस आता Abroad नोकरी करतो, त्याला आधीपासून Abroad च जायचं होतं पण नोकरी मिळत नव्हती म्हणून तो माझी job ऑफर घेयला तयार झाला होता, त्यामुळे तो माझ्याकडे जास्ती काळ नक्कीच राहिला नसता, ३-४ वर्ष तर लांबचीच गोष्ट झाली.
हा झाला फक्त एक अनुभव पण पुष्कळ वेळा मला अस आढळलंय कि चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं काम करत असतात. Man Management अजिबात येत नसताना माणुस management पोस्ट वर फक्त seniority च्या basis वर नेमला जातो, तसच marketing ability शून्य असताना फक्त MBA केलंय म्हणून घेतला जातो आणि मग तो काम करताना inefficient ठरतो. कंपनीच भवितव्य हे कंपनीत काम करणारया लोकांवर अवलंबून असतं. चुकीच्या पोस्टवर चुकीची माणसं नेमली गेली तर कामकाज बिघडणारच !
पत्रिकेच्या आधारे हे नक्की कळू शकतं कि एखाद्या माणसात नक्की कुठली skills आहेत आणि तो कशा प्रकारे कंपनीला फायदेशीर ठरू शकतो. Interview घेतानाच्या थोड्याशा वेळात प्रत्येक व्यक्तीची पारख नीट होऊ शकत नाही पण त्या आधी पत्रिकेच्या माध्यमातून जर काही inputs घेऊन ठेवलेली असतील तर मांणसांची निवड करताना खूप सोपं जाऊ शकतं हे मात्र नक्की ! पत्रिकेच्या माध्यमातून मिळालेल्या पॉईंट्स नुसार interview मधे त्याला प्रश्न विचारून खात्री करून घेतली जाऊ शकते. त्याचे weak points कुठले आणि strong points कुठले, हे देखील कळू शकतं, फक्त ते जाणून घेण्याची इच्छा मात्र मालकाला पाहिजे. काही काही कामं अशी असतात जिथे secrecy maintain करण्याची गरज असते, तिथे तो माणूस प्रामाणिक आहे ना याची खात्री करावी लागते, प्रामाणिकपणाच कुठलीही लायसेन्स नसतं. ह्या सगळया गोष्टी तपासून घेतल्या जाऊ शकतात. काही वेळेला एखादं डिपार्टमेंट सांभाळताना दोन माणसांचा समन्वय चांगला असणे गरजेचं असतं, त्या दोन माणसांचच जर एकमेकांशी पटत नसेल तर कामकाजाचा बट्याबोळ होवू शकतो. त्या ठिकाणी कुठली दोन माणसे नेमावीत हे देखील पत्रिकेच्या माध्यमातून तपासून घेतलं जाऊ शकतं. इथे जागा अपुरी पडेल इतक्या गोष्टी सांगता येतील पण शेवटी योग्य पोस्टवर योग्य माणूस असणं हे अतिशय महत्वाचं ठरतं, म्हणून आधीच काळजी घ्यावी employee निवडताना..
अभय गोडसे
For consultation, Visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com
No comments:
Post a Comment