Thursday, 18 July 2013

घरातूनच पैसे हरवतात तेंव्हा.. 

 

ज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो? किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं? प्रश्न जरी दोन असले तरी उत्तर मात्र एकच.. अडचण आल्यावर ! असेच एक जण माझ्याकडे आले, एरवी बाहेर ज्योतिषशास्त्राविषयी शंका घेणे आणि गरज पडली कि मात्र ज्योतिषाचा सल्ला घेणे अशी दुटप्पी वागणूक असणारे काही लोक असतात, हे देखील त्यापैकीच एक होते.. अशा लोकांचा मला थोडासा(?) रागच येतो.. पण हि व्यक्ती Client नसून चांगल्या ओळखीचीच असल्यामुळे त्यांना मी काही जास्त बोललो नाही.. असो !

ती व्यक्ती "अरे काही दिवसांपूर्वी मला एकाकडून मिळालेली एक रक्कम मी घरातल्याच एका
कपाटात नेहमीच्या कप्प्यात ठेवली होती आणि आता बघतो तर ती कुठेच मिळत नाही, ह्या बाबतीत पत्रिकेवरून आपल्याला काही कळू शकतं का?" मी म्हंटल "हो बघुया ना, पण मला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाणच लागेल" इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि ९५% Astrologers हे असे प्रश्न, प्रश्नकुंडली वरूनच बघतात पण Somehow ह्या प्रश्नाची उतरं जन्मकुंडलीच देऊ शकेल अस मला खूप Strongly वाटत म्हणून मी असे प्रश्न नेहमी जन्मकुंडलीवरूनच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली.. वाचकांच्या माहितीसाठी आणि विशेषत: ज्योतिष अभ्यासकांसाठी, त्यांची जन्मकुंडली खाली देत आहे..हा प्रश्न जुन २०१३ ला विचारला होता, त्या वेळेला ह्या पत्रिकेला शुक्र महादशा, राहू अंतर्दशा आणि शनी विदशा सुरु होती, जानेवारी २०१३ ते जुलै २०१३, प्रश्न विचारला तेंव्हा शनी वक्री होता, पण जन्मकुंडलीत शनि मार्गीच आहे आणि तो देखील लाभात, Cusp Chart मधे देखील मागे 10th house मधे जात नाही.. तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात आहे, Cusp Chart मध्ये बुध 9th house मधे जात आहे So विदशा स्वामी शनी १,५,६,९,१०,११  या स्थानाचा कार्येश होतो, ११ चा बलवान कार्येश होतो, १२th house लागतच नाही म्हणजे पैसे मिळणार हे निश्चित, म्हणून मी त्यांना सांगितल कि नुकसान होणार नाही, पैसे मिळतील ! प्रश्न विचारला तेंव्हा शनि वक्री होता आणि शनी साधारण फेब्रुवारी २०१३ ला वक्री झाला होता आणि त्यांच्या पत्रिकेत शनीचा एवढा Strong संबंध होता म्हणून मी त्यांना विचारल कि पैसे Feb. २०१३ च्या आधी मिळाले होते कि नंतर? आणि पैसे मिळाले तेंव्हा शनिवार होता का? त्यावर ते म्हणाले कि साधारण फेब्रुवारी २०१३ च्या आसपास पैसे एकाला उधार दिले होते आणि त्यांनी ते परत आणून दिले आणि आणून दिले तो वार शनिवारच होता ! दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीची तूळ रास आहे म्हणजे साडेसाती देखील सुरु आहे, म्हणजे शनीचा सबंध परत परत येत होता, ह्या पत्रिकेत शनी विदशा ६ आणि ११ ची कार्येश होते, 6th house हे समोरच्या माणसाचे व्यय स्थान आणि 11th house हे लाभ स्थान, उसने दिलेले पैसे परत मिळाले होते आणि ते देखील शनी वक्री असताना म्हणजे शनी नुकसान नक्की करणार नाही, म्हणजे पैसे मिळणारच ह्या बाबतीत माझी खात्री झाली आणि आता शनी वक्री असल्यामुळे हा घोळ झाला आहे हे देखील कळलं म्हणून मी त्यांना म्हंटल कि पैसे नक्की मिळतील, नुकसान होणार नाही ! आणखी एक गोष्ट, शनीचा संबंध वयस्कर व्यक्तीशी आहे, त्यांच्या घरात स्वतः हि व्यक्ती सोडून दुसरी कोणी वयस्कर व्यक्ती नाही, So, पैसे शोधण्यासाठी ह्या व्यक्तीने स्वतःच पुढाकार घ्यावा, हे देखील आलंच !

शनी ८ जुलै ला मार्गी होत होता म्हणून त्याच्यानंतर पैसे मिळतील अस वाटतंय अस मी त्यांना सांगितल.. हा प्रश्न साधारण जून च्या दुसरया आठवडयात विचारला होता शनीचा संबंध असल्यामुळे उशीर होणार हे देखील ओघाने आलंच, इथे सुद्धा अंकशास्त्रानुसार ८ आकड्याचा संबंध शनीशी आहेच ! 

हे सगळ बोलणं झाल्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि ९ जुलै ला त्यांचा मला सकाळी सकाळी फोन "अभय, Good Morning आणि Good News, पैसे मिळाले rather सापडले, ज्या कपाटात मी ठेवले होते त्याच कपाटात शोधता शोधता मिळाले" त्यावर मी "आता कळल ना ज्योतिषशास्त्र खरं असतं ते !" अस म्हणण्याचा मोह आवरत फक्त "अरे वा, बरं झालं, गुड" एवढच म्हंटल !

ता.क. : मी हा लेख लिहित असताना हीच व्यक्ती काही वेगळ्या कामासाठी माझ्याकडे येउन गेली, हा हि एक योगायोग !

अभय गोडसे

My Websites  www.Kpjyotish.com   www.AbhayGodse.com


My Facebook Profile  


 

No comments:

Post a Comment

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...