Monday, 16 September 2013

Practical Way-Outs ( व्यावहारिक उपाय )

Practical Way-Outs ( व्यावहारिक उपाय )

ज्योतिष म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर उपाय देखील दिसू लागतात. रत्न, शांती, जप असे अनेक उपाय ज्योतिषी सांगत असतात. बऱ्याच लोकांना अस वाटत कि प्रत्येक Problem साठी उपाय हा असतोच आणि एकदा तो उपाय केला कि माझे सगळे Problems Solve होतील, पण अस नसतं. मी नेहमी म्हणतो कि उपाय हे Grace Marks सारखे Work out होतात. समजा Exam मधे Passing ४० ला असेल आणि एखाद्याला ३५ मिळाले तर ५ grace marks मिळू शकतात पण १०० पैकी १० मिळाले तर ३० grace marks मिळू शकत नाहीत. मिळालेल्या मार्कांच्या तिप्पट grace marks कुठल्याही Exam मधे मिळत नाहीत.  थोडक्यात काय तर काही Problems साठी उपाय असतात पण सगळ्याच problems साठी उपाय नसतात. 

काही काही problems साठी Astrological उपाय नसतात पण Practical way-outs किंवा व्यावहारिक उपाय असतात. आता तुम्ही म्हणाल कि हे कसं असतं?.. हे सगळं उदाहरणं आणि अनुभवातून सांगणं फार सोप जाईल म्हणून काही उदाहरणं तुमच्यासाठी देत आहे. (उदाहरणातील नावं हि बदललेली नावं आहेत, खरी नावं दिलेली नाहीत )

१) सुदीपची पत्रिका बघितल्यावर मी त्याला सांगितल कि अमुक अमुक काळात Job मधे तुझ्यावर False Allegations / खोटे आरोप होण्याची शक्यता आहे म्हणजेच तू एखाद काम केलेलं असताना सुद्धा तू ते केल नाहीस असा आरोप होऊ शकतो किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा तुला मिळू शकते. "आता ह्याच्यावर उपाय काय?" सुदीपने विचारल, मी म्हंटल "Astrologically काहीही उपाय नाही पण Practical way-out आहे. तो म्हणजे तू त्या काळात जे जे काही काम करशील त्याच always Proof ठेवायचं, Proof हे एखादं Document/Email किंवा साधा SMS देखील असू शकतो, म्हणजे त्या काळात तुझ्यावर खोटे आरोप झाले तरी तुझ्याकडे तुझ्या कामाचं proof आधीपासूनच असल्यामुळे ते "खोटे" आरोप "खरे" ठरणार नाहीत. म्हणजेच Proof ठेवल्यामुळे तू ह्या Problems मधून मार्ग काढू शकशील. दुसरं महत्वाच म्हणजे ह्या काळात एखाद्या colleague वर जास्त विश्वास ठेऊ नकोस कारण तो देखील आयत्या वेळेला त्याच मत बदलू शकतो."

२) निकिता एक स्वतः एक आयुर्वेदिक Doctor होती आणि तरीही माझ्याकडे येउन स्वतःच्या Health Problem विषयी प्रश्न विचारात होती. मी तिची पत्रिका बघितली आणि म्हंटल "तू स्वतः जरी आयुर्वेदिक डॉक्टर असलीस तरी तुझ्या पत्रिकेत Homeopathy तुला लागू होण्याच्या Indications जास्त आहेत so तू तुझ्या कुठल्याही health problems साठी आयुर्वेदापेक्षा Homeopathy try कर, त्यांनी तुला जास्त उपयोग होईल." त्यावर ती म्हणाली कि मी जरी आयुर्वेदिक Doctor असले तरी मी already Homeopathy Medicine घेतेय. मी म्हंटल "Yes, this is correct, तेच continue कर"

३) "माझा मुलगा अभ्यासात अजिबात Interest घेत नाही हो, दहावीचं वर्ष असून सुद्धा हा जास्ती तास अभ्यास करत नाही. ह्यासाठी काही उपाय आहे का?" Mrs जोशी आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाविषयी विचारात होत्या. मी पत्रिका बघितली, सिंह लग्न सिंह रास, पत्रीकेतली गोम माझ्या लक्षात आली. मी म्हंटल "तुमचा मुलाची Intelligence Level वगैरे चांगली आहे पण तो Hyper Active आहे म्हणजे अशा लोकांना सतत काहीतरी physical activity लागते, तुम्ही म्हणाल कि एका  जागी बसून ४ तास अभ्यास कर, तर तो करणार नाही. त्याला एका दिवसात अनेक Physical Activity द्या आणि मग अभ्यास करायला सांगा आणि त्याच Grasping चांगलं असल्यामुळे थोडा वेळ अभ्यास केली तरी तो पुरेल, १० तास अभ्यास करायची गरज नाही." त्यावर Mrs जोशी "हो, हे आहे, तो Sports मधे खूप interested आहे पण आता दहावीच वर्ष म्हणून आम्ही जरा त्याला Sports कमी कर अस सांगतोय" मी म्हंटल "हे त्याला सांगू नका, अशा लोकांना त्यांच्यातल्या Energy च Application पाहिजे असत आणि तस नाही झालं तर मग आदळआपट करतात. Actually दोन्ही गोष्टी करून त्याचा Balance करायला सांगा, तो पुस्तकातला किडा होणार नाही"

४) "आम्हाला मुल कधी होईल? आणि त्यासाठी काही उपाय आहे का?" माझ्यासमोर बसलेलं एक couple विचारत होतं. दोघांच्याही पत्रिकेत मुल होण्यासाठीच्या Indications होत्या म्हणून मी त्यांना म्हंटल कि तुम्हाला मुल १००% होईल पण late indications आहेत आणि जो काही कालावधी होता तो सांगितला. त्यावर त्यांनी विचारल "तरी पण काही उपाय असता तर बरं झाल असत" मी म्हंटल "उपाय नाही पण काही Practical way-outs आहेत ते सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट कि तुम्हाला मुल होण्यासाठी "More than one medication" चा जास्ती उपयोग होईल, म्हणजे एकाच वेळेला Allopathy & Homeopathy  किंवा एकाच वेळेला Allopathy & आयुर्वेदिक treatment घेयच्या, ह्याचा मुल होण्यासाठी जास्त उपयोग होण्याच्या indications आहेत. दुसरं म्हणजे तुमच्या पत्रिकेत Young Doctor च्या Treatment चा उपयोग होण्याच्या indications जास्त आहेत so शक्यतो तसाच Doctor बघा, Male Female कोणीही चालेल", त्यावर ते म्हणाले कि आम्ही या दोन्ही पैकी काहीच केलेल नाही. मी म्हंटल "हे दोन्हीहि करा, त्याचा जास्त उपयोग होईल"

५) Married Life मधल्या Problems विषयी विचारण्यासाठी एक मुलगी आली होती. दोघांच्या पत्रिका मी बघितल्या आणि म्हंटल "दोघांच्या पत्रिकेत Divorce चे chances अजिबात वाटत नाही, so Divorce होणार नाही, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याशी जास्त adjust करावं लागेल, तो फार adjust करणार नाही" त्यावर ती म्हणाली "हो, ते मी Already करतेच आहे पण ह्यावर काही उपाय आहे का?" मी म्हंटल "उपाय नाही पण Practical way-out आहे त्यांनी adjustment करण थोडं सुसह्य होऊ शकेल, तो असा कि तुमच्या नवरयाला भरपूर Ego आहे, तेंव्हा त्याचा Ego hurt न करता आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करून घ्या. म्हणजे त्याच्याशी Diplomatically वागा, एखादी गोष्ट Directly सांगू नका, नाहीतर तो अजिबात करणार नाही. एखाद्या पेहलवानाला मी जर Order दिली किंवा हुकुम सोडला कि अमुक अमुक काम कर तर तो अजिबात कारण नाही पण त्याच्या शरीरयष्टीची तारीफ करून नंतर हवं ते काम त्याच्या कडून करून घेणं सोपं असतं, हे देखील तसच आहे" 

अशी हि Practical way-outs ची काही उदाहरणं.. अशी अनेक उदाहरणं आहेत, त्यातली काही इथे दिलेली आहेत. जिथे एखाद्या गोष्टीवर काही Astrological उपाय नसतो तिथे हे Practical way-outs ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या माणसाच्या खूप उपयोगाला येऊ शकतात हे मात्र नक्की !  

अभय गोडसे



No comments:

Post a Comment

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...