#Know_the_Facts_than_Fantasies
www.KPJyotish.com
www.KPJyotish.com
2017 साली West Bengal मधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने त्याच्या करियरसाठी कन्सल्ट केलं. Software field मधली नोकरी सोडून व्यवसाय करता येईल का? दुर्दैवाने ह्या त्याच्या प्रश्नाच उत्तर पत्रिकेत नकारार्थी होतं. त्याची साडेसाती देखील सुरु होणार होती त्यामुळे करियर मधे अडचणी (Job changes, Job less patches) येणार आहेत असा रेड अलर्ट देखील मी दिला. एवढं सांगून सुद्धा ह्या माणसाने 2018 मधे नोकरी सोडून उदबत्ती उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय अजिबात चालला नाही, व्यवसायात घातलेले पैसे बुडले आणि आता 2019 मधे परत नोकरीकडे वळण्याची वेळ आलीय.
कृष्णमूर्ती पद्धतीच्या ज्योतिष अभ्यासकांसाठी पत्रिका खाली देत आहे.
23rd Oct 1974, 17.02, Kolkata
ह्या पत्रिकेत दशमाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र हा दशमाचा बलवान कार्येश असून सप्तमाचा कार्येश होत नाही तसेच महादशास्वामी गुरु हा देखील सप्तमाचा बलवान कार्येश नाही. त्यामुळे नोकरी हा एकमेव मिळकतीचा स्रोत पुढे सुद्धा राहील. साडेसातीत बरेच वेळेला विनाशकाले विपरीत बुद्धी असा अनुभव येतो, चुकीचे निर्णय हेच अंत्यंत बरोबर वाटतात. तसा प्रकार इथे झाला.
आता इथे आणखी एक प्रश्न उभा रहातो कि ह्याने उदबत्तीचाच व्यवसाय का सुरु केला? जर तुमचं लक्ष सध्या (2018/2019 साल) सुरु असलेल्या अंतर्दशेकडे गेलं असेल तर कळेल कि शुक्राची अंतर्दशा सुरु आहे. शुक्र हा स्वराशीत (तुळेत) सप्तमात आहे. शुक्र हा सुवास, सुंगधी द्रवै ह्यांचा कार्येश आहे त्यामुळे त्याला ह्या अंतर्दशेत शुक्रा संबंधिच व्यवसाय करण्याची बुद्धी झाली.

अभय गोडसे,
For Consultation, visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com
No comments:
Post a Comment