Friday, 20 December 2019
पत्रिका बोलते..
Saturday, 14 December 2019
पोलीस ऑफिसर कि टीचर?
Friday, 15 November 2019
भामटा
एक व्यक्ती (स्वतःला ज्योतिष अभ्यासक म्हणवणारी) पत्रिका दाखवायला आली. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या होत्या त्यामुळे माझ्या ज्योतिष ज्ञानाबद्दल त्यांची खात्री पटली. Consultation दरम्यान माझ्या असं लक्षात आलं कि ते स्वतःला अभ्यासक म्हणवत असले तरी त्यांचं ज्ञान अगदीच थातूर मातुर आहे.
अभय गोडसे,
For Appointment, Visit KPJyotish.com
AbhayGodse.com
Monday, 4 November 2019
ज्योतिष आणि दैवी मार्गदर्शन
ज्योतिष मार्गदर्शन हे दैवी मदतीशिवाय अपूर्ण असतं. ज्योतिष हा काही फक्त आकड्यांचा किंवा नुसत्या राशींचा खेळ नव्हे. अचूक मार्गदर्शन हे दैवी मदतीनेच शक्य होतं. हे दैवी संकेत कसेही मिळू शकतात. एखादा विचार त्याच वेळेस प्रकर्षाने जाणवणे, एखादी action काहीतरी सांगून जाते. असेच दैवी मदतीचे मला आलेले काही अनुभव इथे सांगतोय, जरूर वाचा.
#1
दोन वेळा घटस्फोट झालेल्यांच्या पत्रिका मला एका ग्रुपवर टाकायच्या होत्या. अशा एका क्लायंटच नाव त्याचे birth details सॉफ्टवेअरमधे शोधण्यासाठी हवं होतं पण काही केल्या ते नाव मला आठवत नव्हतं. एक तास झाला.. दीड तास झाला.. तरी नाव आठवेना.. विचार करून त्रास व्हायला लागला आणि तेव्हढ्यात माझ्या मोबाईलवर एक कॉल आला, एक रिंग वाजली आणि कट झाला. फोन उचलून बघितलं तर truecaller ने एक नाव दाखवलं आणि आश्चर्य म्हणजे हे तेच नाव होतं जे मी मघाच पासून आठवण्याचा प्रयत्न करत होतो. विशेष म्हणजे त्या नंबर वरून मला परत फोन आला नाही आणि आडनाव जरी सारखं असलं तरी तो त्या क्लायंट चा नंबर नव्हता.
#2
एका आयुर्वेदिक डॉक्टरची पत्रिका बघत होतो. मुलं होण्याविषयी प्रश्न होता. त्या संबंधात उत्तरं देऊन झाली आणि ज्योतिष नियमानुसार असं लक्षात आलं कि ह्या बाईचा अन्नाविषयी (चुकीच्या खाण्याविषयी) काहीतरी प्रॉब्लेम आहे. तशी कल्पनाही मी त्यांना दिली पण तरीही exactly काय प्रॉब्लेम्स आहे हे कळत नव्हतं. दोन मिनिटं गेल्यावर अचानक माझ्या डोक्यात हजार वॅटचे ब्लब लागले आणि असं प्रकर्षाने जाणवलं कि गोड पदार्थांविषयी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या स्वतः डॉक्टर असून सुद्धा मी त्यांना 'गोड जास्ती खाऊ नका त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार आहेत' असं सांगितलं, त्यावर त्या लगेच म्हणाल्या "हो, मी गोड खूप खाते पण आता कमी करेन"
#3
लग्नाचं स्थळ..
आता हा किस्सा ज्योतिष मार्गदर्शनाच्या वेळचा नसून माझ्या स्वतःच्या लग्नासाठी मुली बघतानाचा आहे. एक स्थळ आलं, मुलीचं दिसणं, शिक्षण, नोकरी ह्या सगळया गोष्टीत नावं ठेवायला जागा नव्हती, सगळं व्यवस्थित. मुलीला पहिल्यांदा भेटलो, नेहमीप्रमाणे चहा पोह्याचा कार्यक्रम सुरु होता, सगळं ठीक वाटतं होतं. चहा पिऊन झाल्यावर त्या मुलीने कपबशी टीपॉयवर ठेवली आणि तिची ती action बघून मला एकदम प्रकर्षाने Negativity जाणवली आणि असं वाटलं कि हि मुलगी Liability होणार ! तिच्या actions मधे practically बघता काहीच दोष नव्हता तरीही काहीतरी प्रकर्षाने निगेटिव्ह जाणवलं पण काय ते माहित नव्हतं. आईबाबांची पुढे जायची तयारी होती पण शेवटी मी नकार दिला. हि घटना घडून साधारण एक दीड वर्ष झालं असेल, एके दिवशी त्या मुलीचा फोटो आम्हाला वर्तमानपत्रातल्या 'निधन वार्ता' सदरात दिसला आणि आम्ही उडालो.. blood cancer मुळे त्या मुलीचं निधन झालं होतं. समजा लग्न केलं असतं तर?
#4
'ग' अक्षराचा डॉक्टर..
क्लायंटच्या health problem संदर्भात पत्रिका बघत होतो. पत्रिका बघताना असं लक्षात आलं कि ह्याला 'ग' ह्या अक्षराने नावं सुरु होण्याऱ्या डॉक्टरचा उपयोग जास्त होणार आहे. मी त्यांना तसं सांगितलं आणि नावांच उदाहरणं देताना 'गणेश' हे नावं त्या वेळेला माझ्या डोक्यात प्रकर्षाने आलं म्हणून ते सांगितलं. त्यावर त्याला आश्चर्य वाटलं कारण 'गणेश' नावाच्याच डॉक्टरची ट्रीटमेंट तो पूर्वी घेत होता पण काही कारणाने ती थांबवावी लागली होती, ती लगेच पुन्हा सुरु करा असं मी सांगितलं.
#5
इस्टेट..
"मला वडिलोपार्जित इस्टेट मिळेल का?" असा एका क्लायंटचा प्रश्न बघत होतो. त्याच्या पत्रिकेत वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत होते पण पूर्ण हक्क मिळेल असं दिसत नव्हतं म्हणून मी म्हंटल कि हि संपत्ती मिळण्यात काही अडचण आहे का? असं विचारल्यावर त्याने भावाची पत्रिका समोर ठेवली. त्या पत्रिकेविषयी बोलत असताना एकदम मी म्हंटल कि तुमच्या भावाला तुमचा हिस्सा द्येयचा नाहीये कारण तो म्हणतोय मी आईवडिलांच सगळं केलंय आणि बाहेरगावी बसलेल्या तुम्हाला काय म्हणून हिस्सा द्येयचा. हे माझं वाक्य ऐकून तो क्लायंट म्हणाला "अहो तो खरंच अगदी असंच म्हणतोय." हे वाक्य त्या वेळेला मला सुचलं किंवा प्रकर्षाने जाणवलं असं म्हणता येईल.
#6
एक मुलगी पहिल्यांदाच माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन आली आणि मी पत्रिका बघण्याच्या आधीच तिने तिची रिलेशनशिप कशी ब्रेक झाली ते सांगायला सुरुवात केली. ते ऐकून झाल्यावर मी म्हंटल "पण, हि तुमची पहिली रिलेशनशिप नाही आणि शेवटची पण नाही, त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुमची परत एकदा रिलेशनशिप होणार आहे". हे ऐकून ती म्हणाली "हे सगळं खरं आहे पण तुम्हाला हे पत्रिका न बघताच कसं कळलं?" त्या मुलीला बघून तिचा शुक्र बिघडलेला आहे अशी जाणीव झाली आणि म्हणून मी ते बोललो होतो.
अभय गोडसे,
For Appointment, Visit
KPJyotish.com
AbhayGodse.com
Thursday, 22 August 2019
सॉफ्टवेअर आणि उदबत्ती !
www.KPJyotish.com
आता इथे आणखी एक प्रश्न उभा रहातो कि ह्याने उदबत्तीचाच व्यवसाय का सुरु केला? जर तुमचं लक्ष सध्या (2018/2019 साल) सुरु असलेल्या अंतर्दशेकडे गेलं असेल तर कळेल कि शुक्राची अंतर्दशा सुरु आहे. शुक्र हा स्वराशीत (तुळेत) सप्तमात आहे. शुक्र हा सुवास, सुंगधी द्रवै ह्यांचा कार्येश आहे त्यामुळे त्याला ह्या अंतर्दशेत शुक्रा संबंधिच व्यवसाय करण्याची बुद्धी झाली.
Thursday, 8 August 2019
तुझं लग्न होणारच !
www.KPJyotish.com
2014 सालात एका काश्मिरी मुलाने करियरसाठी कन्सल्ट केलं. त्यानंतर त्यानी विचारलं कि माझ्या पत्रिकेत लग्न आहे का? माझ्या होकारार्थी उत्तराने तो गोंधळला आणि म्हणाला कि मला तर लग्नच करायचं नाहीये तर मग पत्रिकेत असलं तरी होणार कसं? मी तर करणारच नाही. मी म्हंटल कि जेव्हा तुझ्या नशिबात लग्न आहे पण तुला करायचं नाहीये याचा अर्थ असा कि जेव्हा लग्नासाठीचा काळ येईल तेंव्हा काहीना काही कारणाने तू लग्नाला होकार देशीलच. त्यावेळी मी सांगितलेल त्याला जरी पटलं नसलं तरी 2019 मधे जेव्हा हाच (लग्न न करण्यावर ठाम असलेला) मुलगा त्याच्या बायकोच्या करियरविषयी माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला तेंव्हा "तुझं कसं काय लग्न झालं बाबा?" ह्या माझ्या प्रश्नावर त्याच्याकडे स्मितहास्य करण्याशिवाय काही उत्तर नव्हतं.
ज्योतिष अभ्यासकांसाठी पत्रिकेचं विश्लेषण खाली देत आहे..
अर्जुन, 2nd Sept 1985, 21.55, Akhnoor, Jammu
लग्न होण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11 ह्यापैकी एकातरी स्थानाचा कार्येश हवा. ह्या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी शनी हा 7, 11 चा कार्येश होतो, त्यामुळे लग्न होणार आहे. त्याचबरोबर महादशा स्वामीची देखील साथ बघणं महत्वाचं आहे. शुक्र महादशा 2020 पर्यंत आहे. महादशास्वामी शुक्र हा 2, 7, 11 या तीनही स्थानांचा कार्येश आहे त्यात सुद्धा 2 आणि 7 ह्या भावात ग्रह नसल्यामुळे त्यांचा बलवान कार्येश आहे, त्यामुळे लग्न हे ह्याच महादशेत होणार. शनी हा विरक्तीचा कार्येश आहे. ह्या पत्रिकेत शनी हा प्रथम तसेच सप्तमाचाही कार्येश आहे आणि सप्तमातच उच्चीचा आहे त्यामुळे ह्या मुलाला लग्न करण्याची इच्छाच नव्हती तरीपण पत्रिकेत लग्न होतंच. आता शुक्र महादशेतल्या कुठल्या अंतर्दशेत लग्न होणार हा प्रश्न उभा राहतो. हा मुलगा जेव्हा consultation साठी आला तेंव्हा शनीचीच अंतर्दशा सुरु होती जी 7 आणि 11 ची बलवान कार्येश आहे. ह्या मुलाचं लग्न शनी अंतर्दशेतच 2016 मधेच झालं.
अभय गोडसे,
For Consultation, visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com
Friday, 12 July 2019
Consultation - सापाच्या साक्षीने..
रविवार सकाळची पहिलीच Appointment !अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळे ती कधी मिळेल हा त्याचा महत्वाचा प्रश्न होता. पत्रिकेनुसार जे काही मुद्दे होते ते सांगून झाल्यानंतर तो म्हणाला "मला आयुष्य भरपूर आहे ना?". पत्रिकेत अल्पायुष्य वगैरे नव्हतं पण माझा प्रश्नाथर्क चेहेरा बघून तो म्हणाला "मला काही आजार वगैरे नाहीये पण माझ्या छंदामुळे हा प्रश्न मी विचारला". असा कुठला छंद आहे जो ह्याला मरणाच्या दारपर्यंत घेउन जाऊ शकतो?
"मी सर्पमित्र आहे" तो म्हणाला, "सापांची मला लहानपणापासुन आवड आणि आता तो मी छंद म्हणून जोपासलाय. कोणाकडे घरात किंवा आवारात साप दिसला कि मला फोन येतो. माझ्या घरातले या छंदामुळे जरा नाराज आहेत पण कोणालातरी सापांना वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल." "Wow Great ! पत्रिकेत तसा काही धोका नसल्यामुळे तुम्ही हा छंद जरूर जोपासा" मी म्हंटल. पुढे तो म्हणाला "आजच सकाळी एक कॉल आला होता. मी तिकडून डायरेक्ट तुमच्याकडेच आलोय; माझ्याकडच्या सॅकमधे एक साप आहे" बाजूच्या सॅककडे बोट दाखवत तो म्हणाला. आतापर्यंत माझं consultation एका सापाच्या साक्षीने सुरु होतं हे ऐकून गंमत वाटली. माझ्या ऑफिस च्या आजुबाजुला बरीच मुंगुसं फिरत असताना मी बघितली आहेत पण सापाच्या उपस्थितीत केललं हे माझं पहिलचं Consultation !
Thursday, 11 April 2019
स्वभाव आणि पत्रिका
अंकिता (नाव बदललेलं आहे) माझ्याकडे तिच्या भावाची पत्रिका दाखवण्यासाठी आली होती. नोकरी संबंधी प्रश्नांची उत्तर देत असतांना मी म्हंटल कि हा मुलगा बऱ्याच नोकऱया बदलणार आहे.
माणसं वाचताना..
2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...
-
It's better to know the FACTS than FANTASIES.. Astro Fact about " Planned delivery of a child": "Planned Deli...
-
2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...
-
Counsellor may not be an Astrologer but an Astrologer should be also a good counsellor. Though, prediction is a technical part...