Thursday, 18 July 2013

घरातूनच पैसे हरवतात तेंव्हा.. 

 

ज्योतिषाकडे माणूस केव्हा येतो? किंवा ज्योतिषशास्त्राची मदत घ्यावी असा एखाद्या माणसाला केंव्हा वाटतं? प्रश्न जरी दोन असले तरी उत्तर मात्र एकच.. अडचण आल्यावर ! असेच एक जण माझ्याकडे आले, एरवी बाहेर ज्योतिषशास्त्राविषयी शंका घेणे आणि गरज पडली कि मात्र ज्योतिषाचा सल्ला घेणे अशी दुटप्पी वागणूक असणारे काही लोक असतात, हे देखील त्यापैकीच एक होते.. अशा लोकांचा मला थोडासा(?) रागच येतो.. पण हि व्यक्ती Client नसून चांगल्या ओळखीचीच असल्यामुळे त्यांना मी काही जास्त बोललो नाही.. असो !

ती व्यक्ती "अरे काही दिवसांपूर्वी मला एकाकडून मिळालेली एक रक्कम मी घरातल्याच एका
कपाटात नेहमीच्या कप्प्यात ठेवली होती आणि आता बघतो तर ती कुठेच मिळत नाही, ह्या बाबतीत पत्रिकेवरून आपल्याला काही कळू शकतं का?" मी म्हंटल "हो बघुया ना, पण मला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाणच लागेल" इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि ९५% Astrologers हे असे प्रश्न, प्रश्नकुंडली वरूनच बघतात पण Somehow ह्या प्रश्नाची उतरं जन्मकुंडलीच देऊ शकेल अस मला खूप Strongly वाटत म्हणून मी असे प्रश्न नेहमी जन्मकुंडलीवरूनच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली.. वाचकांच्या माहितीसाठी आणि विशेषत: ज्योतिष अभ्यासकांसाठी, त्यांची जन्मकुंडली खाली देत आहे..



हा प्रश्न जुन २०१३ ला विचारला होता, त्या वेळेला ह्या पत्रिकेला शुक्र महादशा, राहू अंतर्दशा आणि शनी विदशा सुरु होती, जानेवारी २०१३ ते जुलै २०१३, प्रश्न विचारला तेंव्हा शनी वक्री होता, पण जन्मकुंडलीत शनि मार्गीच आहे आणि तो देखील लाभात, Cusp Chart मधे देखील मागे 10th house मधे जात नाही.. तसेच शनी बुधाच्या नक्षत्रात आहे, Cusp Chart मध्ये बुध 9th house मधे जात आहे So विदशा स्वामी शनी १,५,६,९,१०,११  या स्थानाचा कार्येश होतो, ११ चा बलवान कार्येश होतो, १२th house लागतच नाही म्हणजे पैसे मिळणार हे निश्चित, म्हणून मी त्यांना सांगितल कि नुकसान होणार नाही, पैसे मिळतील ! प्रश्न विचारला तेंव्हा शनि वक्री होता आणि शनी साधारण फेब्रुवारी २०१३ ला वक्री झाला होता आणि त्यांच्या पत्रिकेत शनीचा एवढा Strong संबंध होता म्हणून मी त्यांना विचारल कि पैसे Feb. २०१३ च्या आधी मिळाले होते कि नंतर? आणि पैसे मिळाले तेंव्हा शनिवार होता का? त्यावर ते म्हणाले कि साधारण फेब्रुवारी २०१३ च्या आसपास पैसे एकाला उधार दिले होते आणि त्यांनी ते परत आणून दिले आणि आणून दिले तो वार शनिवारच होता ! दुसरी गोष्ट, ह्या व्यक्तीची तूळ रास आहे म्हणजे साडेसाती देखील सुरु आहे, म्हणजे शनीचा सबंध परत परत येत होता, ह्या पत्रिकेत शनी विदशा ६ आणि ११ ची कार्येश होते, 6th house हे समोरच्या माणसाचे व्यय स्थान आणि 11th house हे लाभ स्थान, उसने दिलेले पैसे परत मिळाले होते आणि ते देखील शनी वक्री असताना म्हणजे शनी नुकसान नक्की करणार नाही, म्हणजे पैसे मिळणारच ह्या बाबतीत माझी खात्री झाली आणि आता शनी वक्री असल्यामुळे हा घोळ झाला आहे हे देखील कळलं म्हणून मी त्यांना म्हंटल कि पैसे नक्की मिळतील, नुकसान होणार नाही ! आणखी एक गोष्ट, शनीचा संबंध वयस्कर व्यक्तीशी आहे, त्यांच्या घरात स्वतः हि व्यक्ती सोडून दुसरी कोणी वयस्कर व्यक्ती नाही, So, पैसे शोधण्यासाठी ह्या व्यक्तीने स्वतःच पुढाकार घ्यावा, हे देखील आलंच !

शनी ८ जुलै ला मार्गी होत होता म्हणून त्याच्यानंतर पैसे मिळतील अस वाटतंय अस मी त्यांना सांगितल.. हा प्रश्न साधारण जून च्या दुसरया आठवडयात विचारला होता,  शनीचा संबंध असल्यामुळे उशीर होणार हे देखील ओघाने आलंच, इथे सुद्धा अंकशास्त्रानुसार ८ आकड्याचा संबंध शनीशी आहेच ! 

हे सगळ बोलणं झाल्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि ९ जुलै ला त्यांचा मला सकाळी सकाळी फोन "अभय, Good Morning आणि Good News, पैसे मिळाले rather सापडले, ज्या कपाटात मी ठेवले होते त्याच कपाटात शोधता शोधता मिळाले" त्यावर मी "आता कळल ना ज्योतिषशास्त्र खरं असतं ते !" अस म्हणण्याचा मोह आवरत फक्त "अरे वा, बरं झालं, गुड" एवढच म्हंटल !

ता.क. : मी हा लेख लिहित असताना हीच व्यक्ती काही वेगळ्या कामासाठी माझ्याकडे येउन गेली, हा हि एक योगायोग !

अभय गोडसे

My Websites  www.Kpjyotish.com   www.AbhayGodse.com


My Facebook Profile  


 

Monday, 8 July 2013

काही विचित्र Cases

काही विचित्र Cases

Astrology Consultation करत असताना काही विचित्र Cases देखील समोर येतात, काही काही Cases तर इतक्या विचित्र असतात कि आपण कधी ऐकलेल्या देखील नसतात. अशाच काही Cases बद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. 


पहिली Case :

हि Case खरोखरच खूप विचित्र आणि दुर्मिळ आहे. माझे एक परदेशस्थ Client. आई वडील आणि दोन मुलं, एक मुलगा एक मुलगी, सगळं अगदी व्यवस्थित सुरळीत सुरु होतं. दोघे मोठे झाल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली.… आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही भावंडांची लग्न एकदम ठरली आणि एकाच वर्षी दोन्ही भावंडांची लग्न झाली. सगळे अगदी आनंदात होते.  लग्न झाल्यापासून दोन वर्षातच दोघांच्याहि Married Life मधे Problems सुरु झाले… पुढे खूपच प्रोब्लेम्स झाले आणि दोघांनीही (भावाने त्याच्या बायकोपासून आणि बहिणीने तिच्या नवऱ्यापासून ) घटस्फोट घ्यायचं ठरवलं आणि परत आश्चर्य असं कि दोघांचाही घटस्फोट एकाच वर्षी झाला ! आता तुम्हाला वाटेल कि हेच विचित्र आणि दुर्मिळ आहे ! हे तर आहेच पण खरी विचित्र आणि दुर्मिळ गोष्ट पुढे आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर थोड्याच कालावधीत दोघांच्या Life Partners नी एकमेकांशी लग्न केल, म्हणजे भावाच्या बायकोने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याशी लग्न केलं !


दुसरी Case :

एक Love Affair झालं आणि पुढे ते Break झालं अशी ढिगानी उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघतो, पण काही काही Couples चं लग्न होण्याचे योग नसले कि गोष्टी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याचं हे एक उदाहरण. माझा एक उत्तर भारतीय Client. तो २१-२२ वर्षांचा असताना एका मुलीशी त्याचं Affair झालं. पुढे आई वडिलांच्या Objection मुळे दोघांच लग्न होऊ शकलं नाही, affair break झालं आणि पुढे दोघांच लग्न वेगवेगळ्या व्यक्तींशी झालं,  त्यानंतर १० वर्षांचा काळ लोटला आणि अचानक त्या दोघांची पुन्हा एकदा योगायोगाने एका शहरात भेट झाली, परत दोघांचा Contact वाढला, बोलाचाली आणि भेटागाठी सुरु झाल्या.. परत दोघांना असं वाटू लागलं कि अजूनही आपल्याला एकमेकांबद्दल ओढ वाटते आहे, लहान असताना आई वडिलांच्या पुढे आपल काही चाललं नाही पण आता आपण अजूनही एकमेकांशी लग्न करू शकतो. ठरलं ! दोघांनीही आपापल्या जोडीदाराला घटस्फोट घेऊन एकमेकांशी लग्न करायचं ठरवलं.. दोघांनीही आपापला divoce file केला आणि काही काळानंतर दोघांचाही divorce झाला. त्यानंतर Divorce मिळाल्यापासून ते Remarriage हा जो काळ होता त्या काळात त्या मुलीचं त्या मुलाविषयी काहीतरी Misunderstanding झालं आणि त्या मुलीने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला आणि आता ती मुलगी दुसरयाच एका मुलाशी लग्न करतेय आणि हा मुलगा तर आपल्या बायकोपासून घटस्फोट घेऊन बसलाय.. एकमेकांशी लग्न होण्याचे योग नसले तर गोष्टी कुठल्या थरापर्यंत जातात ह्याचंच हे एक दुर्मिळ उदाहरण .. 

अभय गोडसे

www.Kpjyotish.com

www.AbhayGodse.com


Monday, 24 June 2013

आत्महत्या ? छे , अजिबात नाही !


आत्महत्या ? छे , अजिबात नाही !

हल्ली आत्महत्येच्या बातम्या वारंवार पेपरात येत असतात, नैराश्याच्या आहारी जाऊन शाळकरी मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणीही हि कृती करून बसतो. विशेषतः एखादी व्यक्ती घर सोडून निघून गेली कि बरेच वेळेला लोकांना आत्महत्येबद्दल शंका येते.  अशा बऱ्याच Cases येत असतात, त्यापैकीच एक Case इथे देत आहे.  


साधारण ५०-५५ वर्षांचे एक जण एके दिवशी अचानक घर सोडून निघून गेले, त्यांचा एक नातेवाईक माझ्याकडे त्यांची पत्रिका दाखवण्यासाठी आला. ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते कि बरेचसे  Astrologers असे प्रश्न प्रश्नकुंडली वरून जास्त बघतात पण मी हे प्रश्न किंवा कुठेलेही प्रश्न बहुतेक वेळेला जन्मकुंडलीवरूनच बघतो, Somehow जन्मकुंडलीच ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते असं मला वाटतं म्हणून मी जन्मकुंडलीच बघतो. त्याप्रमाणे मी त्यांची जन्मकुंडली बघितली. त्या नातेवाईकांची पहिली भीती आत्महत्येविषयीचीच होती पण पत्रिका Threat to Life अजिबात दाखवत नव्हती त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याला धोका नव्हता. त्यामुळे मी म्हंटल कि हि वक्ती जरी घर सोडून गेली असली तरी आता सुखरूप आहे. हे ऐकून त्यांच्या नातेवाईकाला जरा Relief मिळाला. त्यापुढे मी म्हंटल कि हा माणूस आत्महत्या करणार नाही कारण आत्महत्या करण्यासाठी जी हिम्मत लागते ती ह्या माणसामध्ये नाही. आत्महत्या करणं म्हणजे चणे दाणे खाण्याइतकं सोप नाही त्यासाठी एक प्रकारची हिम्मत, धडाडी लागते आणि ती ह्या माणसाजवळ नाही. 

इथे एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो कि कुठलीही पत्रिका हातात आल्यानंतर Astrologer नी भविष्य सांगण्याच्या आधी प्रत्येक पत्रिकेचा Nature Analysis केला पाहिजे, माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याशी सांगड घालणं सोप जातं, याचा अर्थ माणसाचा स्वभाव त्याच भविष्य ठरवतो असा अजिबात नाही तर भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करतात येतात. ह्या Case मध्ये त्या माणसाचे तुळ लग्न व मीन रास होती, त्यामुळे ह्या व्यक्तीत धडाडीचा अभाव होता. मी म्हंटल कि हि व्यक्ती परत नक्की येईल पण थोडा Late होण्याच्या Indications आहेत, पत्रिकेनुसार ती व्यक्ती घरी परत येण्याचा जो काही काळ होता तो मी सांगितला आणि म्हंटल कि Late झाला तरी घरी परत येईल हे नक्की ! तुम्ही शोध घेतला तरी आत्ता त्याचा काही उपयोग होणार नाही ! 


तुळ लग्न व मीन रास आणि पत्रिकेतल्या इतर काही गोष्टींमुळे ती व्यक्ती खूप Emotional वाटत होती, म्हणून मी त्यांना म्हंटल कि हि व्यक्ती घरी परत आल्यावर पुन्हा अस काही करू नये यासाठी ह्यांना Emotions मध्ये अडकवा म्हणजे ह्यांना Emotional Blackmailing करा ! जेव्हा हे घरी नव्हते तेंव्हा इतर Family Members ना किती आणि कसा त्रास झाला हे त्यांना सांगा किंवा अस काहीही करा ज्यामुळे ते Emotionally घराला बांधलेले राहतील. हि Trick भविष्यात नक्की उपयोगी पडेल !

त्यानंतर नातेवाईकांचा शोध तर सुरूच होता. असाच काही महिन्यांचा काळ गेला आणि ती व्यक्ती आपणहून घराकडे आली. आर्थिक Problem आल्यामुळे आणि Emotional असल्यामुळे Depression / Frustration लवकर आलं होतं आणि त्यात ती व्यक्ती घर सोडून गेली होती. 

पत्रिका कुठलीही असो, माणसाचा स्वभाव आणि त्याच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी यांची सांगड घातली कि मग भविष्यात अचूकता येते !

इथे एक मुद्दा परत सांगावासा वाटतो ,
व्यक्तीचा स्वभाव ओळखणं म्हणजे त्याच भविष्य ओळखणं नव्हे ! माणसाचा स्वभाव कळला कि त्याची भविष्याची सांगड घालणं सोप जातं, भविष्यात घडणाऱ्या घटनांना तो माणूस कशा प्रकारे React करेल हे लगेच कळतं आणि त्याप्रमाणे काही सूचना करता येतात.

व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचं भविष्य/नशीब ह्यात खूप तफावत असू शकते. Scientist होण्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीत असून सुद्धा नशिबात नसेल तर ती व्यक्ती आयुष्यभर Clerk राहू शकते. अमिताभ बच्चन पेक्षा जास्ती Acting Skills असलेली माणसं भारतात असतील पण अमिताभ बच्चन बनणे एखाद्याच्याच नशिबात असतं !


अभय गोडसे

 www.Kpjyotish.com

www.AbhayGodse.com

 

आपण आपले अभिप्राय/मतं देऊ शकता.

 

Thursday, 30 May 2013

एक Missing Case

एक Missing Case


बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेंव्हा मी नुकतंच Professional Astrology Consultation सुरु केलं  होतं.  माझे एक Client दिल्लीला राहत होते, नवरा बायको, एक मुलगा एक मुलगी, चौकोनी कुटुंब ! एके दिवशी त्यांचा मुलगा संध्याकाळी खाली खेळायला गेला आणि रात्र झाली तरी परत आला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली, मुलाचे बिल्डींग मधले मित्र, शाळेतले मित्र, सगळीकडे चौकशी करून झाली, पण मुलाचा काहीच पत्ता नव्हता ! अचानक मुलगा केला कुठे, काय झाल असेल ह्या विचाराने आईवडील हैराण झाले. त्यांनी त्यांच्या पुण्याच्या एक नातेवाईकाला माझी Appointment घ्येयला सांगितलं. मी पत्रिका बघितली तर त्या वेळेचा time period म्हणजेच अंतर्दशा मुलाच्या जीवाला धोका दाखवत नव्हती, म्हणजे मुलगा सुखरूप होता पण त्याच वेळेला त्याची पत्रिका या घडलेल्या घटनेचा त्याच्या वडिलांशी काहीतरी संबंध दाखवीत होती………………. पण नेमकं काय?………  म्हणून मी त्यांना विचारलं कि मुलाच्या वडिलांचं कोणाशी काही भांडण वैगरे झालाय का?, Office मधे किंवा आणखी कुठे? पण तसं काहीच नाही अस ते म्हणाले, म्हणजे अपहरणाची शक्यता कमी होती. त्याच वेळेला त्याच्या पत्रिकेत मंगळाचा देखील Strong संबंध होता. ज्या दिवशी मी हे बघत होतो त्या दिवशी सोमवार होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मंगळवार होता, म्हणून मी त्यांना म्हंटल कि उद्या तुम्हाला या मुलाचा ठावठिकाणा कळेल किंवा मुलगा परत येईल पण उद्यापर्यंत काही माहित होईल असं वाटत नाही. 

सोमवारी काही माहित होऊ शकणार नाही हे कळल्यावर ते थोडे निराश झाले पण शोधाशोध सुरु ठेवली. सोमवारची सगळी रात्र नातेवाईक आणि इतर सगळ्यांनी शोधाशोध करण्यात घालवली.  सोमवारची रात्र संपून मंगळवारची पहाट झाली.. त्यांचा एक नातेवाईक अशीच शोधशोध करत करत पहाटे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर पोचला आणि अचानक बाकावर बसलेला तो मुलगा त्यांना समोर दिसला. त्यांनी लगेच घरी कळवलं आणि सगळ्यांना हायसं वाटलं…. पण आता प्रश्न होता कि हा मुलगा एकटा तिकडे काय करत होता, मुळात घरापासून इतका लांब गेलाच कशासाठी? कारण काय?…………. तो घरी येउन वातावरण शांत झाल्यावर त्या मुलाने सांगितलं कि तो ज्या क्लासला जात होता तिकडे थोडेच दिवसापूर्वी परीक्षा झाली होती आणि त्याच दिवशी त्याचा Result लागला होता पण Marks कमी पडले होते आणि संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना हे समजलं तर ते ओरडतील , मारतील, ह्या भीतीने ते टाळण्यासाठी तो संध्याकाळीच घर सोडून गेला होता………… अशा प्रकारे ह्या घटनेशी वडिलांचा नेमका काय संबंध होता हे आता सगळ्यांनाच कळलं होतं !

अभय गोडसे

Monday, 27 May 2013

Made for each other..

 Made for each other...

आपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येक जण कधीनाकधी कुठेनाकुठे कुणाच्यातरी प्रेमात पडला असेलच. पण त्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालं  का? बहुतेक लोक "नाही" असंच उत्तर देतील ! आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी प्रेमप्रकरण बघतो, त्यातल्या किती लोकांची एकमेकांशी लग्न होतात? खूप थोडी ! पण काही लोकांच्या बाबतीत एकमेकांशीच लग्न होणं हे लिहिलेलं असतं, अशाच एका केसबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.. 

नेहमी माझ्याकडे स्वतःसाठी येणारे माझे एक Client एके दिवशी त्यांच्या एका Relative ची पत्रिका दाखवायला आले. मुलगी Doctor होती, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण तिचं एक love Affair होतं आणि त्यात काही अडचणी आहेत असे ते म्हणाले, त्या संबंधी त्यांना काही गोष्टी विचारायच्या होत्या. मी म्हंटल कि मुलाचे accurate birth details लागतील. त्यांनी मुलाचे birth details दिले, मी दोघांच्या पत्रिका बघितल्या. दोघांच्याही पत्रिकेत married life व इतर वैवाहिक सुखाच्या दृष्टीने लागणाऱ्या गोष्टी अगदी चांगल्या होत्या. मी म्हंटल कि दोघांच्याही पत्रिकेत Married Life उत्तम आहे. दोघांनी लग्न केलं तर Married Life मधे काहीच Problem वाटत नाही. त्यावर ते म्हणाले कि ते दोघेही खूप चांगले आहेत, पण त्यांच लग्न होण्यातच problem आहे. मुलीच्या आई वडिलांचा या लग्नाला खूपच विरोध आहे. 

मी परत पत्रिका बघितल्या आणि त्यांना सांगितल कि या दोघांचा एक commom time period मागच्या महिन्यापासून सुरु झाला आहे जो लग्नासाठी खूपच strong आहे, तसंच ह्या दोघांच्या पत्रिकेत अशी एक link/धागा आहे कि ह्याचं लग्न एकमेकांशीच होईल. म्हणजेच हे Made for each other आहेत. 

ते म्हणाले कि नाही हो हिचे आई वडील हे लग्न होऊन देणार नाहीत. मी म्हंटल हे बघा कि जेंव्हा दोघांच लग्न एकमेकांशीच होण्याच्या Indications इतक्या Strong आहेत तेंव्हा हिचे आई वडीलच काय पण जगातलं कोणीही आडव आलं, तरी ह्यांचच लग्न एकमेकांशी होईल ! ते म्हणाले कि तुम्ही हे सगळ जे आत्ता मला सांगितलत ते मुलीच्या आई वडिलांना सांगाल का? कदाचित त्याचा काही उपयोग होईल. त्यांनी मुलीच्या आईला फोन लावला, मी मुलीच्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या, त्यावर त्या बाईंनी मला विचारल कि हे लग्न होऊ नये ह्यासाठी काही उपाय आहे का? (इथे लोकं लग्न होण्यासाठी उपाय विचारतात तर हि बाई लग्न होऊ नये यासाठी उपाय विचारत होती, लोकं आपल्या हट्टासाठी कुठल्या थराला जातात याच हे एक उदाहरण, असो ! ) मी म्हंटल कि एखाद लग्न होऊ नये यासाठी उपाय नसतो आणि असला तरी मला माहित नाहीये ( आणि मनात म्हंटल कि माहित असला तरी तो मी तुम्हाला सांगणार नाही ). शेवटी त्यांना म्हंटल कि हे बघा तुम्ही ह्या लग्नाला Objection घेऊ नका कारण तुम्ही या लग्नाला कितीही Objection घेतलंत तरी जेव्ह्ना ह्या दोघांच लग्न होण्याच्या Indications Strong आहेत तेंव्हा हे लग्न होणारच ! हे ऐकल्यावर त्या थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या आणि मला म्हणाल्या कि मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते पण तुमच्या समोर बसलेल्या आमच्या नातेवाईकाला Please सांगू नका, त्या म्हणाल्या कि आमच Objection असून सुद्धा ह्या दोघांनी मागच्या महिन्यात already Court Marriage केलयं ! हे ऐकून मी फोनवर त्यांना फक्त एवढच म्हंटल कि आता कळलं ना कि मी "काय" आणि "का" सांगत होतो ते !

अभय गोडसे

महत्वाचं  : 
१ ) वरील उलेख केलेल् Made for each other हे काहीच पत्रिकांमध्ये आढळत. सगळ्याच पत्रिकांमध्ये आढळत नाही.  
२  ) Made for each other हे फक्त लग्न  "होण्यासंबंधित" आहे, याचा वैवाहिक सौख्याशी संबंध नाही. 


ज्योतिष अभ्यासकांसाठी :

Made for each other साठी खालील मुद्दे महत्वाचे आहेत,
१ ) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमात असलेली रास हि दुसऱ्याची (
मुलगा किंवा मुलगी ) लग्नरास किंवा चंद्ररास असणे


२ ) एकाचा (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी ज्या राशीत आहे ती दुसऱ्याच्या (मुलगा किंवा मुलगी ) पत्रिकेची लग्नरास किंवा चंद्ररास असणे. 

३) एकाच्या पत्रिकेत (मुलगा किंवा मुलगी ) सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी and/or महादशा, ज्या प्रकारचा जोडीदार दाखवत असेल त्या वर्णनाशी जुळणारी दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी ) असणे.

४ )  वरील एक, दोन्ही  किंवा तिन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर दोघांचे Common good time period for Marriage असणे खूप महत्वाचे आहे. एकाचा लग्नाचा period २० १ ३ आणि दुसऱ्याचा २ ० १ ८ असे असेल तर दोघांचे एकमेकांशी लग्न होणार नाही !





Thursday, 23 May 2013

कलेचा आठवा रंग

कलेचा आठवा रंग …… 


सैफ अली खानचा करीनाशी पुनर्विवाह झाला, किशोर कुमार यांची संपूर्ण आयुष्यात ४ लग्न झाली, लता मंगेशकर याचं लग्नच झालेल नाही.. 


आता तुम्ही म्हणालं कि ह्या सगळ्याचा संबंध काय?………….  आहे, संबंध आहे ! तुम्ही जर ज्योतिषाविषयी थोडं फार ऐकलं किंवा वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असेल कि कलेचा संबंध हा ज्योतीष शास्त्रात शुक्राशी आहे. थोडक्यात, शुक्र हा कलेचा कारक ग्रह आहे, त्याचप्रमाणे तो स्त्री आणि वैवाहिक सौख्याचा देखील कारक ग्रह आहे. तसेच सर्व प्रकारची भौतिक सुखं याचा देखील कारक आहे. जेंव्हा एखादा माणूस कला क्षेत्रात पुढे येतो तेंव्हा त्याच्या पत्रिकेवर शुक्राचा अंमल जास्त असतो, जो त्याला उपजत कलागुण देतो, त्यात नैपुण्य मिळवून देतो. पण त्याच वेळेला शुक्राच्या अमलाखाली येणाऱ्या इतर बाबतीत म्हणजे लग्न आणि विवाह सौख्य, या बाबतीत एक प्रचंड "उणीव" निर्माण करतो, विवाह सौख्य मिळू देत नाही.  आता तुम्ही म्हणाल कि हे अस कसं?…  सांगतो ! 

निसर्गाचा सगळ्यात मोठा नियम आहे तो म्हणजे "समतोल साधणे" ! जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया देखील असतेच, ऐके ठिकाणी मातीचा डोंगर झाल्यास नक्की समजावं कि कुठेतरी खड्डा झालेला आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांना परत पावसाळ्यात पालवी फुटते, उन्हाळा पावसाळा हि दोन्हीही निसर्गाचीच रूपं ! एका हाताने निसर्ग जेव्ह्ना देतो तेंव्हा दुसरया हाताने काहीतरी काढून देखील घेतो. "कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है" हा देखील निसर्ग नियमच, मग त्याला ग्रह तारे तरी अपवाद कसे असणार?

पत्रिका  बघत असताना काही वेळेला अस देखील पाह्यला मिळतं कि एखाद्या मुलीला नोकरीत भरपूर यश देणारा ग्रहच तिला सासूकडून त्रास दाखवत असतो. एखादा ग्रह जेंव्हा एखाद्या बाबतीत चांगली फळ देतो तेंव्हा त्याच्याच अमलाखाली येणाऱ्या इतर काही बाबतीत काही उणीव निर्माण करतो, शुक्रच्याही बाबतीत असच आहे. तुम्ही जर कलेच्या प्रांतात कार्यरत असलेल्या लोकांच्या आयुष्यावर नजर टाकलीत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि त्यांच्या वैवाहिक सुखात प्रचंड कमतरता आढळते, घटस्फोट, नवरा बायकोच अजिबात न पटण, विवाह बाह्य संबंध, Live in Relationship मध्ये राहणे, एखाद्या स्त्रीने विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणे, असे असंख्य प्रकार कलावंताच्या आयुष्यात थैमान घालत असतात. हेमामालिनीने धर्मेंद्रशी केलेलं लग्न, श्रीदेवीने बोनी कपूरशी केलेलं लग्न, अनेक वर्षांनी झालेला अमीर खानचा घटस्फोट ! अशी असंख्य उदाहरणं आहेत, नुसती नावं घ्यायची म्हंटल तरी अखं पान भरेल. 

आता तुम्ही म्हणाल कि फक्त सिनेमा-नाट्य कलाकारांच्याच बाबतीतच असं आढळत का ? मुळीच नाही, नृत्य, गायन, चित्रकला अशा विविध कलेच्या क्षेत्रातील दिगज्जांची नावं आठवून बघा आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर नजर टाका, तिथेही हाच प्रकार आढळेल ! हे देखील फक्त नावाजलेल्या कलाकारांच्याच बाबतीत आढळत असंही नाही, फारशा प्रसिद्धीस न आलेल्या कलाकारांच्या बाबतीत देखील हे होतच असतं, फक्त ते कलाकार प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्याला माहिती होत नाही एवढंच ! माझ्या घटस्फोट घेणाऱ्या कलावंत मित्राला मी एकदा गमतीने म्हंटल कि तुझे जितके जास्ति घटस्फोट होतील तितका तू जास्ती मोठा कलावंत होशील ! 

शुक्र हा सौंदर्याची आवड, मुक्त विचारसरणी, छान छौकी, ऐश करणे इत्यादी गोष्टीही दर्शवतो. त्यामुळे कलाकार हा कधी साचेबंध आयुष्य जगताना किंवा धोपट मार्गाने जाताना आढळत नाही. चित्रविचित्र Fashion करणे, त्यात सतत बदल करणे, त्याचप्रमाणे अत्यंत बेताल वागणे, वेळ काळाचे भान सोडून वागणे, ह्या सगळ्या गोष्टी जणू काही त्यांच्या अंगी बाणलेल्याच असतात. शुक्र तारा हा ज्या प्रमाणे संध्याकाळी उगवतो तसा ह्या कलाकारांच्या दिनक्रम हा संध्याकाळी सुरु होऊन दुसरया दिवशी पहाटे संपतो असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. ह्या सगळ्यामुळेच कि काय बरेचसे कलाकार हे विक्षिप्त ह्या विभागात मोडले जातात. 

शुक्र हा मादक पेयांचा देखील कारक असल्यामुळे व्यसनं नसलेला कलाकार विरळाच! अति मद्य सेवनामुळे नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याची उदाहरणे पूर्वीच्या काळी ढिगांनी आढळतील. आता स्पर्धेचं युग असल्यामुळे यात बराच फरक पडलाय. शुक्र हा दिखाऊपणाचा कारक त्यामुळे हिरोचं काम करणारा कलाकार हा खऱ्या आयुष्यात व्हिलन असू शकतो आणि सिनेमात व्हिलनचं काम करणारा कलाकार हा प्रत्यक्षात चांगला असू शकतो. दिखाऊपणा करण्यामध्ये खोटी स्तुती करणे वगैरे ह्या गोष्टी आल्याच. शुक्र हा पैसा व श्रीमंतीचा देखील कारक, त्यामुळे, चित्रपटसृष्टी हा झटपट पैसे मिळविण्याचा एक महत्वाचा स्रोत आहे ! इथे रोडपती चे करोडपती झाल्याची उदाहरणं देखील बरीच आढळतात. शुक्र हा मोहात पडणारा ग्रह आहे त्यामुळे चित्रपट नाट्यसृष्टी विषयी लोकांना प्रचंड आकर्षण असत. हे सगळ फार सोपं आहे, अशी एक धारणा असते पण प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरे, असा असतं. कारण यासाठी वेळी अवेळी जेवण, आड निडे दौरे, राजकारण, Performence , Retakes , यासारख्या गोष्टीतून जावे लागते !

शुक्र हा तसा उच्श्रुंखल ग्रह त्यामुळे बहुतौंशी कलाकार हे अंत्यत बेफिकीर, परिणामांची पर्व न करणारे , प्रचंड मनस्वी , तितकेच हळवे , उडावू वृत्तीचे , उथळ असतात. अर्थातच बुद्धीजीवी कलावंत, निर्व्यसनी कलावंत , असे काही अपवाद आहेतच, पण फारच थोडे !

ज्याप्रमाणे शुक्राच्या बाबतीतला आयुष्यातला हा समतोल आहे त्याचप्रमाणे तो इतर ग्रहांच्या बाबतीतही असतो पण तो फारसा जाणवण्याइतपत नसतो म्हणून तो लगेच नजरेत भरत नाही एवढंच ! कलाकारांच्या बाबतीतल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याआधीहि माहित असतील पण ते तसं का असत हे कदाचित माहित नसेल. 

कलेचा सप्तरंगी अविष्कार हा प्रत्येकालाच माहित असतो पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून उलगडलेला हा असा कलेचा आठवा रंग !


Astrologer अभय गोडसे 
Book Appointment online,

ज्योतिषशास्त्राविषयी थोडसं ..

ज्योतिष Consultation करत असताना बरेच वेगवेगळे अनुभव येत असतात, अनेक लोकं अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत असतात, अशाच प्रश्नांपैकी एक प्रश्न कायम विचारला जातो तो म्हणजे "ज्योतिष हे जर शास्त्र आहे तर मग दोन ज्योतिषी एकाच पत्रीकेविषयी वेगवेगळी मतं कशी काय देतात?" अशा प्रश्न मला विचारला कि मी त्यांना एक प्रतिप्रश्न विचारतो " जर Medical हे Science आहे तर मग दोन डॉक्टर एकाच Patient विषयी वेगवेगळी मतं का देतात?, पहिला डॉक्टर सांगतो कि Operation करावाच लागेल, तर दुसरा डॉक्टर सांगतो कि नुसत्या औषाधानीच बरे वाटू शकेल..  तसेच जर law/कायदा same आहे तर मग एक वकील case हरतो आणि तीच case दुसरा वकील जिंकतो, हे कसे काय?"................................ ह्याचाच अर्थ कि Medical हे जरी Science असले तरी त्याची accuracy हि त्या त्या डॉक्टर वर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ज्योतिष हे जरी शास्त्र असलं तरी त्याची Accuracy हि त्या त्या ज्योतिषावर अवलंबून असते. ज्योतिषातील Accuracy हि  ज्योतिषी व्यक्तीच्या खालील गोष्टीवर अवलंबून असते,
1) Logic
2) Intelligence level
3) knowledge of Astrology & other subjects as well
4) Experience
5) Intuition

 वरील गोष्टींपैकी कुठलीही एक गोष्ट जरी Missing असेल तरी Accuracy जाऊ शकते.. 

ह्याचावर एक पुढचा प्रश्न असा विचारला जातो कि "मग आम्ही चांगला ज्योतिषी शोधायचा कसा?" परत माझा प्रतीप्रश्न "तुम्ही चांगला डॉक्टर कसा शोधता?" एक तर त्या डॉक्टर विषयी सगळी माहिती घेऊन नाहीतर मग आपल्या ओळखींच्यापैकी कोणीतरी Reference दिल्यामुळे आणि तिसरा मार्ग म्हणजे स्वतः अनुभव घेऊन ! मग चांगला ज्योतिषी देखील तसाच शोधावा !!

असाच एक दुसरा प्रश्न ज्योतिषाला विचारला जातो तो म्हणजे "ग्रह तारे तर पृथ्वीपासून इतके लांब आहेत मग त्यांचा परिणाम मानवी आयुष्यावर कसा काय होतो?"  ह्या बाबतीत दोन विचारधारा आहेत, पहिली विचारधारा अस मानते कि ग्रह directly परिणाम करतात जशी सूर्यापासून उष्णता मिळते वगैरे .. दुसरी विचारधारा अस मानते ग्रह हे फक्त गोष्टी Indicate करतात .. हि जास्त संयुक्तिक विचारधारा आहे. जन्माच्या वेळेस वर आकाशात ग्रहांची जी काही स्थिती असते ती काहीतरी दर्शवत असते.. म्हणजे कसं ? आपण वर्तमानपत्र वाचल्यावर आपल्याला सगळ्या बातम्या कळतात, वास्तविक वर्तमानपत्रामुळे घटना घडत नाहीत पण वर्तमानपत्रामुळे घटना माहिती होतात, अगदी तसच पत्रिकेच्या बाबतीत असत. पत्रिका किंवा ग्रह घटना घडवत नाहीत पण पत्रिका किंवा ग्रहांमुळे घडणाऱ्या घटना माहित होतात.. व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला ग्रहांची जी स्थिती असते ती स्थिती म्हणजे पत्रिका आणि ती स्थिती काय दर्शवते हे ओळखण्याच साधन म्हणजे ज्योतिषशास्त्र !

म्हणजेच पत्रिका हे जर आयुष्याचं एक वर्तमानपत्र मानलं तर त्याची भाषा किंवा लिपी म्हणजे ज्योतिष शास्त्र ! हे वर्तमानपत्र घडलेल्या घटनांबद्दल तर माहिती देतंच पण घटना घडायच्याआधी देखील बातम्या देतं बरं का !!


अभय गोडसे


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...